पांढऱ्या पेशी वाढल्यानंतर दिसून येणारी लक्षणे
थंडीच्या वातवरणात आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. सतत सर्दी, खोकला आणि ताप आल्यानंतर हळूहळू रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा ताप किंवा सर्दी खोकला झाल्यानंतर दुर्लक्ष केले जाते. अतिप्रमाणात ताप आल्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी वाढतात किंवा कमी होऊ लागतात. शरीरात वाढलेल्या आणि कमी झालेल्या पांढऱ्या पेशी आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. त्यामुळे ताप आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचणार नाही. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेल्या किंवा कमी झालेल्या पांढऱ्या पेशी आरोग्यासाठी किती घातक आहेत? यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते? पांढऱ्या पेशी वाढल्या किंवा कमी झाल्यानंतर कोणते आजार होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
पांढऱ्या पेशी शरीरासाठी आवश्यक आहेत. शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पांढऱ्या पेशी बोन मॅरोमध्ये तयार होतात. शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता इम्यूनोसप्रेशन दर्शवण्याचे काम करतात. त्यामुळे शरीरासाठी पांढऱ्या पेशी महत्वाच्या आहेत. डेंग्यू किंवा मलेरिया झाल्यानंतर पांढऱ्या पेशींची पातळी कमी किंवा जास्त होते.
डेंग्यू किंवा मलेरिया झाल्यानंतर शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. पांढऱ्या पेशी कमी झाल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळीसुद्धा कमी होत जात. शिवाय या पेशी कमी झाल्यानंतर मांसपेशी दुखण्यास सुरुवात होते. ऑटोइम्यून आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊन गंभीर इन्फेक्शन होते. ताप किंवा अशक्तपणा जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घ्यावेत.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरात पांढऱ्या पेशींची कमतरता निर्माण झाल्यानंतर पोषक आहार. भरपूर पाण्याचे सेवन, जीवनसत्त्वे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. आहारामध्ये लोहयुक्त पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पांढऱ्या पेशी वाढून आरोग्य सुधारेल. आहारामध्ये लाल मांस, पालेभाज्या, हिरव्या भाज्या इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. पांढऱ्या पेशी कमी झाल्यानंतर घरगुती उपाय म्हणून पपईच्या पानांचा रस पिण्यास दिला जातो. या रसाच्या सेवनामुळे पांढऱ्या पेशी झपाट्याने वाढतात.