आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! पोट साफ होण्यासाठी दुधात मिक्स करून प्या 'हे' पदार्थ
कायमच पोटाच्या आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे, सतत चिकन मटण खाणे, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. यामुळे गॅस, अपचन आणि ऍसिडिटी वाढते. याशिवाय हल्ली प्रत्येक व्यक्ती बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त आहेत. बद्धकोष्ठता झाल्यानंतर शरीरात विषारी घाण तशीच साचून राहते. पाण्याच्या कमतरतेमुळे आणि शारीरिक हालचालींमुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय पोट स्वच्छ न झाल्यामुळे मल अतिशय कठीण होऊन आतड्यांमधये तसाच साचून राहतो.यामुळे गुदाशयात वेदना, रक्त येणे किंवा मूळव्याध होण्याची जास्त शक्यता असते. मूळव्याध झाल्यानंतर शरीरामध्ये अनेक बदल दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
पचनक्रिया बिघडल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा बिघडून जाते. यामुळे जडपणा जाणवतो, डोकेदुखी, चिडचिड, तणाव, उलट्या, मळमळ इत्यादी समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये चिकटून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी दुधात कोणते पदार्थ मिक्स करून खावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीर स्वच्छ होते आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते. पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी दुधात हे पदार्थ मिक्स करून खावेत.
तूप खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. याशिवाय गोड पदार्थ बनवताना तुपाचा वापर केला जातो. शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहील. तुपाच्या सेवनामुळे मल मऊ होऊन आतड्यांमधील घर्षण कमी होते. याशिवाय सकाळी उठल्यानंतर सुद्धा तुम्ही दूध आणि तुपाचे सेवन करू शकता.
नैसर्गिक गोडवा असलेले खजूर शरीरासाठी अतिशय गुणकारी आहेत. नियमित एक किंवा दोन खजूर खाल्यास आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय खजूरमध्ये नैसर्गिक लॅक्सेटिव्ह, सॉर्बिटॉल इत्यादी घटक आढळून येतात. त्यामुळे दिवसभरातून ३ किंवा ४व खजूर खावे. यामुळे अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड अतिशय प्रभावी ठरते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित एक किंवा अर्धा ग्लास कोरफडचा रस प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील. याशिवाय आतड्यांमध्ये साचलेला मल बाहेर पडून जाईल. कोरफडमध्ये अँथ्राक्विनोन्स सारखे लॅक्सेटिव्ह इत्यादी आवश्यक घटक असतात.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता म्हणजे मलत्याग करण्याची अनियमितता किंवा मलत्याग करताना होणारा त्रास. आठवड्यातून3 पेक्षा कमी वेळा मलविसर्जन होणे किंवा मलत्याग करताना जास्त जोर लावावा लागणे, याला बद्धकोष्ठता म्हणतात.
बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय:
पुरेसे पाणी प्यायल्याने मल मऊ होतो आणि मलत्याग करणे सोपे होते. आहारात फायबरचे प्रमाण वाढवा, जसे की फळे, भाज्या, आणि धान्ये. नियमितपणे व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल सुधारते.