फोटो सौजन्य: Freepik
बदलत्या लाइफस्टाइल आणि चुकीच्या खानपानामुळे आरोग्य अनेक समस्या सध्या वाढत आहे. कोणाला पोटाचे विकार होत आहे तर कोणी स्टेट आजारी पडत आहे. आपण जे पदार्थ खातो त्याचा परिणाम हा आपल्या लिव्हरवर सुद्धा होत असतो. काही वेळेस चुकीचा आहार लिव्हरच्या अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. त्यातीलच एक समस्या म्हणजे फॅटी लिव्हर.
फॅटी लिव्हर ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. यात लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ लागते. वास्तविक, सुरवातीच्या टप्प्यात हि समस्या थांबवणे खूप सोपे आहे. पण त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास अक्षरशः लिव्हर ट्रांसप्लांटची वेळ सुद्धा येऊ शकते.
फॅटी लिव्हरचे सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि अपुरी शारीरिक क्रिया. मग ते चालणे असो कि धावणे. अशावेळी, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, योग्य आहार निवडणे खूप महत्वाचे असते. यामध्ये काही आरोग्यदायी फळे टाळणे देखील समाविष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल जर ती फळं आरोग्यदायी असेल तर मग ती का टाळावी. या आरोग्यदायी फळांमध्ये काही असे घटक आहेत ज्यांचा वाईट परिणाम लिव्हरवर होऊ शकतो. चला या फळांबद्दल जाणून घेऊया.
हे देखील वाचा: गणेश चतुर्थीसाठी करा खास ‘गुलकंद मोदक’, चव घ्याल तर नेहमीच कराल
फळांचा राजा असणारा आंबा हा चविष्ट आणि अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे, परंतु त्यात भरपूर साखर सुद्धा असते. साखर चरबी वाढवण्याचे काम करते. अशा परिस्थितीत फॅटी लिव्हरच्या रुग्णांसाठी त्याचे सेवन टाळणे किंवा कमी करणे आरोग्यदायी मानले जाते.
फॅटी लिव्हरच्या बाबतीत सीताफळ खाऊ नये. तसेच या फळात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते पचायला जड जाते. अशा स्थितीत लिव्हरला ते नीट सावरता येत नाही.
सुका मेवा म्हणजेच ड्राय फ्रुटस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु फॅटी लिव्हर असल्यास त्याचे सेवन कमी करावे. या फ्रुक्टोज समृद्ध फळांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने लिव्हरची जळजळ होऊ शकते. तसेच फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.
हे देखील वाचा:हरतालिकेच्या पूजेवेळी नैवेद्यासाठी बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करा पारंपरिक रेसिपी
लिचीमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे ते फॅटी लिव्हरच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरते. त्याच वेळी, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा आणि फॅटी लिव्हरचा धोका देखील वाढतो.
महत्वाची सूचना: जर तुम्ही तुमच्या आरोग्याशी संबंधित काहीही वाचले असेल तर ते अवलंबण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.