प्रेह विहार मंदिर
सध्या संपूर्ण जगात विविध देशांमध्ये तणाव आणि संघर्ष वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता आग्नेय आशियातील दोन देश – थायलंड आणि कंबोडिया आमनेसामने आले आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेला तणाव आता प्रत्यक्ष लष्करी संघर्षात बदलला असून, दोन्ही देशांमध्ये लढाई सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रश्न उपस्थित होतो की, अखेर कोणत्या कारणामुळे हे दोन देश युद्धाच्या पातळीवर पोहोचले आहेत? हे कारण ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल – कारण ही लढाई एका प्राचीन मंदिरासाठी होत आहे. होय, भारतापासून जवळपास 5,000 किलोमीटर अंतरावर वसलेल्या थायलंड आणि कंबोडिया यांच्यात मंदिराच्या मालकीवरून युद्ध सुरू झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या मंदिराची सविस्तर माहिती.
कोणत्या देवतेला समर्पित आहे हे मंदिर?
हे ऐतिहासिक मंदिर ‘प्रीह विहिर’ नावाने ओळखले जाते आणि ते भगवान शिव यांना समर्पित आहे. हे मंदिर कंबोडियातील एका पठाराच्या टोकावर उभारलेले असून युनेस्कोने ते जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. 11व्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर ख्मेर स्थापत्यशैलीचे एक विलक्षण उदाहरण मानले जाते. मात्र, या मंदिराचा उगम 9व्या शतकात झाल्याचेही काही पुरावे आहेत. सुमारे 800 मीटर लांब असलेले हे मंदिर शहरांपासून लांब असल्यामुळे आजही चांगल्या स्थितीत टिकून आहे.
मंदिराची वास्तुशैली का आहे खास?
प्रीह विहिर मंदिराची वास्तुकला ही इतर अंगकोर मंदिरांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ख्मेर स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर अनेक गर्भगृहांनी सजले आहे, जे पायवाट, जिने, दालने आणि अंगणांद्वारे एकमेकांशी जोडले गेले आहेत. बलुआ पत्थरावर कोरलेल्या सूक्ष्म आणि कलात्मक नक्षीकामामुळे या मंदिराची भव्यता अधिकच खुलून दिसते.
देशातील एकमेव असे मंदिर जिथे भगवान शिव माता पार्वतीच्या मांडीवर झोपलेले आहेत; अनोखं आहे यामागचं कारण
आज कोणत्या देवतेची पूजा होते?
इतिहास अभ्यासक सांगतात की प्रारंभी या मंदिरात फक्त भगवान शिवाची पूजा केली जात होती. मात्र, कालांतराने या परिसराला बौद्धधर्मीय महत्वही प्राप्त झाले. 12व्या शतकात जयवर्मन सप्तम या बौद्ध धर्मीय राजाच्या काळात येथे बौद्ध कार्य सुरू झाले. आजही या मंदिराच्या परिसरात एक छोटासा बौद्ध मठ अस्तित्वात आहे, जो त्या बदलाची साक्ष देतो.