युरिक अॅसिड असल्यास काय खावे
युरिक अॅसिड हा सामान्य आजार मानला जातो. हल्ली तरूणांमध्येही हा आजार बळावताना दिसून येत आहे. मात्र युरिक अॅसिडकडे दुर्लक्ष करणे हे शारीरिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते. युरिक अॅसिड हा आजार घरीही बरा करता येऊ शकतो. युरिक अॅसिड म्हणजे नेमके काय आणि हा आजार कसा होतो? तसंच या आजारादरम्यान काय खावे आणि काय खाऊ नये हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवे.
डॉ. प्रियंका शेरावत यांनी युरिक अॅसिड म्हणजे काय आणि ते झाल्यास कोणती काळजी घ्यावी हे सांगितले. हा एक टाकाऊ पदार्थ आहे, ज्याचा अतिरेक शरीरासाठी धोकादायक आहे. चला जाणून घेऊया की युरिक अॅसिडचे प्रमाण जास्त का असते आणि यामध्ये आपण काय खावे?
प्युरिनमुळे तयार होते युरिक अॅसिड
डॉ. प्रियांका यांनी सांगितले की, युरिक अॅसिड हे प्युरिन मेटाबोलिझमचे टाकाऊ उत्पादन आहे. काही अन्नपदार्थांमध्ये प्युरिन असतात. यातून युरिक अॅसिड बाहेर पडते आणि जर ते सामान्य पातळीवर असेल तर मूत्रपिंड ते काढून टाकते. पण जर ते रक्तातील एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त असेल. मग ते मूत्रपिंडात युरिक अॅसिडचे खडे तयार करू शकते. रक्तातील जास्त प्रमाणात सांध्यांना जळजळ आणि संधिरोग होऊ शकतो.
या आजारात काय त्रास होतो
पायांच्या सांध्यामध्ये तीव्र जळजळ होण्याची शक्यता असते. मोठ्या पायाच्या बोटात सूज आणि वेदना यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गाउट आणि किडनी स्टोन हे युरिक अॅसिडचे उच्च प्रमाणाचे दोन प्रमुख धोके आहेत. हा आजार आहारात जास्त प्युरिन किंवा डिहायड्रेशनमुळे होतो. यासाठी, पाण्याची कमतरता भासू देऊ नका आणि जास्त प्युरीन असलेले पदार्थ टाळा. दररोज पाण्याचे प्रमाण २ ते ३ लिटर ठेवा.
Uric Acid ला मुळापासून उपटून काढेल कच्ची हळद, शरीरात जमा झालेले घाणेरडे प्युरिन असे काढेल बाहेर
कोणत्या पदार्थात आढळते जास्त प्युरिन
युरिक अॅसिडच्या रुग्णांनी चहा प्यावा की कॉफी? काय ठरते फायदेशीर कशाचा होतो तोटा
काय खावे
जास्त युरिक अॅसिड असल्यास काही पदार्थ खाणे टाळणंच योग्य आहे. मात्र तुम्ही आहारात काकडी, नारळपाणी, केळी इत्यादी क्षारीय पदार्थ खाल्ल्याने दगड तयार होण्याचा धोका कमी होतो. डॉक्टरांच्या मते, पोटॅशियम असलेली कोणतीही गोष्ट अल्कधर्मी असते. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करावा:
याशिवाय, तुम्ही शक्य तितके जास्त पाणी प्यावे. पाणी पिण्यामुळे शरीरातील साचलेले टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.