खरंच बटाटा आणि अंडं खाऊन वजन कमी होतं का?
वजन कमी करणे हे प्रत्येकासाठी आव्हानात्मक काम आहे आणि लोक त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. अगदी सकाळी उठून व्यायाम करण्यापासून वेगवेगळ्या डाएटपर्यंत अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. अमेरिकेतील फिटनेस कोच लिडिया इनस्ट्रोझाने सांगितले की, तिने फक्त अंडी आणि बटाटे खाल्ल्याने तिचे वजन 31 किलोने कमी झाले आहे. लिडियाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दावा केला आहे की ही डिश तिचा आवडता नाश्ता आहे, ज्यामुळे तिचे वजन कमी झाले आणि आजही ती नियमितपणे खाते. मात्र यामध्ये किती तथ्य आहे आणि असे करणे योग्य आहे की नाही याबाबत आपण तज्ज्ञांकडूनही काही महत्त्वाची माहिती घेतली आहे (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
लिडियाने केले शेअर
लिडियाने कसे वजन कमी केले याचा व्हिडिओ शेअर केलाय
लिडियाने आपण कसे वजन केले याबाबत व्हिडिओमध्ये सांगितले आहे, लिडिया एक संपूर्ण बटाटा घेते, त्याचे लहान तुकडे करते आणि त्यात मीठ, मिरपूड, लसूण पावडर आणि पेपरिका घालते. यानंतर, ती बटाट्यांना ऑलिव्ह ऑइलने कोट करते आणि 15 मिनिटे एअर फ्रायरमध्ये ठेवते. मग अंड्यांसाठी, ती ऑलिव्ह ऑइलमध्ये टोमॅटो आणि कांदे परतून, त्यात 3-4 अंडी फोडते आणि स्क्रॅम्बल करते. लिडियाचा दावा आहे की हा नाश्ता तिला दिवसभर ऊर्जा देतो आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतो.
अंडी आणि बटाटे खाऊन वजन कमी होऊ शकतं का?
वजन कमी करण्याचा हा खरंच योग्य उपाय आहे का
या रेसिपीबद्दलचा हा दावा खरा असू शकतो का? असा प्रश्न आम्हाला पडला आणि याचे उत्तर ग्रेटर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलच्या पोषण आणि आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. किरण सोनी यांनी दिलं आहे. त्यांनी सांगितले की, अंडी आणि बटाटे हे वजन कमी करण्याच्या आहाराचा एक भाग मानले जाऊ शकतात, परंतु दररोज नाश्त्यात फक्त या गोष्टी खाणे हे वजन कमी करण्यासाठी हे दोनच पदार्थ खाणे हे फायद्याचे नाही तर त्याने नुकसान होऊ शकते.
हेदेखील वाचा – WWE सुपरस्टार बटिस्टाने कमी केले 22 किलो वजन; जाणून घ्या वेट लॉस जर्नी
काय असणे आवश्यक
कोणत्या पदार्थांचे करावे सेवन
वजन कमी करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कॅलरीजचे सेवन तुम्ही किती कॅलरी बर्न करताय यापेक्षा कमी असेल. जरी तुम्ही अंडी आणि बटाटे खात असाल तरी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहाराचे पालन करणे अधिक प्रभावी आहे. त्यात संतुलित प्रमाणात प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे असणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांचा सल्ला
डॉक्टर सोनी म्हणतात की वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संतुलित, कॅलरी-नियंत्रित आहार आणि नियमित व्यायामाचा समावेश, व्यक्तीच्या गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार. तसेच, आहारात कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुम्ही केवळ व्हिडिओ पाहून अथवा कोणताही दावा वाचून वा ऐकून त्यानुसार करणे हा तुमच्या आरोग्यासाठी खेळ ठरू शकतो आणि त्रासही होऊ शकतो.
हेदेखील वाचा – तांदळामुळे ढेरी वाढत चालली आहे? जाणून घ्या वेट लॉस करण्यासाठी कोणता तांदूळ आहे उत्तम
लिडियाने शेअर केलेला व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.