(फोटो सौजन्य – istock)
Cardamom water : कोणत्या जादूहुन कमी नाही ‘वेलचीचे पाणी’, फायदे ऐकाल तर रोजच प्याल
पुरेपूर झोप न घेणे किंवा झोपेचा अभाव आपल्या मनावर आणि शरीरावर विषासारखे काम करते. त्याचे तात्काळ परिणाम म्हणजे एकाग्रता कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी असणे, मूड बदलणे आणि प्रतिक्रिया वेळ कमी होणे, तर आंतरिक परिणाम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे आणि हार्मोनल संतुलन बिघडणे.
डिमेंशिया आणि स्ट्रोकचा धोका वाढतो
तुमच्या झोपेच्या अभावामुळे अल्झायमर, डिमेंशिया आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. इंदूर येथे झालेल्या न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या ७३ व्या राष्ट्रीय परिषदेत, “NSICON २०२५” उपस्थित असलेल्या तज्ज्ञांनी झोपेचा अभाव हे चिंतेचे कारण असल्याचे सांगितले. त्यांच्या मते सरासरी किमान झोपेचा अवधी हा ७ ते ८ तास असावा.
जेव्हा एखादी व्यक्ती दररोज ६ तास किंवा त्याहून कमी झोप घेते तेव्हा हृदय आणि मेंदूवर याचा विपरीत परिणाम घडून येतो. तुम्हाला तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असल्यास तुम्ही ७ ते ८ तासांची झोप घ्यायला हवी. यासाठी रात्री लवकर झोपणे हा एकमेव पर्याय आहे. तुम्ही पूर्ण झालेली झोप मेंदूला त्याच्या क्षमतेने कार्य करण्यास मदत करते आणि मेटाबॉलिजम संतुलित राखते.
मेंदूतील विषारी पदार्थ
पुरेशा झोपेच्या वेळी मेंदूतील पेशी द्रवपदार्थांच्या मदतीने मेंदूतील कचरा साफ करतात. पण अपुऱ्या झोपेमुळे हा कचरा (जसे की अल्झायमरशी संबंधित प्रथिने) जमा होत राहतात, ज्यामुळे आकलनशक्ती आणि एकूण मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
कमजोर स्मरणशक्ती
पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदूत विषारी पदार्थ जमा होतात, ज्याचा नकारात्मक परिणाम स्मरणशक्तीवर होऊ लागतो.
हृदयविकाराचा धोका
कमी झोपेमुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज आणि लठ्ठपणासारख्या समस्या वाढतात. या समस्या हृदयविकाराच्या धोका वाढवतात.
मूड स्विंग्स आणि ताण
६ तासांची झोप मूड स्विंग्स आणि ताण वाढवते, कारण अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला ताण व्यवस्थापित करणे कठीण होते, ज्यामुळे चिडचिडेपणा येतो.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
६ तासांची झोप रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते कारण पुरेशी झोप न मिळाल्याने शरीर विषाणू आणि संसर्गाशी लढण्यास कमी सक्षम होते, ज्यामुळे सर्दीसारख्या सामान्य आजारांची शक्यता वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
मेंदू जलद वृद्ध होतो
कमी, अपुरी झोप आपल्या मेंदूच्या कार्यावर वाईट परिणाम करते ज्यामुळे मेंदूचे कार्य बिघडू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






