Maharashtra Breaking News Updates Today:
पुणे: भारतीय हवामान विभागाने (IMD) १५ जून २०२६ रोजी राज्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, प्रत्यक्षात मान्सून अजूनही अरबी समुद्रातच खोळंबला असून त्याची पुढील वाटचाल पूर्णपणे थांबली आहे. अरबी समुद्रातून पुढे सरकण्याऐवजी मान्सून एकाच ठिकाणी रेंगाळला असून, आता राज्यात २० जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा नवीन अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे. या विलंबाने राज्यातील बळीराजाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.
15 Jun 2026 04:57 PM (IST)
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडलेल्या चोरीच्या घटनेचा दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत गोंदिया जिल्ह्यातील चार आरोपींना अटक केली आहे. एस.एस. इलेक्ट्रिकल कंपनीच्या सुपर प्लॅन्टमधून लाखो रुपयांच्या अॅल्युमिनियम तारा आणि लोखंडी पोल चोरी करणाऱ्या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ₹५८,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून दहिवडी पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे. वाचा सविस्तर...
15 Jun 2026 04:47 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिक अडचणीतून जात असताना एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयासमोर घंटानाद आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कृती समितीच्या नेत्यांनी अर्थ खात्यावर जोरदार टीका करत एसटीच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाल्याचा इशारा दिला. वाचा सविस्तर...
15 Jun 2026 04:37 PM (IST)
Job Marriage Rules 2026: चांगली नोकरी आणि सुरक्षित भविष्याचे स्वप्न प्रत्येक तरुण पाहत असतो. अनेक जण नोकरी मिळाल्यानंतर लग्नाचा विचार करतात, परंतु काही असे व्यवसाय आहेत, जिथे नोकरीत रुजू होताना किंवा ट्रेनिंगदरम्यान लग्न करण्याची परवानगी नसते. हे ऐकून आश्चर्य वाटू शकते, पण हे पूर्णपणे खरे आहे. या नियमांचा उद्देश कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणे हा नसून, नोकरीची संवेदनशीलता, कठीण प्रशिक्षण (Training) आणि कार्यक्षमता टिकवून ठेवणे हा असतो. विशेषतः सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित नोकऱ्यांमध्ये हे नियम आजही लागू आहेत. वाचा सविस्तर...
15 Jun 2026 04:27 PM (IST)
फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धा सध्या रोमांचक सामन्यांमुळे चर्चेत असली तरी मैदानाबाहेरील एका अनपेक्षित घटनेने जगभरातील फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेक्सिकोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मेक्सिको येथील ग्वाडालाजारा येथे दक्षिण कोरियाच्या संघाच्या सामन्यापूर्वी लाईव्ह रिपोर्टिंग करत असलेल्या एका दक्षिण कोरियन टीव्ही पत्रकाराच्या गालावर एका महिला चाहत्याने अचानक चुंबन घेतल्याचे दिसत आहे. लाइव्ह कॅमेऱ्यासमोर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ काही तासांतच लाखो लोकांपर्यंत पोहोचला. वाचा सविस्तर...
15 Jun 2026 04:17 PM (IST)
India W Vs Pakistan W: काल आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत अन् पाकिस्तानमध्ये महामुकाबला पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६४ रन्सने पराभव केला आहे. पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर अपयशी ठरले. अखेर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाने पराभवाचे खापर कोणावर फोडले आहे ते जाणून घेऊयात. वाचा सविस्तर...
15 Jun 2026 04:06 PM (IST)
जागतिक स्थिती बिघडली असताना सगळ्यांना तोडा भोगावा लागला होता. देशाच्या भू-राजकीय परिस्थिती आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीमुळे, अनेक गुंतवणूकदार आता पुन्हा एकदा सुरक्षितता आणि स्थिरतेच्या शोधात निघाले आहे. अमेरिका-रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरात आर्थिक चिंता वाढली असताना अशा वातावरणात, FD लक्ष वेधून घेत आहेत, कारण त्या शेअर बाजारात नेहमी दिसणाऱ्या चढ-उतारांशिवाय चांगले व्याजदर देतात. त्यामुळे FD वर बराच विश्वास वाढतो. आताही एक बँक चांगला व्याजदर देत आहे. वाचा सविस्तर...
15 Jun 2026 03:55 PM (IST)
Central Bank Recruitment: बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये अप्रेंटिसशिपच्या (Apprenticeship) तब्बल ४५०० पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी १२ जून २०२६ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी, पात्र आणि इच्छुक उमेदवार ‘नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम’च्या nats.education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन २२ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वाचा सविस्तर
15 Jun 2026 03:50 PM (IST)
आधी शिवसेना, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या पक्षफुटीवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच फैलावर घेतले आहे,‘तुमचे कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्यासाठी ठेवले आहेत का? दुसऱ्यांचे पक्ष कशाला फोडता?” असा खरमरीत सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपसह आरएसएसवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या उपस्थित होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी यावर भाष्य केले. वाचा सविस्तर
15 Jun 2026 03:45 PM (IST)
बंगळूरू: बंगळुरूमधील ब्यादराहल्ली परिसरातून एक धक्कादायक प्रेमप्रकरण समोर आलं आहे. प्रेमसंबंधांना विरोध होत असल्याच्या रागातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या वडिलांना फोन करून “मी तुझ्या मुलीला मारलं” अशी कबुली दिल्यानंतर आरोपी तिच्या मृतदेहाशेजारीच बेशुद्ध अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. नेमकं काय घडलं?
15 Jun 2026 03:40 PM (IST)
टेक कंपनी HMD ने गेल्या महिन्यात भारतात त्यांच्या Vibe सीरीजमधील एक नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने त्यांचा हा स्मार्टफोन HMD Vibe 2 5G या नावाने लाँच केला होता. कंपनीने HMD Vibe 2 5G स्मार्टफोनचे दोन स्टोरेज व्हेरिअंट सादर केले होते, ज्यामध्ये 4GB + 64GB आणि 4GB + 128GB यांचा समावेश होता. यानंतर आता कंपनी या स्मार्टफोनचे आणखी एक नवीन व्हेरिअंट घेऊन आली आहे. लोकांची वाढती मागणी पाहून स्मार्टफोन 6GB+128GB या नवीन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आला असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. वाचा सविस्तर
15 Jun 2026 03:35 PM (IST)
नाशिक: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीने आता कमालीची रंगत पकडली आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना महायुतीने आपल्या नगरसेवकांवर कडक ‘वॉच’ ठेवण्याची मोहीम सुरू केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात अधिकृतपणे तीन उमेदवार असले, तरी दोघांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या त्यांची नावे मतपत्रिकेवर कायम राहणार असल्याने महायुतीच्या गोटात अस्वस्थता वाढली असून, नगरसेवकांना सहलीवर पाठवून मतांची सुरक्षितता राखण्यासाठी ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू झाले आहे. वाचा सविस्तर
15 Jun 2026 03:30 PM (IST)
Pakistan Plane Crash News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले असून यात दोन वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. तर तीनजण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा एक भयावह व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा संपूर्ण घटना
15 Jun 2026 03:25 PM (IST)
Tamil Nadu CM Vijay Divorce Case: तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आणि त्यांच्या विभक्त पत्नी संगीता सोरनालिंगम यांनी दाखल केलेल्या घटस्फोट याचिकेवरील सुनावणी, जी सोमवार, १५ जून रोजी होणार होती, ती आता ७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी सोमवारी सकाळी १०:३० वाजता चेंगलपट्टू महिला न्यायालयात होणार होती, परंतु ती तात्काळ पुढे ढकलण्यात आली. वाचा सविस्तर
15 Jun 2026 03:20 PM (IST)
PMRC Scheme 2026: जर तुम्ही एक संशोधक (Researcher) असून आर्थिक मदतीसाठी एखाद्या सरकारी फेलोशिपचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर शिक्षण मंत्रालयाची ‘प्राईम मिनिस्टर रिसर्च चेअर स्कीम’ (Prime Minister Research Chair Scheme – PMRC 2026) तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. शिक्षण मंत्रालयाने भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांसाठी आणि संशोधकांसाठी ‘PMRC 2026’ या विशेष उपक्रमाची सुरुवात केली आहे. वाचा सविस्तर
15 Jun 2026 03:15 PM (IST)
सुपरमॉडेल, अभिनेता आणि फिटनेस आयकॉन म्हणून ओळखले जाणारे Milind Soman यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या अनोख्या उपक्रमाची माहिती दिली आहे. लोणावळ्यातील त्यांच्या मालमत्तेवर त्यांनी स्वतः 30 हजारांहून अधिक झाडे लावल्याचा खुलासा केला आहे. यासोबतच हिंदी चित्रपटांमध्ये कमी दिसण्यामागील कारणावरही त्यांनी भाष्य केले. वाचा सविस्तर
15 Jun 2026 03:10 PM (IST)
India W Vs Pakistan W Updates: काल आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कपमधील महामुकाबला पार पडला. भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. भारताने या सामन्यात ६४ रन्सने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. भारताच्या गोलंदाजांनी अफलातून मारा करत विजयावर आपले नाव कोरले. दरम्यान पहिलाच वर्ल्ड कप सामना खेळणाऱ्या श्री चरणीने शानदार रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. वाचा सविस्तर
15 Jun 2026 03:05 PM (IST)
ठाणे: ठाणे जिल्ह्यातून एका धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडी परिसरात एका व्यक्तीवर बाथरूमच्या खिडकीतून दोन महिलांचे गुपचूपपणे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी एफआरआय दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. मात्र आरोपी सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. वाचा नेमकं काय घडलं?
15 Jun 2026 02:59 PM (IST)
पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदी सरकारचं बळ वाढण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसमधील 20 बंडखोर खासदारांनी NCPI मध्ये विलीन होऊन NDAला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलीये. यामुळे लोकसभेतील सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार काही महत्त्वाची घटनादुरुस्ती विधेयके आणि धोरणात्मक विधेयके मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशावेळी मोदी सरकारच्या विधेयकांना अतिरिक्त पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा संसदेतील समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळेल.
15 Jun 2026 02:49 PM (IST)
ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या खासदारांना भेटल्याची माहिती समोर आलीय. शिवसेना UBTचे खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांची भेट घेतलीय. दिल्लीत प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय. विशेष म्हणजे संजय देशमुख हे काल मातोश्रीवर झालेल्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.
15 Jun 2026 02:39 PM (IST)
नाफेडच्या कांदा खरेदीकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवलीय. खरेदीचे उद्दिष्ट अपयशी ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. 30 जूनपर्यंत एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट असताना, आतापर्यंत केवळ 260 मेट्रिक टन खरेदी झाली आहे. नाफेडनं भाववाढ देऊनही खरेदीला गती मिळालेली नाही. त्यामुळे पुढील 15 दिवसांत उद्दिष्ट पूर्ण करण्याचं मोठं आव्हान नाफेडसमोर आहे.
15 Jun 2026 02:30 PM (IST)
सरकारच्या ऑपरेशन टायगरवर शर्मिला ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांना तेवढच करायचं आहे. दुसरे पक्ष फोडायचे. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजप, RSS विश्व हिंदु परिषदेत काम करणारी खूप चांगली मुलं आहेत, होती. कुठे आहेत ती आता? त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? असा सवाल त्यांनी केला.
15 Jun 2026 02:19 PM (IST)
नवी मुंबईत आरोग्य सेवांच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळण्यात आलंय. त्यामुळे नवा वाद पेटलाय. पत्रिकेत वनमंत्री गणेश नाईक, खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांची नावे समाविष्ट आहेत. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही एकनाथ शिंदेंचं नाव गायब असल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालीय.
15 Jun 2026 02:10 PM (IST)
पंढरपुरातील तांदूळवाडी गावाता झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झालेत. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तेथील एका स्थानिक मजुरानं स्वतःचा जीव धोक्यात घालून 2 वर्षांच्या बालकासह 5 जणांचे प्राण वाचवलेत. त्याच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय.
15 Jun 2026 02:00 PM (IST)
जागतिक तणावावर शांतता कराराचं उत्तर मिळाल्यानंतर आता शेअर मार्केट स्थिरस्थावर झालेलं आहे. लाल पट्टीत चालणारं मार्केट आता हिरव्या रंगांत रंगत आहेत. या सगळ्यात शेअर मार्केटमध्ये एका कंपनीने त्यांच्या गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली आहे. ही कंपनी आहे वेदांता ग्रुप. नेमकी काय आहे ही आनंदाची बातमी आणि त्याचा कसा सकारात्मक परिणाम झाला आहे. समजून घेऊयात.
15 Jun 2026 01:55 PM (IST)
कोरेगावहून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघालेल्या तीन तरुण अभियंत्यांच्या कारला रविवारी पहाटे पावणे एक वाजण्याच्या सुमारास पंढरपूर–मल्हारपेठ राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. वडोली भिकेश्वर हद्दीतील कवठे फाटा वळणावर भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती अनेक पलट्या खात शेतात जाऊन कोसळली. या दुर्घटनेत कारचालक अभियंता ओंकार अनिल खंडागळे (वय २३, रा. पाटण, मूळ रा. बीड) यांचा मृत्यू झाला. एक जण गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे.
15 Jun 2026 01:50 PM (IST)
आपल्याला युट्यूबवर एखादा व्हिडीओ आवडला आणि तो व्हिडीओ मित्रांसोबत शेअर करायचा असेल तर आपण व्हिडीओची लिंक कॉपी करतो आणि व्हॉट्सअॅपवरून मित्राला शेअर करतो. पण आता यापुढे असं होणार नाही. आता युट्यूबवरील व्हिडीओ मित्रांना शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपची गरज लागणार नाही. कारण युट्यूबने काही दिवसांपूर्वीच इन-अॅप चॅटिंग फीचर रोल आउट केले आहे. आता कंपनी हे नवीन फीचर अमेरिका, यूके, ब्राझील, इटली आणि सिंगापुरसह 40 हून अधिक देशांमध्ये रोलआऊट करण्याचा विचार करत आहे.
15 Jun 2026 01:45 PM (IST)
एकीकडे भारतातील सरकारी टेलिकॉम कंपन्या महागडे रिचार्ज प्लॅन लाँच करत आहे, तर दुसरीकडे भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) त्यांच्या करोडो यूजर्ससाठी सतत नवीन ऑफर्स आणि रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. आता देखील कंपनीने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरबाबत कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
15 Jun 2026 01:40 PM (IST)
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात एक ऐतिहासिक क्रांती घडली आहे. मानवी मेंदू आणि संगणक यांना थेट जोडणाऱ्या ‘ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस’ (BCI) तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणाच्या (Commercialization) जागतिक शर्यतीत चीनने जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क (Elon Musk) यांना मोठा धक्का दिला आहे. मस्क यांच्या ‘जीझस-लेव्हल’ म्हटल्या जाणाऱ्या ‘न्यूरालिंक’ (Neuralink) कंपनीला मागे टाकत चीनने जगातील पहिल्या व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या ब्रेन चिपला अधिकृत मंजुरी दिली आहे. ‘निओ’ (NEO) नावाचे हे नाण्याएवढ्या आकाराचे इम्प्लांट, व्यावसायिक विक्रीसाठी आणि रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय मंजुरी मिळवणारे जगातील पहिले शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाणारे ब्रेन उपकरण ठरले आहे.
15 Jun 2026 01:35 PM (IST)
अमेरिकेतील नामांकित स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या (Stanford University) १३५ व्या दीक्षांत समारंभात एक धक्कादायक आणि अभूतपूर्व प्रकार समोर आला आहे. जगातील आघाडीची टेक कंपनी ‘गुगल’चे (Google) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई हे जेव्हा विद्यापीठाच्या स्टेडियममध्ये मुख्य वक्ता म्हणून भाषण देण्यासाठी मंचावर आले, तेव्हाच शेकडो पदवीधर विद्यार्थ्यांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला. पिचाई यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताच विद्यार्थ्यांच्या काही गटांनी शिट्ट्या वाजवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि हातामध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे व फलक घेऊन ‘फ्री, फ्री पॅलेस्टाईन’ अशा घोषणा देत थेट समारंभातून बाहेर पडणे (Walkout) पसंत केले. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे स्टेडियममधील वातावरण काही काळासाठी अत्यंत तणावपूर्ण बनले होते.
15 Jun 2026 01:30 PM (IST)
नागपुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका 24 वर्षीय विवाहित महिलेला आधी पेयात गुंगीचं औषध देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आले, त्यानंतर ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळण्यात आले. एवढंच नाही तर काळी जादू, संमोहन आणि सक्तीच्या धर्मांतराच्या नावाखाली तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
15 Jun 2026 01:25 PM (IST)
पश्चिम आशियातील तणावामुळे गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पण शांतता कराराचा परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे भडकलेल्या किंमतींचा कल मंदावण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता कराराची घोषणा केल्यानंतर आणि होर्मुझची सामुद्रधुनी टोलमुक्त पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. नेमका काय परिणाम झाला आणि आणखी किती बदल होऊ शकतो? जाणून घेऊयात.
15 Jun 2026 01:15 PM (IST)
तेलंगणा येथून एक थरारक हत्याकांड समोर आलं आहे. लग्नाच्या तब्बल १५ वर्षानंतर दोन मुलांची आई असलेल्या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हा सगळं प्रकार तिने पतीच्या इन्शुरन्सचे पैसे हडप करण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. (Telangana Crime) महिलेने पतीच्या हत्येला अपघाताचं रूप देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसात तशी तक्रारही नोंदवली. मात्र पोलिसांनी या कटाचा खुलासा केला. हा प्रकार तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील सदाशिवनगर मंडळाच्या मारकल गावात घडली.
15 Jun 2026 01:05 PM (IST)
कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो पुन्हा चर्चेत आले आहेत. पण यावेळी कोणत्याही राजकीय वक्तव्यामुळे नव्हे, तर त्यांच्या अमेरिकेच्या फिफा वर्ल्डकपमधील उपस्थितीमुळे ते चर्चेचा विषय बनले आहेत. यामुळे कॅनडात मोठा वाद पेटला आहे. त्यांच्यावर नागरिकांवी ताव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे. जाणून घेऊयात.
15 Jun 2026 01:02 PM (IST)
गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला खडकी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. रेंजहिल्स परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून गांजा, महागडा मोबाइल संच असा दहा लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिकेत नीरज मलिक (वय २८, रा. सिद्धीविनायक सोसायटी, एनडीए रस्ता, शिवणे) याला अटक करण्यात आली आहे.
15 Jun 2026 12:48 PM (IST)
बेल्हे येथील ढोलेमळा परिसरात जुन्या आर्थिक वादातून एका शेतकऱ्याला दगड आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन एकनाथ गुंजाळ (वय ३०, रा. बेल्हे रानमळा, ता. जुन्नर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना दिनांक ९ जून रोजी सायंकाळी सुमारे ५.४६ वाजण्याच्या सुमारास बेल्हे-आळकुटी रस्त्यावरील चारंगबाबा मंदिराजवळ घडली आहे. फिर्यादी नितीन गुंजाळ हे शेतात खत पांगविण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना समोरून मोटारसायकलवर आलेल्या चंद्रकांत सखाराम गुंजाळ यांच्याशी त्यांचा वाद झाला. यावेळी चंद्रकांत गुंजाळ यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर वेदांत शशिकांत गुंजाळ याने दगडाने नाकावर वार केल्याने रक्तस्त्राव झाल्याचे, तर बबलू शशिकांत गुंजाळ याने लोखंडी रॉडने पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पुन्हा दगडाने डोक्यावर मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद सोडविला.
15 Jun 2026 12:36 PM (IST)
बिबवेवाडीतील अप्पर डेपो परिसरात रिक्षाचालक तरुणाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शस्त्राच्या धाकाने तरुणाकडील मोबाईल, रोकड आणि रिक्षा घेऊन चोरटे पसार झाले आहेत. दोन दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्याला बेदम मारहाण देखील केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात सिद्धेश्वर मुंढे (वय १९, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, चार अनळखी चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
15 Jun 2026 12:24 PM (IST)
माळेगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करत अक्षय कल्याण तावरे (वय ३५, रा. सांगवी, ता. बारामती, जि. पुणे) याला विनापरवाना बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे व दोन वापरलेल्या काडतुसांच्या पुंगळ्यांसह एकूण १ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शंकर मोरे यांच्या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५४/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(३५), ५(२५) व २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
15 Jun 2026 12:12 PM (IST)
‘खाकी’ म्हणजे शिस्त, धाक आणि विश्वास अशी ओळख असलेल्या पोलिस दलालाच आता भ्रष्टाचाराचा डाग लागल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या दीड वर्षांत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल २० जणांना सापळा रचून पकडले आहे. या घटनांनी सर्वसामान्यांत पोलिसांविषयी अविश्वासाची भावना वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पुणे ग्रामीण भागात सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली असून, भ्रष्टाचारविरोधी यंत्रणांसमोर हे मोठे आव्हान ठरत आहे.
15 Jun 2026 12:00 PM (IST)
भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात विजयाने केली आहे. दीप्ती शर्माने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १० धावा देत ५ बळी घेतले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वीचा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर होता. तिने २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११ धावांत ५ बळी घेतले होते. महिला टी-२० विश्वचषकातील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. ५० षटकांच्या वर्ल्ड कपमध्येही मागच्या वर्षी दीप्ती शर्माने कमालीची कामगिरी केली होती. ऑल राऊंडर असणारी दीप्ती शर्मा ही भारताची शान आहे.
15 Jun 2026 11:50 AM (IST)
जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आखाती देशांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रचंड तणावानंतर आणि तब्बल १०७ दिवसांच्या युद्धानंतर अमेरिका आणि इराणने अखेर शांतता कराराची घोषणा केली आहे. या दोन महासत्तांमधील संघर्ष संपल्यामुळे जागतिक स्तरावर युद्धाचे सावट दूर झाले असून, याचा थेट आणि मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या (Crude Oil) बाजारावर पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक करारानंतर अवघ्या काही तासांतच जागतिक तेल बाजारात ४ टक्क्यांहून अधिक मोठी घसरण नोंदवली गेली आहे. तेल पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने ग्रासलेल्या जागतिक बाजाराला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
15 Jun 2026 11:40 AM (IST)
भारताच्या धीरज बोम्मादेवराने तुर्कस्तानमधील अंताल्या येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात एक संस्मरणीय कामगिरी केली. रविवारी कुमकुम मोहोडसोबत मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्यानंतर, त्याने वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारातही सुवर्णपदक जिंकून दुहेरी सुवर्णपदक पटकावले. २४ वर्षीय धीरजने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण कोरियाच्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता ली वू-सेओकचा ७-३ असा पराभव केला. या विजयामुळे त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठे विजेतेपद मिळवले.
15 Jun 2026 11:40 AM (IST)
सध्या एक अत्यंत संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही तरुण कारच्या छतावर उभे राहून डान्स करत आहे. तर काहीजण खिडकीतून अर्ध बाहेर लटकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कपडे काढून त्यांचा हा उर्मटपणा सुरु आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा हिमाचलमधील प्रसिद्ध पर्यटनस्थल कसोल येथील आहे.
15 Jun 2026 11:30 AM (IST)
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि चॅटजीपीटी (ChatGPT) सारख्या प्रगत साधनांनी (Tools) शिक्षण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणली आहे. आज विद्यार्थी अवघड प्रश्नांची उत्तरे, नोट्स, असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्सची माहिती काही सेकंदांत मिळवू शकतात. यामुळे अभ्यास पूर्वीपेक्षा खूपच सोपा आणि वेगवान झाला आहे. मात्र, याच्या वाढत्या वापरासोबतच एक नवीन चिंताही समोर येत आहे की, यामुळे विद्यार्थी स्वतः विचार करण्याची आणि समजून घेण्याची सवय तर गमावून बसत नाहीयेत ना?
15 Jun 2026 11:30 AM (IST)
उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे 26 वर्षीय सहाय्यक शाखा पोस्टमास्तर निखिल वर्मा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळ आणि पैशांच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी दोन अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
15 Jun 2026 11:20 AM (IST)
मध्यपूर्वेत गेल्या चार महिन्यांपासून अमेरिका(America)-इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. अखेर हा संघर्ष संपवण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली. त्यांनी जगातील महत्त्वाचा व्यापारी वाहतूकीचा समुद्री मार्ग होर्मुझही कोणत्याही शुल्काशिवाय खुला केल्याचे म्हटले. आपल्या सैन्याला तातडीने नाकेबंदी हटवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीने हा करार झाल्याचे सांगितले जात आहे. पण इराणने मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे करार झाला का नाही याबाबत शंका कायम आहे.
15 Jun 2026 11:15 AM (IST)
‘कॉकरोच इज बॅक’च्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये, प्रकाश राज हे कार्यकर्त्या सोनम वांगचुक आणि सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके याच्यासोबत उभे असलेले दिसले. ते म्हणाले, “निवडलेल्या नेत्यांनी आपलं काम करायला हवं! तुम्ही समीकरण का बदललं आहे? तुम्ही तुमचं काम करण्याऐवजी राजकारण खेळत आहात. नाही! या देशातील तरुणांनी स्वतःची लढाई स्वतः लढण्याचा निर्णय घेतला आहे. या देशातील तरुण दलित आहेत. काका आणि काकू, तुम्ही निवृत्तीनंतरही या देशावर राज्य करत आहात. निघून जा. आम्ही तरुण आमच्या भविष्यासाठी लढत आहोत. हे तरुण त्यांच्या स्वप्नांसाठी लढत आहेत.”
15 Jun 2026 11:05 AM (IST)
महावितरण कंपनीच्या उदासीन व आडमुठ्या धोरणामुळे सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक मसूर गाव सध्या भीषण पाण्याच्या संकटात आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत मंजूर झालेली १४ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना पूर्णत्वास आली. मात्र केवळ एका वीज कनेक्शनअभावी संपूर्ण गावाला पाण्यासाठीची भटकंती सुरू आहे….. एकंदरीत महावितरणने मसूरची पेयजल योजना रखडवली.
15 Jun 2026 10:59 AM (IST)
पंतप्रधान मोदींचे ब्रातिस्लावा येथे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत कोणत्याही फुलांच्या हाराने किंवा बुके देऊन करण्यात आले नाही, तर त्यांना पारंपरिक पद्धतीने ‘ब्रेड आणि मीठ’ (Bread and Salt) अर्पण करण्यात आले. ही केवळ एक साधी स्वागत प्रथा नसून स्लोव्हाकियाच्या संस्कृतीतील आणि स्लाव्हिक (Slavic) परंपरेतील सर्वात जुनी, आदरणीय आणि पवित्र प्रथा मानली जाते. परदेशी पाहुण्यांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचा आणि त्यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करण्याचा हा एक अनोखा मार्ग आहे. स्लोव्हाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी पंतप्रधानांचे स्वागत करत या आदरातिथ्याची परंपरा पूर्ण केली.
15 Jun 2026 10:50 AM (IST)
Baba Ramdev tri-education model: भारतीय संस्कृती, आधुनिक विज्ञान आणि राष्ट्रसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि इतर केंद्रीय सेवांमधील अधिकाऱ्यांची जडणघडण करण्याच्या उद्देशाने ‘पतंजली’ने ‘पतंजली सिव्हिल सेवा अकादमी’ (Patanjali Civil Services Academy) सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक प्रशासकीय गरजांचा मेळ घालून भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेला एक नवीन दिशा देईल.
15 Jun 2026 10:41 AM (IST)
Emergency Alarm Service Suspended: तुम्हाला आठवतंय का काही दिवसांपूर्वी तुमच्या फोनवर इमर्जेन्सी अलार्म वाजला होता? अचानक वाजलेल्या या अलार्ममुळे सर्वत्र मोठा गोंधळ उडाला होता. याचसंबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजेच NDMA ने सेल ब्रॉडकास्ट सर्विस तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हा निर्णय खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत ही सेवा बंद राहणार आहे.






