Maharashtra Breaking News Updates Today:
कोकण किनारपट्टीसह राज्याच्या विविध भागांत सध्या मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. नैऋत्य मान्सून हळूहळू पुढे सरकत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित क्षेत्रांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
10 Jun 2026 05:31 PM (IST)
कर्जत : नेरळ रेल्वे स्थानकात काही अज्ञात लोकांनी जाहिरातीचे स्टिकर लावले. हे स्टिकर अख्या नेरळ स्थानकात जागोजागी लावण्यात आले आहेत.त्यामुळे नेरळ स्थानकाचे सौंदर्य नष्ट होण्यास मदत झाली असून नेरळ स्थानक परिसर विद्रूप करणाऱ्या जाहिराती मधील संबंधित कंपनीवर रेल्वेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी काही प्रवासी आणि नेरळ प्रवासी संघटनेने केली आहे.
कोणत्याही रेल्वे स्थानकात जाहिरात फलक लावण्याचे कंत्राट मध्य रेल्वे कडून दिले जातात.त्यात उपनगरीय लोकल मधील जाहिराती यांचा देखील समावेश असून उपनगरीय लोकल मध्ये परवानगी विना आपल्या संस्थेची जाहिराती करणारे स्टिकर लावणाऱ्यावर कारवाई केली जात असल्याने असे बेकायदा स्टिकर लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रकारे कोणत्याही स्थानकात असे बेकायदा फलक लावण्याचे प्रमाण नगण्य आहे.मात्र नेरळ सारख्या मध्य रेल्वे वरील नव्याने मेकओव्हर केलेल्या जंक्शन रेल्वे स्थानकात दोन दिवसात असंख्य जाहिरात स्टिकर लावण्यात आले.
10 Jun 2026 05:21 PM (IST)
Gokul Sugar Factory FRP: गोकूळ शुगर (धोत्री) कारखान्याकडे थकीत असलेल्या ऊस बिलाच्या प्रमुख मागणीसाठी ‘गोकूळ थकीत ऊस बिल शेतकरी व शेतकरी संघर्ष समिती, तुळजापूर व अक्कलकोट’ यांच्या वतीने बुधवारी (दि. १० जून २०२६) सोलापूर येथील विजापूर रोडवरील कंबर तलावात तीव्र ‘जलसमाधी’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा बुधवारी सतरावा दिवस होता. या आंदोलनात सुमारे एक ते दीड हजार शेतकरी सहभागी झाले होते. (Farmers Protest)
10 Jun 2026 05:11 PM (IST)
TMC Merger In Congress: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर, तृणमूल काँग्रेस (TMC) सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे. पक्षात पडलेल्या मोठ्या फुटीच्या पार्श्वभूमीवर, TMC आणि काँग्रेस यांच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोन्ही पक्षांशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्यास ममता बॅनर्जी तयार आहेत, परंतु त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यामार्फत राहुल गांधींसमोर काही अटी ठेवल्या आहेत. या प्रकरणाची मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींसोबतच्या बैठकीत यावर चर्चा केली. TMC नेत्याने अशी मागणी केली की, ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवले जावे आणि वरिष्ठ सभागृहात (राज्यसभेत) विरोधी पक्षनेतेपद दिले जावे. मात्र, या प्रस्तावावर काँग्रेस पक्षाची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
10 Jun 2026 05:01 PM (IST)
भारतात चहा हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळची सुरुवात असो, ऑफिसमधील ब्रेक असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा, चहाशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. मात्र काही लोकांना चहा प्यायल्यानंतर लगेच अॅसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणे किंवा आंबट ढेकरांचा त्रास सुरू होतो. त्यामुळे ‘चहा पिताच अॅसिडिटी का होते?’ हा प्रश्न अनेकांना पडतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामधील काही घटक आणि चुकीच्या वेळेला घेतलेला चहा पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकतो. परंतु, यामागचे खरे कारण कोणते, जाणून घेऊयात.
10 Jun 2026 04:50 PM (IST)
रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये ४९ कोटी डॉलर्सची घट झाली आहे, ज्यामुळे जागातील श्रीमंतीच्या यादीत ते चार स्थानांनी खाली घसरले आहेत. इतकेच नव्हे तर, मुकेश अंबानी आशियातील श्रीमंतांच्या यादीतूनही एका क्रमांकाने खाली आले आहेत. याशिवाय त्यांच्या एकूण संपत्तीत २०.८ अब्ज डॉलर्सची घट नोंदवली गेली आहे.
10 Jun 2026 04:40 PM (IST)
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटने अनेक विक्रम मोडीत काढणारा ‘किंग’ विराट कोहली आता मैदानाबाहेरही जाहिरात आणि बिझनेसच्या दुनियेत राजा बनला आहे. ‘फॉर्च्यून इंडिया’ आणि जागतिक ब्रँड कन्सल्टन्सी ‘इंटरब्रँड’ यांनी देशातील २५ सर्वात मौल्यवान सेलिब्रिटीजची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामध्ये विराट कोहली हा सर्वात महागडा सेलिब्रिटी ठरला आहे.
10 Jun 2026 04:28 PM (IST)
आजच्या डिजिटल युगात लॅपटॉप हे विद्यार्थ्यांपासून ते ऑफिस कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले आहे. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण आणि सतत स्क्रीनसमोर काम करण्याची वाढती सवय यामुळे अनेकजण दिवसाचे ८ ते १० तास लॅपटॉपसमोर घालवत आहेत. मात्र, या सवयीमुळे शरीरावर गंभीर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. चुकीची बसण्याची पद्धत, सतत स्क्रीनकडे पाहणे आणि मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करणे यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होत आहेत.
10 Jun 2026 04:19 PM (IST)
महाराष्ट्र सरकारने २२,६११ कोटी रुपयांच्या (अंदाजे २.२ अब्ज अमेरिकन डॉलर्स) पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये घोडबंदर रोड आणि भाईंदरला जोडणारा बोगदा व उन्नत मार्ग, तसेच नवी मुंबई मेट्रोच्या विस्ताराचा समावेश आहे. लाईन २ नवी मुंबई मेट्रोला आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडेल. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दिशेने हे निर्णय एक मोठे पाऊल मानले जात आहे.
10 Jun 2026 03:55 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ प्रभावी अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, छावणी मंडळे, सिडको, एमआयडीसी तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना हे आदेश दिले असून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष ‘एसडब्ल्यूएम कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापन अनुच्छेद २१ अंतर्गत नागरिकांच्या जीवनाच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी (शहरी व ग्रामीण) या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:50 PM (IST)
PM Modi France Visit For G-7 : पॅरिस : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जून २०२६ मध्ये १३ ते १८ जून दरम्यान युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते १६ आणि १७ जून रोजी फ्रान्समध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्य इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार असून भारत फ्रान्स द्विपक्षीय संबंधावर यावेळी सविस्तर चर्चा होईल. तसेच पंतप्रधान मोदी युरोपीय राष्ट्र स्लोव्हाकियालाही भेट देणार आहेत. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:45 PM (IST)
NEET UG 2026 Career Options : नीट युजी २०२६ च्या (NEET-UG 2026) पुनरपरीक्षेमुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या मोठ्या मानसिक दबावाखाली आहेत. दरवर्षी देशातील या सर्वात मोठ्या वेैद्यकीय प्रवेश परीक्षेत लाखो उमेदवार बसतात. परंतु, मर्यादित जागांमुळे प्रत्येकालाच (MBBS) किंवा बीडीएस (BDS) अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे शक्य नसते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी निराश न होता, निर्णय घेणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता वैद्यकिय क्षेत्र केवळ NEET पुरते मर्यादित नाही, असे तज्ञांचे मत आहे. आज हेल्थकेअर सेक्टरमध्ये असे अनेक व्यवसाईक कोर्सेस उपलब्ध आहेत, जे उत्तम करिअर आणि चांगल्या कमाईची संधी देतात. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:40 PM (IST)
Where to Watch Live ICC World Cup 2026: आयसीसी महिला विश्वचषक 2026 स्पर्धा 12 जूनपासून सुरू होणार आहे. या महाकुंभासाठी सर्वच देशांचे संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. सर्व संघ सराव सामने खेळून आपल्या तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. भारताने पहिल्याच सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. दरम्यान आज आपण आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धा किती वाजता आणि कुठे पाहता येणार आहे याबाबत जाणून घेऊयात. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:35 PM (IST)
Congress Politics: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने तृणमूल काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतरही तृणमूल काँग्रेसची गळती सुरू झाली. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ८० आमदारांपैकी ५८ आमदारांनी स्वतःचा गट स्थापन केला आणि त्यानंतर दिल्लीतील सुमारे २० खासदारही टीएमसीमधून बाहेर पडले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांनी टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:30 PM (IST)
West Bengal Cabinet Portfolios: पश्चिम बंगालमधील सुवेंदू सरकारमध्ये मंत्र्यांमध्ये खात्यांचे वाटप करण्यात आले आहे. दूध कुमार मंडल यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर जगन्नाथ चट्टोपाध्याय यांच्याकडे उच्च शिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. दीपक बर्मन यांच्याकडे शालेय शिक्षणाचा कार्यभार देण्यात आला आहे. शंकर घोष यांची पर्यटन आणि संसदीय कामकाज मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जुन सिंग यांच्याकडे कामगार आणि वाहतूक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. नवीन मंत्र्यांना खाती मिळाल्याने, सरकार विविध क्षेत्रांतील आपल्या योजना आणि धोरणे पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करेल. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:25 PM (IST)
मुंबई: मुंबईतील दादर येथील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता कांदिवलीत पुन्हा एकदा बेस्ट बसच्या बेफाम वेगाने थरार निर्माण केला आहे. भरधाव बेस्ट बसने दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना ८ जून रोजी सकाळच्या सुमारास ११ वाजून ४० मिनिटांनी कांदिवलीच्या पोईसर डेपोजवळ घडली. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:15 PM (IST)
मार्क झुकरबर्गच्या मालकीची टेक कंपनी मेटाने एक मोठी घोषणा केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच कृत्रिम बिद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भारताची वाढती भुमिका लक्षात घेत मेटाने भारतातील त्यांच्या पहिल्या एआय डेटा सेंटरची घोषणा केली आहे. या खास योजनेसाठी कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनीने देशातील त्यांच्या पहिल्या एआय डेटा सेंटरसाठी जागा देखील निश्चित केली आहे. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:12 PM (IST)
भारताच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस, म्हणजेच १० जून २०२६ हा एका सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा दिवस ठरला आहे. देशाच्या लोकशाही प्रवासात अनेक मोठे राजकीय बदल झाले आहेत, परंतु आज घडलेली घटना ही पुढील अनेक दशके चर्चेत राहणारी आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा अथांग आणि अभेद्य मानला जाणारा एक ऐतिहासिक विक्रम अखेर मोडीत निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Longest Serving PM Modi)यांनी आपल्या १२ वर्षांच्या कार्यकाळात नेहरूंचा हा प्रदीर्घ काळ सत्तेत राहण्याचा मैलाचा दगड मागे टाकला आहे.
10 Jun 2026 03:10 PM (IST)
Apple Event 2026 Updates: टेक जायंट कंपनी अॅपलने अखेर आयफोन यूजर्ससाठी एक नवं आणि महत्त्वाचं फीचर जारी केलं आहे. कंपनीने ईव्हेंटमध्ये जारी केलेल्या iOS 27 अपडेटमध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल दिला आहे. खरं तर हे एक अतिशय सामान्य फीचर आहे आणि या फीचरचा वापर अंड्रॉईड यूजर्स गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. नवीन अपडेट यूजर्सना एकाच कॉमन साउंड सेटिंगवर अवलंबून राहण्याऐवजी रिंगटोन, अलार्म, टाइमर आणि सिस्टिम साउंड वॉल्यूमला वेगवेगळे एडजस्ट करण्याची सुविधा देतात. वाचा सविस्तर
10 Jun 2026 03:05 PM (IST)
Mumbai Job Ad Controversy : सध्या सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. यामध्ये नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमध्ये मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप केला जातोय. या जाहिरातीमध्ये फक्त गुजराती-मारवाडी अर्ज करू शकतात, असा उल्लेख केला असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील या नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाचा सविस्तर
10 Jun 2026 02:59 PM (IST)
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत वेगवान राजकीय घडामोडी घडू लागले आहेत. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला. ज्यानंतर या निर्णयाविरोधात अपील करणार असून समीर सत्तार यांचा अर्ज 100% स्वीकारला जाईल अशी खात्री असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.
10 Jun 2026 02:50 PM (IST)
लातूरच्या देवणी तालुक्यातील बोंबळी (बु) येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड याचा एक बैल वीज पडून मृत्युमुखी पडला, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे या शेतकऱ्याला दुसरा बैल घेणे शक्य झालं नाही, शेतीत मशागत करण्यासाठी बैलाबरोबर पत्नीच्या खांद्यावर नांगराचा जू देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे, हालाकीच्या परिस्थितीत बैल घ्यायचा कसा असा प्रश्न या शेतकरी दांपत्या पुढे उभा टाकला. सरकारने मदत करावी अशी आशाही या शेतकरी दांपत्याने व्यक्त केली आहे.
10 Jun 2026 02:42 PM (IST)
कोथरूड गोळीबार प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळ एकमेकांच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झालंय.. दोघेही फरार असणाऱ्या काळात फेस टाईमद्वारे संवाद साधत होते. पोलीस तपासात ही माहिती उघड झालीय. निलेश गायवळ स्वतःचा माग काढता येऊ नये म्हणून एका कामगाराचे एटीएम कार्ड वापरत असल्याची माहिती मिळतेय.. सचिन घायवळकडून चार मोबाईल,एक लॅपटॉप आणि पाच पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. या सर्वांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार आहे. त्यासाठी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली.
10 Jun 2026 02:29 PM (IST)
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेला तिढा आज सुटण्याचे संकेत मिळतायते. गोकुळ गिते आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे. या जागेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट नाराजी व्यक्त केली होती. या नाराजीनाट्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः गोकुळ गीते यांच्याशी फोनवरून चर्चाही केलीय.
10 Jun 2026 02:20 PM (IST)
उद्धव ठाकरे गटाचे सात खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 7 जूनला रविवारी दिल्लीत गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट फोडण्याच्या हालचाली सुरू असून या गटातील एका खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद देण्यात येणार असून अन्य खासदारांचा मानदेखील सांभाळण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय.. उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधून आहेत. श्रीकांत शिंदे यांनी, यापूर्वी दिल्लीत ठाकरे गटाच्या खासदारांच्या स्वतंत्र भेटी घेतल्या होत्या आणि त्यांचे मन वळवलं होतं. त्यानंतर या खासदारांच्या एकत्र बैठकीही झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. दरम्यान शिवसेना UBTचे खासदार संजय राऊत यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय.
10 Jun 2026 02:09 PM (IST)
खरातचे कथित व्हिडिओ टेलिग्रामद्वारे परदेशात पोहोचले आहे. या व्हिडिओ क्लिप्सची अवघ्या 20 रुपयात विक्री होत आहेत. आतापर्यंत व्हिडिओची विक्री करणारे 74 ग्रुप्स शोधले गेले आहेत. या प्रकरणात सायबर पोलिसांनी 11 सोशल मीडिया मध्यस्थांना नोटिसा बजावल्या आहे. त्यातील एका संशयित व्यक्तीची ओळख पटली आहे.
10 Jun 2026 02:00 PM (IST)
टेक कंपनी अॅपलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या WWDC 2026 ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. कंपनीने आयफोन यूजर्ससाठी काही महत्त्वाचे फीचर्स देखील सादर केले आहेत. ज्यामुळे यूजर्सची सुरक्षा वाढणार असून त्यांचा आयफोन वापरण्याचा अनुभव देखील बदलणार आहे. आता कंपनीने या आयोजित ईव्हेंटमध्ये एक नवीन एआय टूल सादर केले आहे. हे टूल यूजर्सना हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची भुमिका बजावणार आहे.
10 Jun 2026 01:55 PM (IST)
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीला आकार देणारे प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते भारथीराजा यांचे निधन झाले आहे. वयोमानानुसार होणारे आजार आणि आरोग्याच्या समस्यांमुळे बुधवारी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
10 Jun 2026 01:50 PM (IST)
जग पाहण्याचा अनुभव प्रत्येकासाठी सारखा नसतो. कुणासाठी तो रोजचा साधा अनुभव असतो, तर कुणासाठी आयुष्यभराची प्रतीक्षा. त्या प्रतीक्षेला उत्तर ठरू शकतो तो एका अनोळखी व्यक्तीचा नेत्रदानाचा निर्णय. एका कुटुंबासाठी दुःखाचा क्षण असताना, त्याचवेळी दुसऱ्या कुणाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश परतण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच नेत्रदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती अंधारातून प्रकाशाकडे नेणारी मानवी साखळी आहे.
10 Jun 2026 01:48 PM (IST)
सोलापूर येथून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पडद्याच्या दोरीचा गळफास लागून एक ११ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना न्यू पाच्छा पेठ परिसरातील क्रांती झोपडपट्टीत घडली. मिहीर शुभम इगवे असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
10 Jun 2026 01:40 PM (IST)
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विषारी हातभट्टीची दारू मृत्यू प्रकरणाच्या तपासात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या शोधासाठी सीआयडीने पाच विशेष पथके तयार केली आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड येथे २६ ते २८ मे या कालावधीत विषारी हातभट्टीची दारू पिल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दापोडी व हडपसर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील ११ आरोपींना न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
10 Jun 2026 01:35 PM (IST)
परीक्षेचे नाव घेताच बहुतांश विद्यार्थ्यांच्या ह्रदयाचे ठोके वाढवतात. चांगले गुण मिळवण्यासाठी आणि यश संपादन करण्यासाठी विद्यार्थी कठोर परिश्रम तर करतातच. परंतु, अनेकदा अशा काही क्लृप्त्या वापरतात. ज्याचा विज्ञानाशी थेट संबंधही नसतो. विशेष म्हणजे या अंधश्रद्धा केवळ आपल्या देशापुरत्या मर्यादित नसून अनेक देशात पहायला मिळतात.
10 Jun 2026 01:25 PM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारणातून आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) गोटातून एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावरून जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला आणि त्याचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या चीनला जागतिक मंचावर सर्वात मोठा राजनैतिक पराभव पत्करावा लागला आहे. बलुचिस्तान प्रांतात सक्रिय असलेल्या ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (BLA) आणि तिची अत्यंत घातक मानली जाणारी शाखा ‘मजीद ब्रिगेड’ यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या यादीत टाकण्यासाठी पाकिस्तान आणि चीनने रचलेला मोठा डाव अमेरिकेने पूर्णपणे उधळून लावला आहे. अमेरिकेने आपल्या विशेष नकाराधिकाराचा (Veto Power) वापर करत हा प्रस्ताव थेट फेटाळून लावला आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
10 Jun 2026 01:16 PM (IST)
तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) आणखी एक धक्का बसला आहे. खासदार सुष्मिता देव यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरकार यांची भेट घेतली. सुष्मिता देव २०२१ मध्ये टीएमसीमध्ये सहभागी झाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्यासोबत सामील होण्यापूर्वी त्या काँग्रेसमध्ये होत्या, जिथे त्यांनी महिला काँग्रेस प्रमुख आणि प्रवक्त्या ही पदे भूषवली होती.
10 Jun 2026 01:05 PM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) भूराजकीय समीकरणे सध्या अत्यंत वेगाने बदलत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिरातीने (UAE) आपले आर्थिक केंद्र असलेले दुबई आणि राजधानी अबू धाबी यांना इराणी हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी थेट इराणसोबत एक गुप्त करार केला आहे. या करारांतर्गत युएईने इराणची राजधानी तेहरान येथे विमानाने तब्बल ३ अब्ज डॉलर्सची (सुमारे २५ हजार कोटींहून अधिक रुपये) रोख रक्कम आणि मालमत्ता पाठवल्याचा खळबळजनक दावा केला जात आहे. या बदल्यात चालू युद्धादरम्यान इराण युएईच्या भूमीवर कोणतेही लष्करी हल्ले करणार नाही, अशी हमी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
10 Jun 2026 12:50 PM (IST)
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या कौटुंबिक मैत्रीण, कुमुद राणेचे ९ जून २०२६ रोजी मुंबईत कर्करोगाने निधन झाले. सलमान खानने आपल्या जवळच्या कौटुंबिक मैत्रिणीच्या अंत्यविधीला हजेरी लावली. अंत्यविधीदरम्यान, भाईजान खूप भावूक झाल्याचे दिसून आले आणि त्याच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते.
10 Jun 2026 12:40 PM (IST)
आशिया खंडातील दोन शेजारी देशांमधील शत्रुत्वाने आता अत्यंत धोकादायक आणि हिंसक वळण घेतले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाचा भडका उडाला असून पाकिस्तानी (Pakistan News) लष्कराने थेट शेजारील देशाच्या हद्दीत घुसून मोठी लष्करी कारवाई केली आहे. मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानी लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या हद्दीत खोलवर प्रवेश करत भीषण हवाई हल्ले (Airstrikes) केले. या कारवाईमुळे केवळ सीमावर्ती भागातच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे.
10 Jun 2026 12:30 PM (IST)
पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी आली आहे. महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापौर कार्यालयाच्या ई-मेलमध्ये पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.
10 Jun 2026 12:25 PM (IST)
चीनमधील राष्ट्रीय महाविद्यालयातील प्रवेश परीक्षा ‘गाओकाओ’ (Gaokao)शी संबंधीत एक व्हिडिओ सोशल मी़डियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी पोलिसांचे बॅच, पोलिसांच्या मोटरसायकली आणि त्यांच्या वाहनांचा स्पर्श करताना दिसतात. तसेच यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी हसतमुखाने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना दिसतात. हा व्हिडिओ पाहून जगभरातील लोक चीनमधील परीक्षेची परंपरा आणि तेथील परीक्षा पध्दतीवर चर्चा करत आहेत.
10 Jun 2026 12:20 PM (IST)
एका नाईटक्लबमधील कथित घटनेत सहभाग असल्याच्या आरोपानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आपल्या पदाचा राजीनामा देऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडवर इंग्लंडने मिळवलेल्या ११५ धावांच्या प्रभावी विजयानंतर काही दिवसांनीच, रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. बेन स्टोक्सने २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना किंवा २०२३ च्या विश्वचषकानंतर एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. बेन स्टोक्स सध्या खूपच चर्चेत आहे आणि चांगल्या गोष्टीसाठी ते अजिबातच नाही. कारण नाईटक्लबमध्ये बेन स्टोकने चुकीचे वर्तन केले असल्याचे सध्या सगळ्यांसमोर आले आहे.
10 Jun 2026 12:15 PM (IST)
भारताच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाला आहे. भारताने प्रथमच १२ अण्वस्त्रे सैन्यासह तैनात केली आहे. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील वाढत्या हलाचालींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी भारताकडे १८० अण्वस्त्रे असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. मात्र, आता भारताकडे १९० अण्वस्त्रे आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशन पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सीप्री) इयरबुक २०२६ अहवालात याचा खुलासा केला आहे.
10 Jun 2026 12:05 PM (IST)
राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मधील सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि वेतनवाढीच्या फरकाच्या हप्त्यांबाबत राज्य शासनाच्या भूमिकेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. एसटी कर्मचारी संघटनांनी शासनावर गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
10 Jun 2026 12:00 PM (IST)
कोल्हापुरात सोशल मीडियावरून ओळख झालेल्या 21 वर्षीय तरुणीला भेटीस बोलावून लॉजवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला ब्लॅकमेल केले. याप्रकरणी पन्हाळ्यातील गणेश खोत याला पोलिसांनी अटक केली आहे.
10 Jun 2026 11:50 AM (IST)
टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री हुनर हाली हिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. ‘छल: एक शह और मात’, ‘कहानी घर घर की’ आणि ‘थपकी प्यार की’ यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री हुनर हाली आणि मयंक गांधी लग्नाच्या नऊ वर्षांनंतर विभक्त झाले आहेत. त्यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते आणि आता २०२६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांनी २०२५ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. या निर्णयामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
10 Jun 2026 11:40 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अनेक नेते पक्ष सोडून जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ‘कोणी कुठे जात नाही, ज्यांना जायचे ते गेले. आता सगळे पक्षासोबत मजबूत उभे आहेत. सर्व खासदार यांच्यासोबत संवाद सुरू आहे’, असे खासदार राऊत म्हणाले.
10 Jun 2026 11:30 AM (IST)
न्यू जर्सीतील प्लेसमेंट कंपनी मॅग्नाव्हिजन एलएलसीचे मालक नीरज शर्मा यांचा सामावेश आहे. नारीज शर्मा यांनी ११ बनावट एच-१बी व्हिसा (H-1B Visa) अर्जांवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. संबंधित उमेदवार जागतिक आर्थिक संस्थांमध्ये काम करणारा असल्याचा दावा करण्यात आला होता. माहितीनुसार, एच-१बी व्हिसा अर्जांसाठी आधारभूत कापत्रे म्हणून शर्मा यांनी सादर केलेल्या पत्रांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या आढळल्या.
10 Jun 2026 11:20 AM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसरी भाजी बनवून मागणं भावाला चांगलाच महागात पडलं आहे. दुसरी भाजी बनवून दे असे म्हणटल्याने बहीण संतापली आणि तिने वाद घालत आपल्या मुलाला बोलावून घेतले. मुलगा आला आणि थेट त्याने मामावरच चाकू हल्ला केला. यात मामा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. घडलेली घटना टाऊनहॉल परिसरात घडली. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.
10 Jun 2026 11:10 AM (IST)
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत ग्रुप-ए, ग्रुप-बी, आणि ग्रुप-सी श्रेणीतील पदे भरली जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवार एफएसएसआयच्या (FSSAI) अधिकृत वेबसाईटद्वारे २६ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
10 Jun 2026 11:00 AM (IST)
अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातील दणदणीत विजयानंतर, भारतीय संघ आता एकदिवसीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाला आपली तयारी अधिक मजबूत करण्यासाठी आणि नवीन संघरचना आजमावण्यासाठी ही मालिका एक उत्तम व्यासपीठ ठरेल.
10 Jun 2026 10:50 AM (IST)
मध्यपूर्वेत पुन्हा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे होर्मुझचा मार्ग सतत धोक्यात येत आहे. या मार्गावरुन व्यापार वाहतूक करणे अत्यंत धोक्याचे बनले आहे. या तणावादरम्यान तुर्की आणि सौदी अरेबियाने एक मोठा ऐतिहासिक हेजाज रेल्वे प्रकल्प सुरु केला आहे. हा प्रकल्प मध्यपूर्वेतील कनेक्टिव्हीटी आणि व्यापार वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
10 Jun 2026 10:40 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्तासंघर्षांनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यात यश आलेले डी. के. शिवकुमार यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांचे अनेक मंत्री त्यांना मिळालेल्या खात्यांवरून असंतुष्ट असून, रामलिंगारेड्डी यांच्यानंतर आता मंत्री कृष्णा बायरे गौडा हे देखील आपली तक्रार घेऊन काँग्रेस हायकमंडला भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. कृष्णा बायरे गौडा यांना बंगळुरू विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे, परंतु त्यांनी अजूनही आपला पदभार स्वीकारलेला नाही. सूत्रांनुसार, गौडा यांना केवळ ‘ग्रेटर बंगळुरू डेव्हलपमेंट’ विभाग देण्यात आला आहे. तर बंगळुरू डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आणि बंगळुरू मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांसारख्या महत्त्वाच्या यंत्रणा मुख्यमंत्री शिवकुमार यांनी स्वतःकडेच ठेवल्या आहेत. यामुळे गौडा नाराज आहेत.






