Maharashtra Breaking News Updates Today
25 May 2026 09:03 AM (IST)
Pimpri Chinchwad Crime: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवडमधून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलावरील (Flyover) एम्पायर इस्टेट बीआरटी बसथांब्यावर एका २४ वर्षीय तरुणीची अश्लील हावभाव करत छेडछाड करण्यात आली. मात्र, पीडित तरुणीने दाखवलेले विलक्षण धाडस आणि पिंपरी पोलिसांचा तात्काळ तांत्रिक तपास यामुळे या विकृत आरोपीला २४ तासांच्या आत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जाकीर हमीद शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भररस्त्यात अश्लील चाळे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास पीडित २४ वर्षीय तरुणी तिच्या कंपनीच्या बसची वाट पाहत एम्पायर इस्टेट बीआरटी स्टँडवर उभी होती. सकाळी कामावर जाणाऱ्यांची मोठी वर्दळ असतानाही, आरोपी जाकीर शेख तिथे आला आणि त्याने तरुणीला पाहून अश्लील चाळे व हावभाव करण्यास सुरुवात केली.
सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लावणारी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दहा दिवसांतील इंधनाच्या दरात वाढ होण्याची ही चौथी वेळ असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या ताज्या दरवाढीत पेट्रोलच्या किमतीत २.६१ रुपयांनी, तर डिझेलच्या किमतीत २.१७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांतील दर खालीलप्रमाणे आहेत:
मुंबई: मुंबईमध्ये पेट्रोलचे दर २.७६ रुपयांनी वाढले असून आता पेट्रोल १११.२१ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर डिझेलच्या दरात २.८१ रुपयांची वाढ झाल्याने डिझेल ९७.८३ रुपये प्रति लिटर झाले आहे.
दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत नव्या दरवाढीनंतर पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर झाले आहे.






