Maharashtra Breaking News Updates Today
27 May 2026 10:00 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांवर होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे. महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप स्वतः १२ जागांवर निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.
27 May 2026 09:50 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये नवीन वॉल रॉयल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना ग्लू वॉल स्किन क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. इतर शस्त्रांसह ग्लू वॉल स्किन देखील या गेमचा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. ग्लू वॉल स्कीनच्या मदतीने प्लेअर्स शत्रूंपासून स्वत:च रक्षण करू शकतात. ग्लू वॉल स्किन तुमच्या आणि शत्रूच्या मध्ये एक भिंत तयार करते. गेममध्ये ग्लू वॉल स्किन खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना अधिक डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र ईव्हेंटमध्ये अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून प्लेअर्सना ग्लू वॉल स्किन क्लेम करण्याची संधी मिळते.
27 May 2026 09:30 AM (IST)
Vidharbha Rainfall: विदर्भात एकीककडे उष्णतेचा रेड अलर्ट असतानाच नागपूर, भंडारा, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याला मंगळवारीअचानक अवकाळी पावसाचा तीव्र फटका बसला. सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार वादळी पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले.
या अवकाळी पावसामुळे ४५-४६ अंश सेल्सिअस तापमानामुळे उकाड्याने होरपळणाऱ्या विदर्भीयांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
या अवकाळी पावसात भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, या पावसामुळे बाजार समिती आणि उघड्यावर असलेला हरभऱ्याचा माल मोठ्या प्रमाणावर भिजला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे माल सुरक्षित स्थळी हलवण्यास वेळ न मिळाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
27 May 2026 09:25 AM (IST)
कर्नाटकच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया गुरुवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासंबंधीच्या तीव्र हालचाली सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस हायकमांडने आगामी २०२९ च्या लोकसभा आणि इतर विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एक मोठी रणनीती आखली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून काँग्रेस नेतृत्वाने सिद्धारमैया यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊन मोठी भूमिका निभावण्याचा प्रस्ताव दिला आहे. सिद्धारमैया यांनी बंगळुरू सोडून दिल्लीत काँग्रेसचा प्रमुख 'ओबीसी' (OBC) चेहरा म्हणून काम करावे, अशी पक्षाची तीव्र इच्छा आहे.
27 May 2026 09:25 AM (IST)
Vidhan Parishad Election: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election 2026) रणधुमाळी सुरू झाली असून, यामुळे राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. महायुतीमध्ये (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) जागावाटपाचे गणित आणि अंतर्गत चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच, शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने महायुतीच्या जागावाटपात किमान ५ जागांवर आपला खंबीर दावा ठोकला आहे. एवढेच नव्हे तर, राज्यातील बदललेले राजकीय बलाबल आणि गुणवत्तेच्या (मेरिट) आधारे ६ वी जागाही शिवसेनेलाच मिळावी, अशी आग्रही मागणी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि इच्छुकांनी लावून धरली आहे.
27 May 2026 09:20 AM (IST)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी विधान परिषद निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) जाहीर झाल्याने महायुतीमध्ये जागावाटपाच्या घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. जागांच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अद्याप महायुतीचा अंतिम निर्णय प्रलंबित असतानाच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपल्यातील एका जुन्या आणि महत्त्वाच्या वादावर 'हुकूमी' मार्ग काढल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.
27 May 2026 09:15 AM (IST)
मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जात असली तरी अजूनही राज्यातील ५ लाख १६ हजारांहून अधिक विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असल्याचे समोर येत आहे.
राज्यातील १४ लाख 20 हजार ४८६ विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले आहेत. तर २५ मे पर्यंत राज्यातील ९ लाख ४ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरला होता. त्यामुळे ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.
27 May 2026 09:10 AM (IST)
India Share Market Update: भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना आज व्यवहार करताना सावध राहण्याची गरज आहे. कारण आज २७ मे रोजी भारतीय शेअर बाजार लाल रंगात उघडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमुळे, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, बुधवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे, कारण अमेरिका-इराण शांतता कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार सावध आहेत.
गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास ९७ पॉइंट्सच्या सवलतीवर, २३,८८२ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
जागतिक बाजारातील घडामोडी आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे पुणे शहरात डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १० दिवसांतील दरांचा आढावा घेतला असता, डिझेलच्या किमतीने नवीन उच्चांक गाठल्याचे समोर आले आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी पुण्यात डिझेलचे दर ९४.३९ रुपये प्रति लिटरच्या आसपास होते. त्यानंतर सातत्याने झालेल्या दरवाढीमुळे हा दर ९९.१७ रुपये प्रति लिटरपर्यंत वर गेला आहे. जर आजच्या सर्वोच्च दराची गेल्या १० दिवसांपूर्वीच्या दराशी तुलना केली, तर डिझेलच्या किमतीत ४.७८ रुपये प्रति लिटरची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.






