Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: अनिल अंबानींना मोठा धक्का! Bank Fraud प्रकरणात CBI कडून पहिली चार्जशीट दाखल

Maharashtra Breaking : जवळपास दीड तास चाललेल्या या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील यांनी 'हैदराबाद गॅझेट' आणि 'कुणबी दाखल्यांच्या' (Kunbi Certificates) अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली.

  • By anuradha sagar
Updated On: May 30, 2026 | 06:21 PM
Top Marathi News Today Live

Top Marathi News Today Live

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News:

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा आमरण उपोषणावर

जालना: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आजपासून (३० मे) पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आपले आमरण उपोषण सुरू करणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने पाठवण्यात आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात पूर्णपणे अपयश आले असून, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

दीड तास चर्चा, पण तोडगा नाही उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी काल (२९ मे) आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.

 

 

The liveblog has ended.
  • 30 May 2026 05:40 PM (IST)

    30 May 2026 05:40 PM (IST)

    इंधन व गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसचा एल्गार, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

    धाराशिव : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी देशपांडे स्टॅण्ड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढ रद्द करा, महागाई करणारे सरकार हाय हाय, सामान्य जनतेची लूट बंद करा, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले.

  • 30 May 2026 05:30 PM (IST)

    30 May 2026 05:30 PM (IST)

    French Open 2026 मध्ये महाउलटफेर! १९ वर्षीय फोन्सेकाने नोव्हाक जोकोविचचा केला गेम ओव्हर,

    फ्रेंच ओपन २०२६ मध्ये टेनिसविश्वाला सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. पॅरिसमधील रोलँड गॅरोसवर खेळल्या गेलेल्या या थरारक लढतीत १९ वर्षीय ब्राझिलियन जोआओ फोन्सेकाने २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा मानकरी आणि स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा पराभव करत इतिहास रचला. जवळपास पाच तास रंगलेल्या या सामन्यात जोकोविचने सुरुवातीपासूनच आपला अनुभव दाखवत पहिले दोन सेट्स ६-४,६-४ अशा फरकाने जिंकले. त्या क्षणी सामना एकतर्फी होईल आणि सर्बियन दिग्गज सहजपणे पुढील फेरीत पोहोचेल, असे वाटत होते. मात्र त्यानंतर सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले. फोन्सेकाने जबरदस्त पुनरागमन करत पुढचे तीन सेट्स ६-३, ७-५ आणि ७-५ असे जिंकले आणि पाच सेट्सच्या या सामन्यात एक मोठा उलथापालथ घडवला. त्याने जोकोविचला हरवून आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला.

  • 30 May 2026 05:20 PM (IST)

    30 May 2026 05:20 PM (IST)

    Naga Chaitanya : अश्लील कंटेंटशी नाव जोडल्यानंतर अभिनेता भडकला!

    दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा झेंडा गाडणारा सुप्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य सध्या दिल्ली हायकोर्टाकडे धावला आहे. ही धाव घेण्यामागचे कारण समाज माध्यम आणि त्यावर त्याच्या परवानगीशिवाय वापरण्यात येणारे त्याचे नाव आणि छायाचित्र आहेत. आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणासाठी अभिनेत्याने ही पाऊले उचलली आहेत. त्याचा आरोप आहे की त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटोज आणि ओळख समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वापरण्यातही येत आहे आणि त्याचा गैरवापरही होत आहे. ही याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

  • 30 May 2026 05:10 PM (IST)

    30 May 2026 05:10 PM (IST)

    एका निर्णयाने मोडल्या इंडस्ट्रीच्या बेड्या, मुलींनीही घडवला इतिहास

    आज चित्रपटसृष्टीत जया अख्तर, फराह खान, मेघना गुलजार आणि झोया अख्तर यांसारख्या महिला चित्रपट निर्मात्यांची नावे आदराने घेतली जातात. या त्या महिला चित्रपट निर्मात्या आहेत, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट चित्रपटांनी प्रेक्षकांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमारे एक शतकापूर्वी, एका धाडसी महिलेने भारतीय चित्रपटसृष्टीत महिला दिग्दर्शनाचा मार्ग मोकळा केला. त्यांचे नाव होते फातिमा बेगम, ज्या भारताच्या पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जातात. ज्या काळात चित्रपटसृष्टीवर पुरुषांचे वर्चस्व होते, त्या काळात फातिमा बेगम यांनी आपल्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने एक नवीन आदर्श निर्माण केला.

  • 30 May 2026 05:00 PM (IST)

    30 May 2026 05:00 PM (IST)

    सीबीएसईचा मोठा निर्णय; ‘या’ वर्षापासून उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी थेट ऑनलाईन मिळणार!

    CBSE Board Exam Update: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला आहे. बोर्डाने निर्णय घेतला आहे की, पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकित म्हणजेच तपासलेल्या उत्तरपत्रिकांची स्कॅन कॉपी ऑनलाईन उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची उत्तरपत्रिका कशी तपासली गेली आहे आणि गुणांकन कसे केले जाते हे समजण्यास मदत होईल. यामागे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह बनावी, हा बोर्डाचा मुख्य उद्देश आहे.

  • 30 May 2026 03:59 PM (IST)

    30 May 2026 03:59 PM (IST)

    हिंगोलीत मराठा बांधवांनी राज्य महामार्ग रोखला...

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी विविध मागण्या मान्य करण्यासाठी रखरखत्या उन्हात आंदोलन सुरू केल्याने मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. मराठा समाजाने हिंगोली रिसोड राज्य महामार्ग रोखला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी हिंगोलीतील सेनगाव शहरातील टी पॉइंटवर मराठा बांधवांच आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.

  • 30 May 2026 03:50 PM (IST)

    30 May 2026 03:50 PM (IST)

    शिर्डीहून मुंबईकडे निघालेले भाजप आमदार प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना...

    शिर्डीहून मुंबईकडे निघालेले प्रसाद लाड पुन्हा अंतरवली सराटीकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने मुंबईकडे निघालेले लाड पुन्हा माघारी फिरले आहेत. अंतरवली सराटीत जाऊन पुन्हा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. काही वेळापूर्वीच उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.

  • 30 May 2026 03:42 PM (IST)

    30 May 2026 03:42 PM (IST)

    कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याचा राग; विवाहितेची हत्या करणारा बाप अटकेत

    कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून स्वतःच्या विवाहित मुलीची हत्या करून फरार झालेल्या बापाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील रचना रॉयल इमारतीत राहणारे विनोद वसईकर यांनी तीन दिवसांपूर्वी आपल्या मुलगी गायत्रीची हत्या केली होती. हत्येनंतर ते फरार झाले होते. या प्रकरणाचा तपास करत बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली.

  • 30 May 2026 03:31 PM (IST)

    30 May 2026 03:31 PM (IST)

    आमदार महेंद्र दळवींच्या मुलीचा विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

    रायगड मधील अलिबागचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने आज विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. आम्ही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरेंच्या विरोधात आहोत. त्यांनी कायम अन्याय केला आहे. एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात? हे पाहून पुढचा निर्णय घेऊ. अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळाली तर त्यांचा आम्ही प्रचार करणार नाही. आम्ही तटस्थ भूमिका घेऊ, असा सूचक इशारा आमदार दळवी यांनी दिला आहे.

  • 30 May 2026 03:23 PM (IST)

    30 May 2026 03:23 PM (IST)

    43 डिग्री सेल्सिअस तापमानातही जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तब्बल 43 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असून उपोषण सुरूच ठेवले आहे.

    उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी भेट देत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली.

    उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध भागांतून हजारो मराठा समाजबांधव अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. आंदोलनस्थळी मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये अद्याप तोडगा निघालेला नसताना, जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आता सरकार या आंदोलनावर कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

  • 30 May 2026 03:20 PM (IST)

    30 May 2026 03:20 PM (IST)

    'अमरावती'साठी महाविकास आघाडीकडून हर्षजीत देशमुखांचा अर्ज दाखल

    काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांनी अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. देशमुख यांच्या नामांकन अर्ज भरण्यासाठी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर अनुपस्थित होत्या. देशमुख यांनी, भाजपमधील अंतर्गत कलह हाच, आम्हाला फायदा होईल, असा दावा केला आहे.

  • 30 May 2026 03:12 PM (IST)

    30 May 2026 03:12 PM (IST)

    कांद्याला 24 रुपये दर द्या; अन्यथा रस्त्यावर उतरून लढा तीव्र करणार; सचिन आहेर

    कांदा निर्यातीवरील निर्बंध आणि वाढलेली आवक यामुळे बाजारभाव कोसळल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे आमदार सचिन आहेर यांनी केला. सरकारने हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष खरेदी होत नसल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केला. कांदा सडून नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे आश्वासनही पूर्ण झाले नाही. कांद्याला किमान 24 रुपये किलो दर मिळाला पाहिजे, अशी भूमिका मांडत हा लढा केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहणार नसून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

  • 30 May 2026 03:04 PM (IST)

    30 May 2026 03:04 PM (IST)

    संजय राठोड यांच्या ताफ्यात 20 ते 25 गाड्यांचा ताफा

    शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यात त्यांच्या ताब्यात तब्बल २० ते २५ गाड्यांचा समावेश होता. ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा वास्तू संग्राहलयाच्या पाहणीसाठी आले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. त्यामुळे महायुतीच्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा विसर पडल्याचे मानले जात आहे.

  • 30 May 2026 02:00 PM (IST)

    30 May 2026 02:00 PM (IST)

    राजकारणाच्या मैदानावर शिक्षणाचा ‘मास्टरस्ट्रोक’; एकदा वाचाच कर्नाटकच्या भावी मुख्यमंत्र्यांचा शैक्षणिक प्रवास!

    कर्नाटकमध्ये अडीच वर्षांपूर्वी ठरलेला सत्तेचा फॉर्म्युला अलीकडे लागू होताना दिसत आहे. ज्यामुळे राज्यातील राजकारणात एका मोठ्या बदलाची सुरुवात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अलीकडेच दिल्लीत झालेल्या राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. यानंतर आता विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची कर्नाटक राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती होणार आहे.

  • 30 May 2026 01:55 PM (IST)

    30 May 2026 01:55 PM (IST)

    कार धुताना विजेचा बसला जोरदार झटका; तरुणाचा जागीच मृत्यू

    सणसवाडी (ता.शिरुर) येथे वॉशिंग सेंटरमध्ये कार धूत असताना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, अजय बाळासाहेब थिटे (वय ३७, सध्या रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. लोणार गल्ली किल्ले धारूर रा. धारुर जि. बीड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजेच्या धक्क्याने अशाप्रकारे मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

  • 30 May 2026 01:50 PM (IST)

    30 May 2026 01:50 PM (IST)

    म्यानमारचे राष्ट्रपती 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यापार आणि सुरक्षेवर होणार मोठे करार

    भारताचे परराष्ट्र धोरण आणि आशियाई देशांमधील सामरिक संतुलन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आज एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय सुरू होत आहे. म्यानमारचे  (Myanmar) राष्ट्रपती यू मिन आँग ह्लाइंग हे आज (शनिवारी) भारताच्या पाच दिवसीय अधिकृत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष निमंत्रणावरून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपतीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर यू मिन आँग ह्लाइंग यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा असल्याने याकडे संपूर्ण आशिया खंडातील राजकीय विश्लेषकांचे बारीक लक्ष लागून राहिले आहे. भारत आणि म्यानमारमधील शतकानुशतके जुने सांस्कृतिक, भौगोलिक आणि व्यापारी संबंध या दौऱ्यामुळे एका नव्या उंचीवर पोहोचतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • 30 May 2026 01:45 PM (IST)

    30 May 2026 01:45 PM (IST)

    अमेरिकेत काळाचा भीषण घाला! भरधाव बसने 6 गाड्यांना चिरडले

    अमेरिकेतील व्हर्जिनिया (Virginia) राज्यातून एक मनाला चटका लावणारी अत्यंत दुःखद आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावर सुरू असलेल्या संथ वाहतुकीदरम्यान एका अनियंत्रित आणि भरधाव बसने एकापाठोपाठ एक अशा ६ वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गाड्यांचा चक्काचूर झाला आणि ३४ प्रवाशांनी भरलेली ती अवाढव्य बस थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळून पालथी झाली. या हृदयद्रावक अपघातात एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३७ हून अधिक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • 30 May 2026 01:40 PM (IST)

    30 May 2026 01:40 PM (IST)

    मुंबईकरांनो लक्ष द्या! गर्डर लॉन्चमुळे अनेक लोकल फेऱ्यांवर परिणाम

    लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील मरीन लाईन्स स्थानकात शनिवारी (30 मे 2026) मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार असून फूट ओव्हर ब्रिज (FOB) गर्डर लॉन्चिंगचे काम केले जाणार आहे. या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या काही उशिराच्या आणि पहाटेच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. ब्लॉक 30-31 मेच्या मध्यरात्री रात्री 1:15 ते पहाटे 4:15 दरम्यान सर्व लाईन्सवर असणार आहे.

  • 30 May 2026 01:35 PM (IST)

    30 May 2026 01:35 PM (IST)

    केजमध्ये 13 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तोंड, हात रुमालाने बांधले अन्…

    नात्याला काळीमा फासणारी आणि संपूर्ण बीड जिल्ह्याला सुन्न करून टाकणारी एक अत्यंत संतापजनक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंदाने मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय चिमुरडीवर तिच्याच सख्ख्या चुलत मामेभावाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नराधम भावाने या चिमुरडीचे हात आणि तोंड रुमालाने बांधून तिच्यावर घरातच बळजबरीने अत्याचार केला. या संतापजनक प्रकारानंतर केज पोलिसांनी तात्काळ पावले उचलत नराधम आरोपीला जेरबंद केले असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 30 May 2026 01:25 PM (IST)

    30 May 2026 01:25 PM (IST)

    ‘शरद पवार आणि मामांना भेटायची हिंमत नाही’; प्राजक्त तनपुरेंची भावूक प्रतिक्रिया

    “आज मी भाजपमध्ये प्रवेश करतोय. पण माझे मामा जयंत पाटील यांना भेटायची हिंमत माझ्यात नाही. त्यांना मी सांगितल देखील नाही. तसेच शरद पवार यांनादेखील भेटण्याची माझ्यात हिंमत नाही. मात्र मी मतदारसंघातील अडचणी पाहून हा निर्णय घेतोय. ज्यांच्या जीवावर मी हा संघर्ष कत आलो, त्यांच्याही भावनांचा मला विचार करावा लागेल, पण मला माझ्या कार्यकर्त्यांच राजकारणही बघायचं आहे. माझ्याकडे आता शब्द नाहीत, त्यामुळे बोलणेही अवघड झाले आहे.” अशी प्रतिक्रीय प्राजक्त तनपुरे यांनी दिली. प्राजक्त तनपुरे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. अखेर या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.

  • 30 May 2026 01:15 PM (IST)

    30 May 2026 01:15 PM (IST)

    अनिल अंबानींना मोठा धक्का! Bank Fraud प्रकरणात CBI कडून पहिली चार्जशीट दाखल

    मोठ्या नावांपैकी एक अंबानी नाव सध्या सीबीआयच्या कचाट्यात अडकलं आहे. अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्स हे एका बँक फसवणूक प्रकरणात अधिकाधिक गुंतत चालले आहेत. या प्रकरणातील एका नवीन घडामोडीनुसार, केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच CBI एका बहुकोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात ‘रिलायन्स एडीए ग्रुप’विरुद्ध मोठी कारवाई केली आहे.

  • 30 May 2026 01:05 PM (IST)

    30 May 2026 01:05 PM (IST)

    “ओबीसींना घाबरण्याची गरज नाही आणि मराठा…”, जरांगेंचं उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारंगे-पाटील यांनी आज अंतरवाली सारती येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील सरकारी शिष्टमंडळाने जारंगे-पाटील यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतरही जारंगे-पाटील उपोषण सुरू ठेवण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

  • 30 May 2026 01:01 PM (IST)

    30 May 2026 01:01 PM (IST)

    पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न

    राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, पुण्यातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून महिला पोलिस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, खडकी बाजार पोलिस वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी योगेश माधव बेरी (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 30 May 2026 12:48 PM (IST)

    30 May 2026 12:48 PM (IST)

    जणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

    जनगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याशी वाद घालून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली. महिलेच्या मुलाला दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांकडून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विकास नवनाथ मोरे (वय ४०), क्रांती विकास मोरे (वय ३६), मुक्ता राजभाऊ कसबे (वय ४३), लिलावती नवनाथ मोरे (वय ६५), अभिजित श्रीधर मोरे (वय २६, सर्व रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला कर्मचाऱ्याने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
  • 30 May 2026 12:36 PM (IST)

    30 May 2026 12:36 PM (IST)

    बारामती बसस्थानक राज्यात प्रथम

    "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात बारामती बसस्थानकाने "अ" वर्गामध्ये ९७ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावून १ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. याबद्दल राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

  • 30 May 2026 12:24 PM (IST)

    30 May 2026 12:24 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांचा आरोप

    पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू व्यवसायामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असून, या संपूर्ण रॅकेटला राज्य उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  • 30 May 2026 12:12 PM (IST)

    30 May 2026 12:12 PM (IST)

    विधान परिषदेच्या 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत

    राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ४ जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

  • 30 May 2026 11:58 AM (IST)

    30 May 2026 11:58 AM (IST)

    विधान परिषदेच्या 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, काँग्रेसला 8 अन्…; हर्षवर्धन सपकाळांची माहिती

    राज्यातील १७ जागांसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे १७ पैकी १५ जागांवर एकमत झाले असून दोन जागांवरही लवकरच निर्णय होईल. काँग्रेस पक्ष चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-लातूर-बीड या जागा लढवणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्ष पुणे, ठाणे व सांगली-सातारा या ३ जागा आणि शिवसेना (उबाठा) रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या ४ जागा लढवत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

  • 30 May 2026 11:55 AM (IST)

    30 May 2026 11:55 AM (IST)

    पुण्यात विषारी दारूचं थैमान! 15 जणांचा मृत्यू, पोलिस आयुक्तांचा दणका; अनेक अधिकारी निलंबित

    पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्रकरणात 15 जणांचा मृत्यू झाला. दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा संशय असून मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर पोलिस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

  • 30 May 2026 11:50 AM (IST)

    30 May 2026 11:50 AM (IST)

    पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पतीने डोळ्यात राख फेकली अन्…

    राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, पुण्यातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून महिला पोलिस अधिकाऱ्याचा ओढणीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, खडकी बाजार पोलिस वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी योगेश माधव बेरी (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक महिलेने खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 30 May 2026 11:47 AM (IST)

    30 May 2026 11:47 AM (IST)

    ‘या’ राज्यांमध्ये 1 जूनपासून Petrol-Diesel बंद, VAT कमी करण्यासह सरकारकडे मागण्या, नाहीतर संप पुकारण्याची तयारी

    एकीकडे महागाईचा भडका उठला असताना दुसरीकडे देशात पेट्रोल – डिझेलवरुन वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पेट्रोल -डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होत असल्याने त्याचा सामान्यांवर मोठा परिणाम दिसून येत आहे.  सध्या राजस्थानमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. १ जूनपासून राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने असा इशारा दिला आहे की, जर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर १ जूनपासून संपूर्ण राज्यातील पेट्रोल पंप चालक अनिश्चित काळासाठी संपावर जातील. नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर समजून घेऊयात.

  • 30 May 2026 11:45 AM (IST)

    30 May 2026 11:45 AM (IST)

    लग्नाआधीच होणाऱ्या नवऱ्याला कंटाळली अन् तरुणीने ॲसिड पिऊन आयुष्य संपवलं

    राजस्थानच्या कराैली भागातील एका तरुणीने लग्नाआधीच स्वत:चे आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा झाला होता, पण यानंतर होणारा नवरा तिचा मानसिक छळ करत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. हुंड्याची मागणी, फोनवर अश्लील बोलणे यामुळे तरुणी फार तणावात होती. अशातच या सर्व जाचाला कंटाळून तिने ॲसिड पिऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

  • 30 May 2026 11:40 AM (IST)

    30 May 2026 11:40 AM (IST)

    ग्रामीण महाराष्ट्रासाठी मोठं पाऊल; ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

    महाराष्ट्रातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चित्रपटगृहांची उपलब्धता नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांना शहरांकडे जावे लागते. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने ‘किस्सा शुरू टॉकीज’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आता गावोगावी घरबसल्या नवीन चित्रपट पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडले. महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

  • 30 May 2026 10:57 AM (IST)

    30 May 2026 10:57 AM (IST)

    तुला जिवंत राहू देणार नाही’; सततच्या धमक्या, बेदम मारहाण

    सोलापूर येथून एक संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका २१ वर्षीय तरुणाला वारंवार बेदम मारहाण आणि सततच्या धमक्या देत मानसिक त्रास देण्यात आल्याचे समोर आले आहे. या छळाला कंटाळून अखेर या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट आणि हातावर आरोपींची नावे लिहून ठेवली.

  • 30 May 2026 10:47 AM (IST)

    30 May 2026 10:47 AM (IST)

    मुंबईत CNG च्या दरात पुन्हा वाढ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला गॅस

    इराण-अमेरिका संघर्षामुळे सध्या तणावाचे वातावरण आहे. या तणावामुळे इंधनाचे दरही चांगलेच वाढले आहेत. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलच्या दरात वाढ झाली आहे. असे असताना आता मुंबईत सीएनजीच्या दरातही दोन रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका वाहनधारकांना होणार आहे

  • 30 May 2026 10:37 AM (IST)

    30 May 2026 10:37 AM (IST)

    खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा

    स्पोर्ट आणि फिटनेस या क्षेत्राकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टीकोण बदलला आहे. आज एखादा खेळाडू घडण्यामागे एक मोठी टीम असते. कोच जो रणनीती शिकवतो. फिजिओथेरपिस्ट जो खेळाडूला दुखापतीतून रिकव्हर व्हायला मदत करतो. स्पोर्ट सायकोलॉजिस्ट जो मानसिक ताकद वाढवतो तसेच कमेंटेटर जो खेळ लोकांपर्यंत पोहचवतो. स्पोर्टमध्ये खेळाडूशिवाय असिस्टंट कोच, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट, रेफरी किंवा अंपायर स्पोर्ट्स अ‍ॅनालिस्ट, कमेटेंटर, स्पोर्ट जर्नालिस्ट होऊ शकता. याशिवाय स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये इव्हेंट मॅनेजर, टीम मॅनेजर, टॅलेंट स्काऊट किंवा स्पोर्ट्स अ‍ॅडमिनिस्ट्रेटर अशा भूमिका उपलब्ध असतात.

  • 30 May 2026 10:27 AM (IST)

    30 May 2026 10:27 AM (IST)

    सावध रहा! १५ राज्ये, ताशी ९० किमी वेगाने वाहणार वादळी वारे

    राज्यासह देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतासह १५ राज्याना चक्रीवादळासह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 30 मे पासून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह 15 राज्यांना हा इशारा देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर पावसासह ताशी ९० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह वादळी वारे वाहतील. त्यामुळे हवामान विभागाने या काळात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • 30 May 2026 10:17 AM (IST)

    30 May 2026 10:17 AM (IST)

    शेवटपर्यंत लढला अन्…डोळ्यात आले पाणी; फायनलचे स्वप्नं भंंगले, Vaibhav Sooryavanshi

    IPL 2026 च्या क्वालिफायर २ मध्ये, गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला ७ गडी राखून पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. ३१ मे रोजी होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात गुजरातचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरशी होईल. राहुल तेवतियाने ब्रिजेश शर्माच्या गोलंदाजीवर षटकार मारताच, मैदानावर असे दृश्य घडले, ज्याने लाखो क्रिकेट चाहत्यांची मने हेलावून टाकली. राजस्थान रॉयल्सचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगल्याने, संघाचा १५ वर्षीय सलामीवीर फलंदाज, वैभव सूर्यवंशी, अश्रू ढाळत होता. संपूर्ण हंगामात राजस्थानच्या फलंदाजीचा कणा राहिलेल्या या स्टार खेळाडूचा खिन्न चेहरा आणि डोळ्यांतील अश्रू या पराभवाची तीव्र वेदना स्पष्टपणे दर्शवत होते. आपल्या जादुई फलंदाजीने अत्यंत अनुभवी गोलंदाजांनाही झोडपून काढणारा हा स्फोटक फलंदाज, निराश होऊन डगआऊटमध्ये एकटाच बसला होता.

  • 30 May 2026 10:07 AM (IST)

    30 May 2026 10:07 AM (IST)

    लांब केस, दाट दाढी अन्…, विनोदी भूमिकांनंतर आता साधूच्या भूमिकेत

    मराठी चित्रपटसृष्टीत सध्या तुंबाडची मंजुळा या आगामी चित्रपटाची जोरदार सुरू आहे.खर तर ही मंजुळा दक्षिणात्या चित्रपटसृष्टीतून मराठीत आली आहे.कन्नडमधील गाजलेल्या सू फ्रॉम सो’ या चित्रपटाचा हा मराठी रिमेक असल्याची ही चर्चा सुरू आहे

    चित्रपटासह या चित्रपटातील अजून एका गोष्टीची चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील आपल्या खास विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे मकरंद अनासपुरे यांच्या भूमिकेची. लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा नव्या आणि लक्षवेधी अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटात ते एका साधूच्या भूमिकेत झळकणार असून, त्यांच्या या लूकची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

  • 30 May 2026 09:57 AM (IST)

    30 May 2026 09:57 AM (IST)

    TATA चा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत नवी Tiago Facelift लाँच

    भारतात अखेर 2026 TATA Tiago Facelift लाँच करण्यात आली आहे. वाहन निर्माता कंपनीने 4.69 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरुम किंमतीत ही गाडी लाँच केली आहे. कंपनीने या गाडीमध्ये अनेक बदल केले आहेत. मात्र त्याच्या पावरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

  • 30 May 2026 09:55 AM (IST)

    30 May 2026 09:55 AM (IST)

    Russia Afghanistan Military Pact: रशिया आणि अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमध्ये लष्करी करार 

    Russia Afghanistan Military Pact:  मॉस्को: आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया हा भारताचा अत्यंत विश्वासू, जवळचा आणि जुना मित्र मानला जातो. प्रत्येक कठीण प्रसंगात रशियाने नेहमीच भारताला सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले आधुनिक संरक्षण तंत्रज्ञान (Defense Technology) पुरवून ही मैत्री अधिक दृढ केली आहे. मात्र, आता रशियाने आशिया खंडातील आणखी एका देशासोबत असाच एक मोठा करार करून जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. रशियाने आता थेट अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारसोबत लष्करी सहकार्य करार (Military Cooperation Pact) केला आहे.

  • 30 May 2026 09:47 AM (IST)

    30 May 2026 09:47 AM (IST)

    Todays Gold-Silver Price: सोने आणि चांदी दोन्ही तेजीत

    Gold Rate Today: भारतात 30 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,765 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,451 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,824 रुपये आहे. भारतात 30 मे रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,44,510 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,57,650 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,18,240 रुपये आहे. भारतात 30 मे रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 280.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,80,100 रुपये आहे.

  • 30 May 2026 09:15 AM (IST)

    30 May 2026 09:15 AM (IST)

    US-Iran Deal: ‘तुमच्या कुटुंबाला माझा…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली सिच्युएशन रूममध्ये तातडीची बैठक

    US Iran Situation Room Meeting Update : जागतिक राजकारणातून आणि विशेषतः मध्यपूर्वेतून (Middle East) या घडीची सर्वात मोठी आणि जगाचे लक्ष वेधून घेणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’बाबत (Strait of Hormuz) एक ऐतिहासिक आणि धक्कादायक विधान केले आहे. ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, अमेरिका इराणवरील आपली अभूतपूर्व नौदल नाकेबंदी आता उठवणार आहे. परंतु, यासाठी अमेरिकेने इराणसमोर अण्वस्त्रांचा कायमचा त्याग करण्याची अत्यंत कडक अट ठेवली होती, ज्यावर आता सकारात्मक घडामोडी घडताना दिसत आहेत. ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर जागतिक बाजारातील खनिज तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • 30 May 2026 09:10 AM (IST)

    30 May 2026 09:10 AM (IST)

    LIC Share Bonus: शेअर बाजारात LIC चा शेअर ५० टक्के घसरल्याचे दिसल्याने खळबळ 

    LIC Share Bonus:  शेअर बाजारात आज (२९ मे) भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) शेअर पहिल्या नजरेत तब्बल ५० टक्क्यांनी घसरलेला दिसल्याने गुंतवणूकदारांमध्ये काही काळ चिंतेचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्षात हा शेअर इतका मोठा घसरलेला नाही. हा बदल कंपनीने जाहीर केलेल्या १:१ (1:1) गुणोत्तरातील बोनस शेअर (Bonus Share) आणि त्यानंतर शेअरच्या किंमतीत झालेल्या समायोजनामुळे (Price Adjustment) झाला आहे.

  • 30 May 2026 09:05 AM (IST)

    30 May 2026 09:05 AM (IST)

    IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपला,फायनल गाठल्यानंतर वैभव सूर्यवंशी भावूक

    चंदीगड: आयपीएल २०२६ (IPL 2026) चा हा संपूर्ण सीजन ज्या एका खेळाडूने आपल्या अद्भूत फलंदाजीने गाजवला, तो म्हणजे राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. मागच्या सीजनमध्ये पदार्पण (Debut) करणाऱ्या या खेळाडूने यंदाच्या हंगामात अशी काही खणखणीत फलंदाजी केली की, त्याला रोखणे जगातील कोणत्याही गोलंदाजाला जमले नाही. मात्र, काल चंदीगडच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले, ज्यामुळे दमदार कामगिरी करूनही वैभव सूर्यवंशी कमालीचा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

  • 30 May 2026 09:00 AM (IST)

    30 May 2026 09:00 AM (IST)

    Cyclone and Heavy Rain Alert: १५ राज्यांत चक्रीवादळासह अतिमुसळधार पावसाचा इशारा 

    Cyclone and Heavy Rain Alert:  देशासह राज्याच्या हवामानात सध्या अत्यंत मोठा आणि वेगवान बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सून देशात लवकरच दाखल होण्याचे संकेत मिळत असतानाच, दुसरीकडे अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) आणि चक्रीवादळाच्या (Cyclone) संकटाने देशातील अनेक भागांत मोठा धुमाकूळ घातला आहे. भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

     हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश या प्रमुख राज्यांसह देशातील एकूण १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 30 May 2026 08:55 AM (IST)

    30 May 2026 08:55 AM (IST)

    TET Exam Deadline Extended: सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; शिक्षकांना 'टीईटी'साठी मुदतवाढ 

    TET Exam Deadline Extended: देशातील शिक्षक आणि शिक्षण वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिक्षकांसाठी अनिवार्य असलेली टीईटी (Teacher Eligibility Test - शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आता नवीन वाढीव मुदत मिळाली आहे.

    आता ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत मुदत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नवीन आदेशानुसार, शिक्षकांना आता ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करता येणार आहे. ही मुदतवाढ मिळाल्यामुळे हजारो शिक्षकांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला असून, परीक्षेच्या तयारीसाठी आता अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

  • 30 May 2026 08:50 AM (IST)

    30 May 2026 08:50 AM (IST)

    Parbhani Pathri Road Accident: परभणी-पाथरी मार्गावर भीषण अपघात 

    परभणी: परभणी-पाथरी रस्त्यावर रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. एका खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या या अपघातात मानवत येथील चार तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मानवत शहरासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

    राहुल जिनिंगसमोर घडला अपघात मिळालेल्या माहितीनुसार, 'NL 01 B 1374' या क्रमांकाची एक खासगी ट्रॅव्हल्स परभणीहून पुण्याच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जात होती. ही ट्रॅव्हल्स परभणी-पाथरी मार्गावरील राहुल जिनिंग परिसरात आली असता, समोरून येणाऱ्या 'MH 22 BB 4724' क्रमांकाच्या दुचाकीला (बाईक) या ट्रॅव्हल्सची अत्यंत भीषण समोरासमोर धडक बसली.

  • 30 May 2026 08:45 AM (IST)

    30 May 2026 08:45 AM (IST)

    Vidhan Parishad Election: मविआमध्ये साताऱ्याची जागा शरद पवार गटाकडे 

    सातारा: महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या (Legislative Council) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता शेवटचे अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची निश्चिती आणि मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

    महाविकास आघाडीचे जागावाटप स्पष्ट; मविआ सर्व जागा लढवणार एकीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपासंदर्भात अद्यापही खलबते आणि चर्चा सुरू असताना, दुसरीकडे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीने (MVA) सर्वच्या सर्व १७ जागा लढवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला पुढीलप्रमाणे ठरला आहे:

  • 30 May 2026 08:40 AM (IST)

    30 May 2026 08:40 AM (IST)

    Mumbai CNG PNG Price Hike: पेट्रोल-डिझेलपाठोपाठ मुंबईकरांना महागाईचा मोठा झटका 

    मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी (Petrol Diesel Prices Hike) आधीच हैराण झालेल्या मुंबईकरांना आता महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रात (MMR) सीएनजी (CNG) आणि घरगुती पीएनजीच्या (PNG) दरात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या नवीन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, रिक्षा-टॅक्सी चालक आणि खासगी वाहनधारकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून (MGL) करण्यात आलेल्या या दरवाढीनुसार,  मुंबई आणि परिसरात सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर आता सीएनजीचा दर ८६ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे.

Web Title: 30th may 2026 live breaking news marathi maharashtra national international petrol diesel price hike sports economy news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • international politics
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • National Politics

संबंधित बातम्या

Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप
1

Rohit Pawar News: TET घोटाळ्यातील आरोपी आणि भाजप नेत्याचे आर्थिक कनेक्शन ! रोहित पवारांचा गंभीर आरोप

Maharashtra Breaking News Updates Today: ‘डीपफेक’ विरोधात नितीन गडकरी यांची कोर्टात याचिका दाखल
2

Maharashtra Breaking News Updates Today: ‘डीपफेक’ विरोधात नितीन गडकरी यांची कोर्टात याचिका दाखल

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल
3

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री केंद्रात जाणार का? विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी एका उत्तरात राजकारण संपवल

Maharashtra Breaking News Updates Today: अखेर  धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा
4

Maharashtra Breaking News Updates Today: अखेर धर्मेंंद्र प्रधान यांचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.