Maharashtra Breaking News Updates Today
Mumbai Rain Update: गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे आणि उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आज सकाळपासून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या उपनगरांसह विविध भागांत आज अचानक ढग दाटून येत हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे मुंबईतील वातावरणात छान गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना मे हीटच्या त्रासापासून मोठा आराम मिळाला आहे.
मे महिन्यातील कडक ऊन आणि दमट हवामानामुळे मुंबईकर सध्या घामाघूम झाले होते. मात्र, आज सकाळी उपनगरातील खालील भागांमध्ये अचानक हवामानात बदल झाला आणि हलक्या सरी कोसळू लागल्या:
03 Jun 2026 05:40 PM (IST)
RRB NTPC UG City Slip 2026: रेल्वे भरती बोर्डाने (RRB) एनटीपीसी युजी परीक्षा २०२६ साठी ‘सिटी इंटिमेशन स्लिप’ (परीक्षा शहर माहिती पत्रक) जाहीर केली आहे. याद्वारे उमेदवारांना त्यांच्या परीक्षा शहराची (Exam City) माहिती मिळवता येणार आहे. ही स्लिप ‘आरआरबी एनटीपीसी युजी CBT-1’ परीक्षेसाठी जारी करण्यात आली आहे.
भारतीय रेल्वेमधील भरतीसाठी होणाऱ्या या परीक्षेस बसलेले उमेदवार आता अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपल्या परीक्षा शहराची माहिती पाहून ती स्लिप डाउनलोड करू शकतात. परीक्षा शहराची माहिती मिळाल्यामुळे उमेदवारांना प्रवासाचे नियोजन आणि इतर तयारी आधीच करता येणे शक्य होईल. चला तर मग, ‘आरआरबी एनटीपीसी युजी सीबीटी-१’ परीक्षेची सिटी इंटिमेशन स्लिप डाउनलोड करण्याची थेट लिंक आणि पद्धत सविस्तर जाणून घेऊया.
03 Jun 2026 05:24 PM (IST)
अभिनेत्री जुही चावला हे नाव 90 च्या दशकातील सगळ्यात सुंदर आणि सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत वरच्या स्थानी नमूद होते. आजही या अभिनेत्रीने तिच्या वरच्या स्थानात बदल होऊ दिला नाही आहे. आताच्या वेळी अभिनेत्री जुही चावला देशातली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री आहे. अभिनेत्री 7,790 कोटींची मालकीण असून IPL मध्ये शाहरुखच्या Kolkata Knight Riders या संघाची सहमालकीणही आहे. दरम्यान, सध्या तिने तिच्या लग्नाबाबत काही गोष्टी तिच्या चाहत्यांपासून लपवले होते. याविषयी चर्चा सुरु आहेत. एका मुलाखतीमध्ये तिने या मागच्या कारणाविषयीही स्पष्ट केले.
03 Jun 2026 05:10 PM (IST)
Karnataka Politics: कर्नाटकच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष D. K. Shivakumar यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. लोक भवन येथील ग्लास हाऊसमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल Thawar Chand Gehlot यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्यास काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डी. के. शिवकुमार यांच्यासोबत इतर १३ आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. जी. परमेश्वर यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इतर नावांमध्ये यतींद्र सिद्धरामय्या, यू. टी. खादर, एम. बी. पाटील, के. जे. जॉर्ज, के. एच. मुनियप्पा, सतीश जारकीहोळी, रामलिंगा रेड्डी, कृष्णा बायरेगौडा, प्रियांका खर्गे, ईश्वर खंड्रे, बायराथी सुरेश आणि शरण प्रकाश पाटील यांचा समावेश आहे.
03 Jun 2026 04:45 PM (IST)
अनेकदा ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ विकणारे वेंडर १० रुपयाची वस्तू २०-३० ला १०० ची २००-३०० ला देतात. यामुळे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु तरीही वेंडर्स सुधारण्याच नाव घेत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका प्रवाशाने ८० रुपयाची वस्तू १३० ला लावल्याने विक्रेत्याला जाब विचारला आहे. यावर संतापून विक्रेत्याने प्रवाशाल थेट धमकीच दिली आहे. प्रवाशाला ट्रेनमधून फेकून देण्याची धमकी या वेंडरने दिली आहे. प्रवाशाने जेव्हा विक्रेत्याला बिल मागितले तेव्हा संतापून विक्रेत्याने तुला ट्रेनमधून फेकून द्यायला जराही वेळ लागणार नाही असे म्हटले आहे.
03 Jun 2026 04:38 PM (IST)
मीरा-भाईंदर शहरातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान मंदिराजवळ भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या क्रेटवरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन एका भाजी विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भाजी मार्केटमध्ये दोन विक्रेत्यांमध्ये टोमॅटोच्या क्रेटवरून वाद झाला होता. वाद वाढल्यानंतर धीरज गुप्ता याने लोखंडी रॉडने संतोष लल्लन सिंह यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात संतोष सिंह गंभीर जखमी झाले.
03 Jun 2026 04:22 PM (IST)
JoSAA Counselling 2026: देशातील प्रमुख राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ‘जॉइंट सीट अलोकेशन अथॉरिटी’ची (JoSAA Counselling 2026) समुपदेशन (काउन्सिलिंग) प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशातील नामांकित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIITs) आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट (GFTIs) मध्ये प्रवेश मिळेल. ‘जोसा’ने जाहीर केलेल्या अधिकृत सीट मॅट्रिक्सनुसार, यंदा इंजिनिअरिंगच्या जागांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
03 Jun 2026 04:10 PM (IST)
महिला T- २० विश्वचषक 2026 पूर्वी भारताच्या महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टाँटन येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक T- २० सामन्यात इंग्लंडने भारताचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून १८० धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात, इंग्लंडच्या फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत १८१ धावांचे लक्ष्य सहज पार करत सामना जिंकला. विश्वचषकाला अवघे काही दिवस उरले असताना टीम इंडियाचा हा पराभव संघाची चिंता वाढवणारा आहे. यामुळे विश्वचषकासाठी भारतीय संघ किती सज्ज आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
03 Jun 2026 04:00 PM (IST)
Rohit Pawar tweet on farmer loan waiver: राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. या कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैंठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. मात्र आगामी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी आणि शर्तीसंदर्भात परिपत्रक काढणार आहे. पण या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विटर एक्सवर पोस्ट करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:55 PM (IST)
राज्य शासनाच्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात अमरावती विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले. राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या निकालात जिल्ह्यातील चार बसस्थानकांनी राज्यस्तरीय क्रमवारीत स्थान मिळवून स्वच्छता व प्रवासी सुविधांबाबतचा आदर्श निर्माण केला. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील आठ बसस्थानकांची जिल्ह्याबाहेरील पथकाकडून तपासणी करण्यात आली होती. स्पर्धेच्या ‘ब’ गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजार बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकाविला. ‘क’ गटात अंजनगाव सुर्जी बसस्थानकाने द्वितीय स्थान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:50 PM (IST)
मुंबई: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर काही नेते नाराज आहेत. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी या नेत्यांनी पक्षाच्या ‘हायकमांड’ची (केंद्रीय नेतृत्वाची) भेट घेण्याचे ठरवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ज्येष्ठ नेत्यांना असे वाटते की, पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेताना आणि रणनीती आखताना त्यांचे मत विचारात घेतले जात नाही. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:45 PM (IST)
IPL 2026 च्या अंतिम सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा स्टार फलंदाज टिम डेविड पुन्हा एकदा मोठ्या वादात अडकला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात IPL आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टिम डेविडवर कठोर कारवाई केली आहे. डेविडला सामन्याच्या फीपैकी ५० टक्के दंड ठोठावण्यात आला असून त्याला IPL 2027 मधील पहिल्या सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:40 PM (IST)
Upcoming Realme Smartphone: टेक कंपनी रियलमी लवकरच भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी त्यांच्या ‘पी सीरीज’चा विस्तार करत realme P4R हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीने वेबसाईटवर या स्मार्टफोनचा एक टिझर देखील शेअर केला आहे. 10 जून रोजी कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये कंपनी आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी ऑफर करणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आले नसले तरी देखील कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:35 PM (IST)
राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत १ कोटी १४ लाख ४४ हजार ७६३ स्मार्ट मीटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील ४७.३१ टक्के वीज ग्राहक स्मार्ट मीटरिंग यंत्रणेशी जोडले गेले आहेत. सर्वाधिक ४३ लाख ३ हजार ३०३ स्मार्ट मीटर बसवून कोकण विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेचं नेमकं काय आहे महत्त्व जाणून घेऊयात. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:30 PM (IST)
बिहार: बिहार येथून नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलीचे लग्न आपल्या बॉयफ्रेंडसोबतच लावून दिले. जेव्हा मुलीला याबाब समजले तेव्हा घरात वाद होत होते. या सततच्या वादाला कंटाळून महिलेने आणि जावयाने मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना बिहारच्या अररिया मध्ये घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वाचा काय घडलं?
03 Jun 2026 03:25 PM (IST)
Mhada Lottery 2026 News Marathi : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Mhada) मुंबई बोर्डाने आयोजित केलेल्या २,६४० फ्लॅट्सच्या लॉटरीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या लॉटरीसाठी ७५,३६६ अर्ज आले, म्हणजेच प्रत्येक घरामागे सरासरी २८.५४ अर्ज आले. ही आकडेवारी मुंबईकरांमध्ये परवडणाऱ्या घरांसाठी असलेली प्रचंड मागणी स्पष्टपणे दर्शवते. मुंबई बोर्डाने ३० मार्च २०२६ रोजी विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत २,६४० फ्लॅट्ससाठी संगणकीकृत लॉटरीची घोषणा केली होती. २८ मे पर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. या लॉटरीमध्ये समाविष्ट असलेले फ्लॅट्स कन्नमवार नगर (विक्रोळी), पात्रा चाळ-सिद्धार्थ नगर (गोरेगाव), ओल्ड मागाठाणे (बोरिवली), गोराई, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, दादर, वडाळा, पवई आणि माझगाव यासह अनेक भागांमध्ये आहेत. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:20 PM (IST)
मध्यपूर्वेतील तणाव प्रचंड वाढला असून इराणने पुन्हा एकदा आखाती देशांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच इराणने कुवेतच्या आतंरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात कुवेतचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर कुवेतने विमानासेवा तात्पुरती स्थगित केली आहे.
The Iranian terrorist regime struck Kuwait International Airport in its latest wave of ballistic missile and drone attacks against the Gulf state. pic.twitter.com/cI1D1zUSc2
— Israel War Room (@IsraelWarRoom) June 3, 2026
03 Jun 2026 03:15 PM (IST)
Mansukh Madvia: आज तीन जून. 3 जून हा सर्वत्र जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील (Sports) तरुणांना एक खास संदेश दिला आहे. त्यांनी सायकलिंगला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:10 PM (IST)
US Mexico border drug tunnel 2026 : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर आपल्या काळ्या धंद्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक नमुना अमेरिका-मेक्सिको (America) सीमेवर उघडकीस आला आहे. एखाद्या हॉलिवूड चित्रपटालाही मागे टाकेल अशा पद्धतीने मेक्सिकन ड्रग्ज कार्टेलने जमिनीखाली तब्बल १७ मीटर खोल ‘कोकेन महामार्ग’ तयार केला होता. हा केवळ एक साधा खड्डा नव्हता, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेला एक सुसज्ज भुयारी मार्ग होता. जेव्हा अमेरिकन फेडरल एजंट्सनी या बोगद्याचा शोध लावला, तेव्हा त्यातील हाय-टेक व्यवस्था पाहून अनुभवी अधिकारीही थक्क झाले. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:05 PM (IST)
पेण: दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रत्येक तालुक्यातील बांधकाम विभाग पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करत असतो. जिल्हा परिषदेच्या पेण तालुक्यातील बांधकाम विभागाच्या ऑडिटमधून पेण पूर्व भागातील वरसई, जावळी आणि आष्टे या भागातील ३ पूल अतिधोकादायक म्हणून घोषित केले. तीनही पूल अतिधोकादायक जाहीर केल्यानंतर ग्रामपंचायतींना पुलाच्या सुरुवातीस सूचना दर्शक फलक लावून अहवाल सादरच्या सूचना दिल्या आहेत. वाचा सविस्तर
03 Jun 2026 03:00 PM (IST)
सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्याकडून अभयसिंह खाशेराव जगताप यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सादर झाल्याने त्यांची उमेदवारी वैध ठरली असून उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे बाळासाहेब ऊर्फ प्रताप पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत. वाचा सविस्तर
03 Jun 2026 02:56 PM (IST)
अहिल्यानगरमध्ये तिसगाव-शेवगाव मार्गावर वृद्धेश्वर कारखाना परिसरात एसटीचा भीषण अपघात झाला. एसटी बसचे टायर निखळल्यामुळे बस रोड सोडून खड्डयात गेली. अपघात एवढा भीषण होता की, प्रवाशांनी मृत्यूचा थरार अनुभवला. या अपघातात एसटीची दोन्ही चाके तुटली! अपघातात एसटी बसमधील 10 प्रवासी जखमी भीषण झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखले करण्यात आले आहे. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती सुमारे आली आहे.
03 Jun 2026 02:45 PM (IST)
महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबईत काढण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आक्रमक आंदोलनादरम्यान खादार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनल्यामुळे आणि कार्यकर्त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.
03 Jun 2026 02:36 PM (IST)
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विघ्नेश सज्जन शेजाळ आणि अनंत महादेव नलवडे, हे दोघेही मित्र मेंढरं घेऊन चरण्यासाठी शेतात फिरत होते. अशा मध्येच विहिरीत पोहण्यासाठी गेल्यावर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला असावा, असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली आहे.
03 Jun 2026 02:25 PM (IST)
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब हे शेतकरी होते. मात्र आज शेतीची अवस्था बिकट झालेली आहे. मी शेतकऱ्यांना आवाहन करते, मी सुद्धा स्वतः शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या प्रत्येक दुःखात आवाज उठवण्याचे, मी काम करणार आहे. हा माझा आजच्या दिवशीचा मोठा संकल्प. पण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून स्मृती समाधी स्थळावरून मोठी घोषणा केली आहे. माझा प्रत्येक श्वास हा कष्टकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहे. कुणीही घाबरू नका. एकमेकांना मदत करण्याची भावना ठेवा. जो कोणी एकमेकांची मदत करील त्याच्यावर माझी दृष्टी असेल, हीच मुंडे साहेबांची शिकवण आहे आणि स्वाभिमानाने जगा, मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
03 Jun 2026 02:16 PM (IST)
धाराशिव इथल्या येरमाळामधील येडेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात टोळक्याची गुंडगिरी वाढली आहे. शंभर रुपयांच्या पार्किंगच्या पैशासाठी भाविकाला मारहाण केली. रॉड, दगड, बेल्ट याने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, देवीच्या दरबारात महिला भाविकालाही जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. गावगुंडांकडून भाविकाला बेदम मारहाण झाली असली, तरी पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे.
03 Jun 2026 02:05 PM (IST)
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी यवतमाळ विधान परिषद निवडणूकीतून माघार घेतल्याने मविआला मोठा झटका बसला आहे. संख्याबळ जुळत नसल्याने मी निवडणूकीतून माघार घेत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. काँग्रेसवतीने तिकीट दिली त्याबाबद्दल नेत्याचे आभार मानले. जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अर्ज मागे घेतला आहे.
03 Jun 2026 02:00 PM (IST)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे.बीसीसीआयने माजी भारतीय क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांची भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक गटात आता अनुभवी स्पिन तज्ज्ञाची भर पडली असून, हा निर्णय आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून मुल्लानपूर येथे खेळला जाईल. या सामन्यात भारताचे नेतृत्व शुभमन गिल करेल.
03 Jun 2026 01:55 PM (IST)
संत सखुबाईंच्या निस्सिम भक्तिगाथेचं नवं आवर्तन पाहायला मिळणार आहे. कथानकात तब्बल ८ वर्षांचा लीप घेतला जाणार असून, या नव्या टप्प्यात संत सखुबाईंची भूमिका अभिनेत्री सान्वी जांबेकर साकारणार आहे.यासंदर्भातील नवा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून मालिकेबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे. या निमित्ताने मालिकेची प्रेस कॉन्फरन्स सेटवर पार पडली. यावेळी मालिकेतील कलाकार, निर्माते संगीत कुलकर्णी आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.येत्या ४ जूनपासून ‘सखा माझा पांडुरंग’मधील संत सखुबाईंचं नवं आवर्तन दररोज सायंकाळी ७:३० वाजता सन मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
03 Jun 2026 01:45 PM (IST)
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि नियोजनबद्ध करण्यासाठी ‘नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने’ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मदतीने एक व्यापक वाहतूक आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत एकूण ४५०० विशेष बस चालवल्या जाणार असून, दररोज ३३ लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता निर्माण केली जाईल. मुख्य धार्मिक परिसरात खासगी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा बाह्य वाहनतळ, रेल्वे स्थानके आणि घाट परिसराला जोडणार आहे.
03 Jun 2026 01:35 PM (IST)
क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकरम्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री आपल्या वेगळ्या आणि दर्जेदार भूमिकांमुळे कायमच चर्चेत असते. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत तिने आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली असून, विविध प्रकारच्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारत तिने आपली ओळख अधिक मजबूत केली आहे.नावीन्यपूर्ण भूमिका आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सई ताम्हणकरने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपत तिने अनेक लक्षवेधी पात्रांना न्याय दिला आहे.
03 Jun 2026 01:30 PM (IST)
आयपीएल २०२६ पूर्वी, टी-२० फॉरमॅटमध्ये स्फोटक सलामीवीर म्हणून अभिषेक शर्माला पर्याय नाही असे वाटत होते. मात्र, हंगामाच्या अखेरीस, नवीन सलामीवीरांनी इतका जबरदस्त प्रभाव पाडला आहे की भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तीव्र लढाई सुरू झाली आहे. भारताच्या टी-२० विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभिषेक आणि संजू सॅमसन या सलामीच्या जोडीवर आता भारतीय संघातील आपले स्थान गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेटने सलामीवीरांसाठी उघडलेली ही पेटी निवड समितीसाठी एक सुखद वेदना ठरणार आहे.
03 Jun 2026 01:25 PM (IST)
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारत सरकारने वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आणि आयएफएस (IFS) विपुल यांची सौदी अरेबियामध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे. सौदी अरेबियासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि इस्लामिक देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्त होणारे विपुल हे पहिलेच हिंदू आयएफएस अधिकारी ठरले आहेत. यापूर्वी या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या पदावर डॉ. सुहेल एजाज खान कार्यरत होते, ज्यांनी १६ जानेवारी २०२३ रोजी आपला पदभार स्वीकारला होता. आता त्यांच्या जागी विपुल हे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
03 Jun 2026 01:20 PM (IST)
स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेच्यावतीने गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील यांना निवेदन देण्यात आले. प्रत्येक पंचायत समिती तालुकास्तरावर गट संसाधन केंद्र असून, यामध्ये गट समन्वयक व समूह समन्वयक अशी पदे कंत्राटी तत्त्वावर आहेत. डिसेंबर २०२५ पासून या कक्षातील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रवास खर्च, मुलांचा शैक्षणिक खर्च, कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवताना ताळमेळ जुळत नाही. सहा महिने वेतन नसल्याने मोठ्या गैरसोयीला त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
03 Jun 2026 01:15 PM (IST)
कल्याण ग्रामीणमधील खोणी गावात राजकीय घडामोडींना अचानक वेग आला असून, दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काही कार्यकर्त्यांनी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) पुनरागमन केले आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.भाजपमध्ये प्रवेश हा गैरसमजातून झाल्याचा दावा करत संबंधित कार्यकर्त्यांनी मनसेत पुनरागमन केले.
03 Jun 2026 01:05 PM (IST)
उद्योग विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचलानालयाने वेदांता उद्योग समुहाच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर छापे टाकल्याची माहिती आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत (फेमा) संशयास्पद परकीय चलन उल्लंघन आणि सीमापार आर्थिक व्यवहारांच्या तपासाच्या संदर्भात वेदांता ग्रुपशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे आणि शोधमोहीम राबवण्यात आली.
03 Jun 2026 12:55 PM (IST)
क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आपल्या आगामी २०२६/२७ च्या देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून, भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात पाच टी-२० आंतरराष्ट्रीय, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश असेल. सामन्यांच्या संख्येनुसार, हा १२ सामन्यांचा दौरा न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा देशांतर्गत दौरा ठरणार आहे. या दौऱ्याची सुरुवात २२ ऑक्टोबर रोजी मर्यादित षटकांच्या मालिकेने होईल, त्यानंतर वेलिंग्टन आणि क्राइस्टचर्च येथे दोन कसोटी सामने खेळवले जातील.
03 Jun 2026 12:45 PM (IST)
सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. पत्नीसाठी तब्बल सहा मिनिटांचा भावनिक व्हिडीओ तयार केल्यानंतर एका 38 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. जाकीर अब्दुल्ल रज्जाक पटेल असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद आणि पत्नीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे मानसिक तणावात असलेल्या जाकीर यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
03 Jun 2026 12:35 PM (IST)
IndiGo कंपनी ३१ ऑगस्टपासून युनायटेड किंगडममधील मँचेस्टर शहरासाठीची आपली विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करणार आहे. या निर्णयामागे कंपनीने वाढती परिचालन आव्हाने आणि वाढता खर्च ही कारणे दिली आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे निर्माण झालेला आर्थिक दबाव आणि कामकाजातील व्यत्ययांचा सामना कंपनी करत असतानाच, हे पाऊल उचलण्यात आले आहे.
03 Jun 2026 12:25 PM (IST)
मान्सूनपूर्व पहिल्याच पावसाने मंगळवारी (२ जून 2026) दुपारी वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने काही तासातच रस्त्यांवर पाणीच पाणी वाहू लागले. खोदून ठेवलेले रस्ते, वाहतूकीत केलेला बदल व अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळल्या तर वीज पुरवठाही खंडीत झाला. रस्त्यावर सर्वच कचरा वाहून आल्याने धुळधाण उडाली.
03 Jun 2026 12:15 PM (IST)
अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
03 Jun 2026 12:07 PM (IST)
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेतील व्यापार (India US Trade) तणाव अनेक वेगळे वळण घेत आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारावर वाटाघाटी चर्चा सुरु असताना पुन्हा टॅरिफच्या धमकीचे सत्र सुरु झाले आहे. ट्रम्प पुन्हा भारतावर टॅरिफ लादण्याच्या तयारीत आहे. सक्तीच्या मजुरीला (Forced Labour) आळा न घातल्याच्या आरोपावरुन हे टॅरिफ लादले जाण्याची शक्यता आहे.
03 Jun 2026 12:00 PM (IST)
पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथे पत्नीने दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून एका व्यक्तीने ढेकूण मारण्याचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
03 Jun 2026 11:50 AM (IST)
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप एका नव्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर यूजर्सच्या प्रायव्हसीला धक्का न लावता स्कॅमर्सना पकडणार आहे. व्हॉट्सअॅपचे नवीन सुरक्षा फीचर संशयास्पद मेसेज ओखळणं आणि स्कॅमपासून यूजर्सचा बचाव करण्यासाठी मदत करणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे आगामी फीचर अनोळखी नंबरवरून येणारे संशयास्पद मेसेज ओळखणार आहे आणि चॅटमध्ये यूजर्सना या मेसेजबाबत अलर्ट करणार आहे. नव्या फीचरअंतर्गत मेसेजिंग ॲप संशयास्पद मेसेज हाताळताना यूजर्सना सुरक्षेचा आणखी एक स्तर प्रदान करू शकते.
03 Jun 2026 11:40 AM (IST)
आयपीएल २०२६ मध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने एक अतिशय रंजक खुलासा केला आहे. स्पर्धेनंतर अनेक पुरस्कार जिंकलेल्या वैभवने सांगितले की, त्याने या ऐतिहासिक यशाची पटकथा हंगाम सुरू होण्यापूर्वीच आपल्या मोबाईल फोनच्या नोट्समध्ये लिहिली होती. वैभवने केवळ आपले वैयक्तिक लक्ष्यच गाठले नाही, तर मैदानावर असे वादळ निर्माण केले की ख्रिस गेलसारख्या दिग्गजांचे जुने विक्रमही मोडीत निघाले.
03 Jun 2026 11:30 AM (IST)
व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज या पाच दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहे. याचा उद्देश भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध दृढ करणे आहे. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केल्यानंतर कार्यवाहक म्हणून देशाची धुरा हाती घेतली.
03 Jun 2026 11:20 AM (IST)
बिहार राज्यातील पाटणा येथे खान सरांचे कोचिंग सेटर सुरु आहे जिथे अचानक काही लोकांनी येऊन फायरिंग करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर कोचिंग सेंटरची तोडफोड करत सिक्योरिटी गार्डलाही मारहाण केली. या विरोधात खान सरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून यामागचे धक्कादायक कारण त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.
03 Jun 2026 11:10 AM (IST)
बीड जिल्ह्यातील रंजेगाव येथे जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्यामुळे एका दलित महिलेला अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण केल्याचा आरोप असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
03 Jun 2026 11:00 AM (IST)
कंगना रणौतच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, अंगावर काटा आणणार हा ट्रेलर असून हा चित्रपट देशाच्या त्या नायकांना आदरांजली आहे, ज्यांना आपण नावाने नव्हे, तर त्यांच्या कार्यामुळे ओळखतो. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान शौर्य दाखवून, स्वतःची पर्वा न करता इतरांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, लिफ्ट ऑपरेटर, सुरक्षा कर्मचारी आणि प्रशासकांना हा चित्रपट आदरांजली आहे.
03 Jun 2026 10:50 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये इव्हो व्हॉल्ट ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या बॅटल रॉयल ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना प्रीमियम इव्हो गन स्किन मोफत मिळवण्याची संधी मिळणार आहे. या ईव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या प्लेअर्सना पी-90 गिल्डेड करोजन आणि एम 1887 स्टर्लिंग कॉन्करर सारख्या इव्हो गन स्किन मोफत क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ईव्हेंटमध्ये मिळणाऱ्या इवो स्किनद्वारे तुम्ही गन स्किनला एक नवीन रुप देऊ शकता.
03 Jun 2026 10:40 AM (IST)
महाराष्ट्र शासनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची पदे मंजूर करण्याची (संच मान्यता) प्रक्रियेच्या निकषात बदल करण्याचा मसुदा अन्यायकारक असल्याचा आरोप कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी केला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक संधी हिरावून घेतल्या जाण्याची शक्यता असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. म्हणून संचमान्यता पूर्वीच्या पद्धतीनुसार व्हावी, अशी शिक्षकांची मागणी आहे.






