मोठी बातमी! मराठी भाषेला अधिकृत अभिजात दर्जा (फोटो सौजन्य-X)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा झाल्यानंतरही याबाबतचा शासन आदेश निघाला नव्हता. मात्र, आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचे स्वप्न पूर्ण झाले असून, याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मंत्री उदय सामंत यांना याबाबतचा आदेश सोपवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं महाराष्ट्राकडून स्वागत केलं जात आहे.
याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले, ‘महाराष्ट्राचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. मी मराठीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचं काम करायचं आहे. आता मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वाढली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचे आभारी मानतो.’






