सौजन्य - नवराष्ट्र टीम
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुंबईहून खास विमान या आमदारांना नेण्यासाठी कोल्हापुरात पाठवल्यात आले होते. कोल्हापुर विमानतळावरून हे सर्व आमदार आणि खासदार सकाळी मुंबईला रवाना झाले. लोकसभा निवडणुकीत एक खासदार तसेच विधानसभा निवडणुकीत सात आमदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांना नेण्यासाठी खास विमान पाठवण्यात आले होते.
सकाळी हे विमान कोल्हापुरात पोहोचल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी नूतन आमदार राजेश क्षीरसागर, राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवाजी पाटील, चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, राहुल आवाडे, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक हे सर्वजण या विमानामध्ये बसून मुंबईला प्रयाण केले. मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर नूतन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यासाठी महाराष्ट्राबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदारांची सोय एका खास हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.
हे सुद्धा वाचा : मायक्रो प्लॅनिंगमुळे जनाधार कायम; अजित पवारांची सावध भूमिका ठरली फलदायी
महायुतीला मोठं यश
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीच्या या यशात एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला आहे. राज्यातील लाडकी बहिणींनी महायुतीलाच मतदान केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड फिरवण्यात महायुती सरकारच्या पाच योजना कारणीभूत ठरल्या आहेत.
हे सुद्धा वाचा : मायक्रो प्लॅनिंगमुळे जनाधार कायम; अजित पवारांची सावध भूमिका ठरली फलदायी
सरोदे निकालाला आव्हान देणार
महायुतीच्या विजयानंतर निवडणूक निकालाला आव्हान देणार अशी असल्याची प्रतिक्रिया एडवोकेट असीम सरोदे यांनी दिली आहे. मतदान करणे जसे मतदारांचा अधिकार आहे. तसेच आपण केलेले मतदान कोणाला गेले आहे, हे जाणून घेण्याचा सुद्धा अधिकार लोकशाहीत आहे. त्यामुळे आता आम्ही या निवडणूक निकालाला आव्हान देणार असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
मनसेही कोर्टात जाणार
मनसेचे नेते दिलीप धोत्रे ईव्हीएमच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहेत. दिलीप धोत्रे यांनी एव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा आरोप केला. व्हीव्हीपॅटच्या स्लिपची फेर मोजणी करावी, अशी काल केलेली मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्याने मुंबई उच्च न्यायलायात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.