बीड : बीडमध्ये एसीबीने मोठी कारवाई केलीय. सेवानिवृत्त झाल्यानंतर संबंधितांकडून पैसे काढण्याचा मोह संस्था सचिव , मुख्याध्यापक यांच्यासह चौघांना आवरला नाही. त्याची राहिलेली कामे , थकलेला पगार , केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी, त्यांच्याकडे 12 लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. यातील पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारतांना, बीड एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. हा सर्व प्रकार बीडच्या केज तालुक्यात घडलाय.
याविषयी एसीबीने दिलेल्या माहीतीवरून तक्रारदाराचा थकलेला पगार व सेवानिवृत्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या वतीने, संस्थेच्या उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी गजानन शिक्षण प्रसारक मंडळ , तांबवा चे सचिव अशोक हरिभाऊ चाटे , गणेश माध्यमिक विद्यालय , तांबवा मुख्याध्यापक अनंत बाबुराव हांगे , सानेगुरुजी विद्यालय , तांबवा अध्यक्ष उद्धव माणिकराव कराड व मेडिकल मालक दत्तात्रय सुर्यभान धस यांनी 12 लाख रुपये लाचेची मागणी केली . लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या यादरम्यान एसीबीने सापळा लावला असता आरोपींनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. तसेच पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारताना पंचासमक्ष भगवान मेडिकल स्टोअर येथे रंगेहाथ पकडण्यात आलंय.
[read_also content=”शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं, भाजप जवळच्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ https://www.navarashtra.com/maharashtra/sharad-pawar-should-be-the-prime-minister-excitement-due-to-statements-made-by-leaders-close-to-bjp-nrdm-263473.html”]
दरम्यान या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे .