मुंबई : पत्राचाळ प्रकरणी ईडीनं कारवाई करत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ताब्यात घेतले आहे. त्यापुर्वी आज सकाळी त्यांची ९ तास चौकशी करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक राजकीय स्तरातून अनेक प्रतिक्रीया येत आहे. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, ‘संजय पांडे यांच्यानंतर घोटाळेबाज संजय राऊत आता ईडीच्या ताब्यात.’ ते ट्वीट करून असं म्हणाले आहेत.
किरीट सोमय्या ट्वीट करून म्हणाले आहेत की, ”संजय पांडे यांच्यानंतर घोटाळेबाज संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत हे आता नवाब मलिक यांचे शेजारच्या बनतील. हिशोब तर द्यावा लागेल.”
राऊत यांना ताब्यात घेण्याआधी ईडीचे पथक आज सकाळी 7 वाजताच त्यांच्या घरी दाखल झाले. ईडीने 9 तास खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये त्यांची चौकशी केली. त्यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. ईडीच्या कारवाई दरम्यान दादरमधील गार्डन कोर्ट इमारत परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे.