काय नेमकं प्रकरण?
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नरेंद्र भाटिया असे आहे. त्याला दोन दिवसांपूर्वी पोस्कोच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत असतांना त्याने रात्री आत्महत्या केली. रात्री झोपायला पांघरण्यासाठी दिलेली चादर फाडून गळफास तयार करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे.
Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल
यानंतर सकाळी पहाटे पोलिसांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला भेट देत माहिती घेतली. तर दुसरीकडे आरोपीच्या कुटुंबीयांनीही यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. यावरून पोलिसांनी केलेल्या चौकशीत आता एक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे
पोलीस उपनिरीक्षक नितीन आत्राम (नाईट ड्युटी अधिकारी) आणि अभय खडसे (ठाणा हजेरी गार्ड इन्चार्ज तसेच लॉकअप गार्ड इन्चार्ज), प्रमोद दूधकवरे (लॉकअप गार्ड ड्युटी), राहुल चव्हाण (लॉकअप गार्ड ड्युटी) असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मानकापूरमध्ये धक्कादायक प्रकार: शेजाऱ्याने तरुणीचा गळा दाबून खून, आत्महत्येचा बनाव उघडकीस
मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या विवाहित पुरुषाने तरुणीची हत्या केली. आरोपीने आधी तरुणीचा गळा दाबून खून केला आणि नंतर फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव केला. प्राची हेमराज खापेकर (२३, रा. राजलक्ष्मी सोसायटी, गोधनी रोड) असे मृताचे तर शेखर ढोरे (३८) असे शेजारी राहणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्राचीची आई रुक्मिणी खापेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले.
काही महिन्यांपासून शेखर प्राचीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले होते.कुटुंबीयांनी प्राचीला त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. प्राचीनेही बोलणे बंद केल्याने शेखर संतापला होता. सोमवारी सकाळी घरी कुणी नाही हे बघून शेखर तिच्या घरात शिरला. बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्राचीने नकार दिला. यावरून शेखर संतापला आणि त्याने प्राचीचे डोके जमिनीवर आपटले आणि गळा दाबून खून केला.
KRK Firing Incident: मुंबईत गोळीबाराचा थरार! अभिनेता केआरके पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडल?
Ans: नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या कोठडीत.
Ans: तो पोस्को (POCSO) गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी होता.
Ans: चौकशीनंतर एका उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.






