फोटो सौजन्य: iStock
संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्याबाबत आमदार अमोल खताळ यांनी आक्रमक होत पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस खाते खडबडून जागे झाले आहे. एलसीबीच्या पथकाने काल रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरातील कत्तल खांद्यावर छापा टाकून तब्बल २ लाख ८५ हजार रुपयांचे गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचा पथकातील कर्मचारी पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे विजय पवार बाळासाहेब गुंजाळ अमृत आढाव उत्तरेश्वर मोराळे हे संगमनेर शहरात पेट्रोलिंग करत असताना शहरातील जमजम कॉलनी परिसरातील कत्तलखान्यामध्ये जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती त्यांना समजली. या पथकाने रात्री सव्वा बारा वाजता सुमारास या ठिकाणी जाऊन खात्री केली. या पोलीस पथकाला जमजम कॉलनी मधील गल्ली नं.६ मध्ये एका पत्र्याचे शेडमध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल केले मांस दिसून आले. सदर कत्तल केलेले जनावरांचे मांस हे कोणाचे मालकीचे आहे? याबाबत पोलीस उपनिरीक्षक गुट्टे यांनी विचारपुस केली असता नवाज जावेद कुरेशी, समद जावेद कुरेशी, नावेद जावेद कुरेशी सर्व रा. भारतनगर संगमनेर (सर्व फरार) यांचे मालकीचे असल्याचे त्यांना समजले.
Ahilyanagar News: पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक! टाळ-मृदंगाच्या निनादात शेतकरी उतरले थेट कालव्यात
पोलिसांनी या ठिकाणाहून २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे ९५० किलो गोंमास, एक चाकू डिजिटल इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा ऐवज जप्त केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल योगेश कर्डीले यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी नवाज जावेद कुरेशी, समद जावेद कुरेशी, नावेद जावेद कुरेशी, रा. भारतनगर संगमनेर व इतर ३ ते ४ अनोळखी इसम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यावेळी सराईत आरोपी पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध सुरू आहे.
आमदार खताळ यांनी आढावा बैठकीत बोलताना शहरातील कत्तलखान्यावरून नाराजी व्यक्त केली. त्यांनी आक्रमक भूमिका घेत कत्तलखाने बंद झाले नाही तर पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले जाईल, असा इशारा दिला होता. यानंतर काही तासातच अहिल्यानगर येथील एलसीबीच्या पथकाने शहरातील कत्तल खाण्यावर कारवाई केली. एलसीबी चे पथक कारवाई करत असताना शहर पोलीस मात्र अद्यापही शांत असल्याचे दिसत आहे.
एलसीबीच्या कारवाईत नवाज कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही नवाज त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत त्याला अटक करण्यात आलेली होती. आपण यापुढे हा व्यवसाय करणार नाही असे त्याने न्यायालयात लिहून दिले होते. असे असतानाही तो शहरात मोठ्या प्रमाणावर गोमांस विक्रीचा व्यवसाय करत आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्तावही प्रलंचित आहे. असे असतानाही तो बेकादेशीर कत्तलखाने चालवत आहे.
संगमनेर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कत्तलखान्याबाबत दैनिक नवराष्ट्र मधून वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. शहरातील कत्तलखान्याला काही पोलीस अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. आमदार अमोल खताळ यांनी
कत्तलखान्याबाबत विधानसभेत आवाज उठवल्यानंतरही संगमनेर शहरात अवैध कत्तलखाने सुरूच आहेत आमदार खताळ यांच्या नाकावर टिच्चून हे कत्तलखाने सुरू असल्याने ते कत्तलखान्याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष होते.
नवाज कुरेशी, समद कुरेशी हे संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तल खाण्याचे प्रमुख आरोपी असून सध्या या प्रकरणात फरार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी कत्तलखान्याबाबत अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. आढावा बैठकीत बोलताना त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाचा इशारा दिला होता आमदार अमोल खताळ यांच्या इशारानंतर काही तासातच अहिल्यानगर येथील एलसीबीच्या पथकाने संगमनेरातील कतलखाण्यावर मोठी कारवाई केली.






