Photo Credit- Social media
मुंबई: महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. पण दुसरीकडे महायुतीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून तीनही पक्षात वादाची ठिणगी पडण्यास सुरूवात झाली आहे. धक्कादायक म्हणजे अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी तगडं प्लॅनिंग सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जागावाटपचा मुद्द्यावरून त्यांच्यावर महायुतीकडून दबाव टाकला जात आहे. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य़ विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी राजकीय पक्षांनी निव़डणुकीची तयारी सुरू केली आहे.महायुतीत जागावाटपावरून बैठकांचे सत्र सुरू आहे. कोण किती जागांवर निवडणूक लढणार, याबाबत वरिष्ठांमध्ये खलंबतं सुरू आहेत. पण जागावाटपाच्या मुद्द्यावरून तीनही पक्षांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचेही अनेकदा समोर आले आहेत. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतून बाहेर पडावे आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, यासाठी भाजप आणि शिंदे गटाने प्लॅनिंग सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हेही वाचा: अजित पवारांना शह देण्यासाठी पडद्यामागे हालचालींना वेग; शरद पवार नाशिकमध्ये दाखल
अजित पवार जर निवडणुकीपर्यंत महायुतीत राहिले तर भाजप आणि शिवसेनेच्या वाट्यालाही कमी जागी येतील. पण जर महायुतीतून बाहेर प़डले तर भाजप आणि शिंदे गटाला अधिकाधिक जागा लढवता येतील त्यामुळे आता या दोन्ही पक्षांनी अजित पवार यांच्यावर दबाव टाकण्यास सुरूवात केल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीकडून जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा लढवल्यास ठीक पण अजित पावारांना तडजोड स्वीकारायची नसले तर महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. इतकेच नव्हे तर, अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपच्या इच्छुकांनीही तयारी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार यांची चारही बाजूने कोंडी करण्यासाठी प्रयत्न केलेजात असल्याची चर्चाआहेत. त्यामुळे अपेक्षित जागावाटप न झाल्यास अजित पवारदेखील महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा:सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांच्या प्रयत्नांना यश, डिझेल तस्करीची केंद्र सरकारकडून दखल
दरम्यान महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसलातरी भाजप160-170 जागा लढवू शकते, अशी शक्यता आहेत तर शिंदे गटाने 100 जागांची मागणी केली आहे. पण त्यांना जास्तीत जास्त 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांनी 80-90जागा मागितल्या आहेत. पण त्यांच्या वाट्याला केवळ 25-30 जागा मिळण्याची शक्यता आहे.