Pune Nashik railway project: आंबेगाव-जुन्नर रेल्वे मार्ग बदलला; आंबेगाव-जुन्नरच्या विकासाला धक्का
आंबेगाव आणि जुन्नर परिसर पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असून मोठ्या प्रमाणात आदिवासी क्षेत्रही आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरासारखे जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक स्थळ, अष्टविनायकांतील ओझर व लेण्याद्री, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी ही ऐतिहासिक स्थळे रेल्वे मार्ग बदल्यामुळे रेल्वे रुळापासून दूर गेली आहेत. त्यामुळे पर्यटनाला मिळणारा वाव कमी झाला असून या निर्णयामुळे या भागातील आर्थिक प्रगती कोलमडणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
रेल्वे आंबेगाव-जुन्नर मार्गे गेली असती तर व्यवसायाला नवी दिशा मिळाली असती, मालवाहतूक खर्च कमी झाला असता आणि बाहेरून ग्रहक येण्यासाठी मोठी सोय झाली असती. हा निर्णय ऐकून तीव्र नाराजी वाटते.
८८ शिवनेरी, भीमाशंकर, ओझर येथे पर्यटन प्रचंड आहे. रेल्वेमुळे पर्यटकांचा ओघ वाढून हॉटेल उद्योग दुप्पट वाढला असता. आता मार्ग बदलल्याने विकास थांबणार अशी भीती आहे, असे मत मंचर येथील हॉटेल व्यावसायिक संदेश बागल व घोडेगाव येथील हॉटेल व्यवसायिक धनंजय फलके यांनी व्यक्त केले.
भूमीपुत्रांच्या जागा घेऊनही विकास नाही; KDMC प्रशासनावर माजी नगरसेवक मयूर पाटील यांचा संतप्त सवाल
– धनंजय फलके, हॉटेल व्यवसायिक
रेल्वे मार्ग या भागातून गेल्यास उद्योगपती, पर्यटन क्षेत्र, शिक्षण संस्था, व्यापारी वर्ग आणि स्थानिक लोकांना मोठा फायदा झाला असता. परंतु मार्ग बदलल्याने विकासाची अडथळ्यात अडकणार असल्याची – भीती निर्माण झाली आहे. आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांना रोजगार, जोडधंदे, गाडी बाजारपेठ आणि सोयीसुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा – होती. रेल्वेमुळे या दोन तालुक्यांचा नकाशाच पालटेल, असा विश्वास नागरिकांना होता.
आता हा प्रकल्प दूर गेल्याने “विकासाचे दार बंद झाले” अशी नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींची निष्क्रयता आणि योग्य पातळीवर पाठपुरावा न झाल्याचीही जोरदार चर्चा आहे. अनेक वर्षांपासून आशा लावून बसलेल्या नागरिकांमध्ये अविश्वासाची भावना वाढत आहे. रेल्वे प्रकल्पावर पुनर्विचार व्हावा, असा जोरदार आवाज उठू लागला आहे.
८८ रेल्वे आल्यास इथल्या पर्यटन व्यवसायाला प्रचंड बालना मिळाली असती, स्थानिक चालक, मार्गदर्शक, दुकानदार सर्वांनाच फायदा झाला असता, आता मार्ग सरळ शिर्डीकडे गेल्याने आमचे नुकसान झाले आहे.
– सदानंद मोरडे, अध्यक्ष भूमि अभिलेख संघटना, पुणे जिल्हा
“आमचा द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला याचा 66 मोटा पुरवटा पुणे नाशिक दरम्यान होला रेल्वेमुळे माल पोहोचवणे स्वस्त आणि जलद झाले असते. आता पुन्हा महागडे ट्रान्सपोर्टवर अवलंबून राहावे लागेल.
संजय पवळे, सरपंच पेठ






