मुंबई : मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. शिंदे सरकारला १६४ मते मिळाली, तर विरोधात ९९ मते पडली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अभिनंदनाचे तसेच शुभेच्छाचे पोस्टर, बॅनर सर्वंत्र झळकू लागले आहेत.
[read_also content=”संजय राऊतांचा मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा? किंवा त्यांनी कधी ढेकूण तरी मारला आहे का?, आमदार संजय शिरसाट यांची राऊतांवर बोचरी टिका https://www.navarashtra.com/maharashtra/show-photos-of-sanjay-raut-in-the-big-front-mla-sanjay-shirsat-harsh-criticism-on-raut-300852.html”]
मात्र नागपुरातील देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnvis) पोस्टरवरुन अमित शहा (Amit Shah) गायब झाले आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या पोस्टरवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackreay) गायब झाल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. एखाद्या बड्या नेत्याचा फोटो जेव्हा गायब होतो, तेव्हा लगेच चर्चा रंगू लागतात. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज प्रथमच नागपुरात दाखल झाले. राज्यात भाजपाची सत्ता स्थापन होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर झळकत आहेत. या पोस्टरवर सुद्धा लक्षवेधी मजकूर लिहला आहे. ‘महाराष्ट्राचा वाघ’, ‘तू कोणत्या मातीचा बनला आहेस या’ ‘त्याग की मूर्ती’, ‘देवमाणूस’ अशी स्तुतीसुमने या बॅनरच्या माध्यमातून फडणवीसांच्या समर्थकांनी उधळली. पण त्यातल्या अनेक पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फोटो झळकले. मात्र केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा फोटोच नाही. त्यामुळे एक वेगळीच कुजबुज सुरू झाली होती. तसेच चर्चांना उधाण आलं आहे. तसेच चर्चा तर होणारच
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिंदे समर्थकांनी पोस्टर लावले आहेत. या पोस्टर्सवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे. शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी ‘उठाव’ करत आपण शिवसेनेत असल्याचे म्हटले आहे. जर ते शिवसेनेत आहेत तर, त्यांच्या पोस्टरवर पक्षप्रमुखांचा फोटो का नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळं दोन बड्या नेत्यांचे अचानक पोस्टरवरुन गायब झाल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.