नवनीत राणा नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात (फोटो- ट्विटर)
अमरावती: काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. तसेच नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. विद्यामन खासदारांचे निधन झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. कॉँग्रेसने दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता त्यांनी नकार दिल्याने भाजपकडून माजी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नवनीत राणा या नांदेड पोटनिवडणूक लढण्याची शक्यता आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. कॉँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला होता. त्याआधी नवनीत राणा या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र २०२४ मध्ये भाजपकडून अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान नांदेड पोटनिवडणुकीतून माजी खासदार नवनीत राणा यांचे पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे.
नवनीत राणा यांना नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतून उमेदवारी देण्याची मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावर भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे महत्वाचे असणार आहे. दरम्यान नांदेडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. कॉँग्रेसकडून दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. तर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यास नांदेडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.
भाजपकडून नांदेडसाठी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कदाचित नवनीत राणा यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे.