सर्वच पक्षात उमेदवारीचा 'सस्पेन्स' कायम, बंडखोरीच्या भीतीने सावध; शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांवर पडदा
त्यामुळे शेवटच्या क्षणीच उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी अर्जाची उचल मोठ्या प्रमाणात झाली असली, तरी अद्याप अर्ज दाखल करण्याबाबत इच्छुकांनी संयमाची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीची आस लागलेल्या इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली आहे. राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी आटोपल्यानंतर आता सर्वच पक्षांचे लक्ष महापालिकेकडे वळले आहे. मात्र, प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या प्रचंड असल्याने पक्षनेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच प्रत्येक पक्षातील गटातटाचे राजकारण आणि अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कोणाला बसेल, याची धास्ती इच्छुकांमध्ये दिसून येत आहे.
शेवटच्या टण्यातच ‘एबी फॉर्म’ २०१७ च्या महापालिका निवडणुकीत २२ प्रभागांतील ८७ जागांसाठी तब्बल बाराशेपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात होते. यंदाही परिस्थिती वेगळी नसून पहिल्याच दिवशी हजाराहून अधिक अर्जाची उचल झाली आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी यावेळी एबी फॉर्मचे वाटप थेट शेवटच्या टण्यातच केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी दोन-तीन राजकीय पर्याय खुले ठेवत आपली पत्ते अजूनही बंदच ठेवले आहेत. समाजमाध्यमांचा जोरदार वापरः जास्तीत जास्त मतदारांपर्यंत तातडीने पोहोचण्यासाठी इच्छुकांनी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर सुरू केला आहे. प्रभागातील प्रश्न, नागरिकांच्या तक्रारी तसेच मागील काळात केलेल्या कामांची माहिती फोटो व किडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर झळकत आहे. प्रत्यक्ष कामातून आणि ऑनलाइन प्रचारातून मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची मानसिक तयारी काही इकुकांनी आधीच ठेवली आहे. मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नववर्षाच्या कैलेंडरचा प्रचार सुरू झाला आहे. त्यावर स्वतःचा कोटी, मागील टर्ममधील विकासकामांची माहिती आणि
छायाचित्रे छापण्यात आली आहेत, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीचा सस्पेन्स्, बंडखोरीची शक्यता आणि वाढती राजकीय धाकधूक यामुळे शहराचे राजकारण दिवसेंदिवस अधिक तापत चालल्याचे स्पष्ट चित्र आहे.
गेल्या चार वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने माजी नगरसेवकांसह नव्याने तयार झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. ‘आता संधी आपलीच’ या भावनेतून अनेकांनी दंड थोपटले असून, इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. पहिल्या काही दिवसांत अर्जाची संख्या मर्यादित राहण्याची शक्यता आहे. २९ आणि ३० डिसेंबरला अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






