कल्याण : कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे. तोपर्यंत वाघाचा कातडं पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. पुढे बोलताना संसदेत श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण हनुमान चालीसा पठण केली. खासदार शिंदे यांना हनुमान चालीसा येते मात्र मागच्या सरकारमध्ये हनुमान चालीसा बोलण्यास विरोध झाला, हनुमान चाळीसाला विरोध करणाऱ्यांना आता राम भक्त हनुमान भक्त जागा दाखवतील असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. पुढे बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या कार्या अहवालाचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तसेच यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी फिर एक बार श्रीकांत शिंदे खासदार असं संकल्प निश्चय केला आहे. याच मतदारसंघातून श्रीकांत शिंदे पुन्हा लोकसभेत जाणार असे सांगितले.
डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह, भाजपा आमदार कुमार आयलानी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, मनसे पदाधिकारी कार्यकर्ते, शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. स्लाईडच्या माध्यमातून उपस्थित कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विकास कामांची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामाबाबत त्यांचं कौतुक केलं. तसेच विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी तिलांजली द्या असा आवाहन केलं. श्रीकांत शिंदे यांना खासदार करण्यासाठी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करणार, श्रीकांत शिंदेच खासदार होणार विश्वास व्यक्त केला.
मनसे आमदार राजू पाटील यांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला
मोदीचे चांगलं काम करतायत चांगल्या हेतूने पाठिंबा दिलाय अस राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना जे कोत्या मनाचे आहेत त्यांनी आमच्या साहेबांना विचारलं नाही, त्यांना त्याच्यात कमीपणा वाटला राज साहेब मोठ्या मनाचे आहेत. जे कोत्या मनाचे आहेत त्यांना जमलं नाही असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. श्रीकांत शिंदे यांनी तो कार्य अहवाल दाखवला त्यांनी जी विकासकामे केली त्याबद्दल शंभर टक्के त्यांचे समर्थन आहे, त्यांनी चांगलंच काम केलं आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी दिला.
खासदार शिंदे आणि आमच्यात लूटपुट होती मात्र शिंदें साहेबांशी कधी लिंक तोडली नाही, तो आमच्या राजकारणाचा एक भाग होता, प्रत्येकाने तो करायला पाहिजे, याचा वरिष्ठांना देखील त्रास व्हायचा, तो झाला बात गयी वो बीत गयी आता खऱ्या मनाने आम्ही उपस्थित राहिलो आहोत. त्यामुळे काही शंका ठेवायची गरज नाही. कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे मनसे सोडून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही. कल्याण भिवंडीचे जे उमेदवार आहेत त्यांचे पक्ष सोडून गेले त्यांचे कामाचे करणार नव्हतो. श्रीकांत शिंदे यांना तशी हनुमान चालीसा पाठ आहे तशाच मतदारसंघातील समस्या देखील पाठ आहेत. श्रीकांत शिंदे यांचा शंभर टक्के काम करणार यंदा श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार असा विश्वास मनसे आमदार राजू पाटील यांनी बोलून दाखवला.