Pune Politics: भारत मंडपम'वरून महापालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; बिल्डरचं हित जपल्याचा काँग्रेसचा आरोप?
दिल्ली येथील प्रगती मैदान येथील भारत मंडपमच्या धर्तीवर पुण्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. लोहगाव येथील सर्व्हे क्रमांक २३६ आणि २३८ मधील सुमारे १९.७३ हेक्टर जागेवर ‘भारत मंडपम’ उभारण्याच्या प्रस्तावा मान्य केल्यानंतर आता राज्य शासनाकडून यापुढील कार्यवाही केली जाणार आहे. लोहगावातील वाहनतळ, रुग्णालय, उद्यान, रस्ते यांसह विविध नागरी सुविधांची आरक्षणे रद्द न करता सामाविष्ट गावांमधील इतर जमीनींचा विचार करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेससह राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या काही नगरसेवकांनी केला. हा प्रकल्प पुणे शहराच्या लैकीकात भर टाकणारा असल्यामुळे या प्रकल्पाला विरोध करु नये, असे आवाहन भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांनी केला. त्यानंतर त्यावर कॉंग्रेसने संताप व्यक्त केला.
Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या ‘स्वीकृत’वरुन स्थानिक राजकारण तापलं; विरोधकांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप
या प्रभागातील नगरसेविका नंदिनी भेंडे, नगरसेवक सुहास टिंगरे यांनी आरक्षण बदलण्यास, तसेच भारत मंडपम या प्रकल्पाही विरोध केला. नागरिकांच्या मूलभूत समस्याकडे दुर्लक्ष करून केवळ राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा देण्यास आमचा विरोध आहे. भारत मंडपमसाठी पर्यायी जागेचा विचार करावा अशी मागणी धेंडे यांनी केली. तर टिंगरे यांनी” लोहगाव, विमाननगर हा परिसर हा अतिसंवेदनशील भाग म्हणून मोडत आहे. भारत मंडपममुळे लोहगावचे पर्यावरण, रस्ते, वाहतूक, आरोग्य, क्रीडांगण अशा सर्व गोष्टीना बाधा येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नासाठी जागा द्यावी.”
आंबेगावमध्ये शिवसृष्टी उभारली आहे. त्याची परिस्थिती पहा. मग घाईगडबडीत हा प्रकल्प का आणला जात आहे. मुळात लोहगावची परिस्थिती बिकट आहे. नागरिकांच्या हक्कावर गदा आणून प्रकल्प लादल्यास त्याला काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. इतर जागा शोधा’
– चंदू कदम (काँग्रेस गटनेते)
भारत मंडपम या प्रकल्पासाठी सभागृहात कोणत्याही सदस्याने विरोध केला नव्हता. त्यानंतर घाटे यांनी त्यांच्या भाषणात उगाच विरोधाला विरोध न करता मोठे मन दाखवून या प्रकल्पाला विरोध करु नका, असे आवाहन केले, त्यावर शिंदे यांनी संताप व्यक्त करत घाटे यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. एवढाच येथील नागरिकांचा पुळका होता तर बिल्डरच्या जागेचे आरक्षण का वगळण्यात आले, असा संताप व्यक्त केला.
तसेच नव्याने ३२ गावे महापालिकेत सामाविष्ट झाली आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही गावात तुम्हाला सहज ३५ एकर जागा मिळेल. १६ नागरिकांनी हरकत घेतली आहे. यामध्ये सैन्य दलाने देखील विरोध केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आमच्या लोहगावच्या जागेला विरोध आहे, असे काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सांगितले.
66 प्रकल्प चांगला आहे, त्यामुळे कोणीही विरोध करु नये, या प्रकल्पात राजकीय मेळावे, संमेलन, प्रदर्शन भरणार आहेत. दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि मुंबई आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय कन्व्हेक्षन सेंटर उभी राहिली आहेत. पुण्यात देखील असे सेंटर उभे राहिल्यावर पुणे देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर येणार आहे. त्यामुळे भारत मंडपमला विरोध करु नये.
– गणेश बिडकर (सभागृह नेता महापालिका)
काही आमदार, खासदार ड्रीम प्रोजेक्ट मांडतात, केंद्र आणि राज्य सरकार हा प्रस्ताव आणत आहे. पुणे महापालिकेत लोहगाव ९ वर्षांपूर्वी आले आहे, या निर्णयामुळे लोहगावकर भरडला जाणार आहे. या भागात रुग्णालय, क्रीडांगण नसताना, त्याचे आरक्षण बदलून भारत मंडपम कशाकरीता ? हाडेवाडीमध्ये वनविभागाची ५०० एकर जागा असताना लोहगावमध्ये भारत मंडपम करण्याचा हट्ट सोडायला हवा,”
प्रशांत जगताप, नगरसेवक (काँग्रेस)
लोहगावात आधी मूलभूत सुविधा चा. शहरात वाहतूक कोंडी, पार्किंग हे मोटे प्रश्न आहेत, ते आधी सोडवणे गरजेचे आहे, मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून प्रकल्प लादले जात आहे. भाजी मंडई, क्रीडांगण, हॉस्पिटल उभे आधी करणे गरजेचे आहे. कोणीही या भारत मंडपमला विरोध करत नाही. प्रशासनानं व्यवस्थित अभ्यास करून पर्यायी जागा शोधून मग भारत मंडपम उभारण्यात यावे.
निलेश निकम, विरोधी पक्षनेता महापालिका –






