कल्याण : कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यातर्फे नमो चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, कल्याण पश्चिम भाजपा शहराध्यक्ष वरून पाटील, माजी महापौर मोरेश्वर भोईर, भाजपा पदाधिकारी संदीप माळी उपस्थित होते. नमो चषक दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
खरंतर देशांमध्ये मोदी साहेबांची सत्ता आल्यानंतर मोदी साहेबांनी देशातील युवकांना पुढे जाण्यासाठी नमो चषकची मागणी केली होती. खेळाडू पुढे गेले पाहिजे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आमदारांना लोकप्रतिनिधींना सर्वांना सांगितलं आपण खेळाचे सामने मोठे मोठे घ्या. त्या माध्यमातून युवक चांगल्या पद्धतीने पुढे गेले पाहिजे. नशा मुक्त झाले पाहिजे. कारण एखादा चांगला कलागुणांमध्ये युवक गेला. तो नशेच्या आहारी जात नाही आणि म्हणून मोदी साहेबांनी सुरू केलेल्या नमो चषक आम्ही पुढे नेत आहोत. मागील काही वेळेस मी देवेंद्रजींच्या नावाने सीएम चषक ठेवला होता. आता नमो चषकच्या माध्यमातून देशभरातील सर्व सामने होत आहेत. ज्याच्यातून युवक पुढे जातील.
कल्याण पूर्वमध्ये जे स्पोर्ट क्लबच्या आरक्षण होते. खरंतर गेले अनेक वर्षापासून मी पाठपुरावा करत आहे. पण महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनी कधी त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. त्याच्यामुळे ज्या आरक्षणाच्या जागा होत्या त्या महापालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. बरेच ठिकाणी आरक्षणचा जागेवर अनधिकृत बांधकाम झाले आहे. मी 2009 ला आमदार झालो, ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाच्या जागा होत्या. त्या त्या ठिकाणी मी अनाधिकृत बांधकामा होऊन दिली नाही. मी जरी अनधिकृत बांधकाम होऊन दिली नसली तरी त्या जागा ताब्यात येणे महत्त्वाचे आहे. त्या जागा ताब्यात आल्या नाही म्हणून स्पोर्ट्स क्लब उभे करता आले नाही. माझा पाठपुरावा सुरू आहे. येणाऱ्या काळात या सर्व गोष्टीची पूर्तता होईल जागा ताब्यात आल्यानंतर हॉस्पिटल आणि स्पोर्ट्स क्लबच्या कामाला सुरुवात होईल.
या भागातील लोकप्रिय असे आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये गेली अनेक वर्ष या मैदानावरती कबड्डीचे सामने भरवले जातात. महाराष्ट्रामध्ये आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजींनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो चषक हा सर्व ठिकाणी साजरा करावा. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून युवकांना त्यामध्ये वेग वेगळ्या पद्धतीची संधी देण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सर्वांना सुचित केले आहे. गणपत शेठ गायकवाड यांनी या भागामध्ये हा नमो चषक सुरू केला आहे. मी त्यांचा मनःपूर्वक धन्यवाद देतो खरं तर ते अनेक वर्ष देवेंद्रजींच्या नावाने कधी सीएम चषक करायचे. त्यानंतर डीसीएम चषक केला आणि आता नमो चषक करत आहेत. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अनेक वर्ष या भागांमध्ये युवकांना विशेष करून सर्व क्षेत्रांमध्ये खेळाडू म्हणून त्यांना प्राधान्य मिळाले पाहिजे त्यांना विविध संधी प्राप्त झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून स्पर्धा आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धांचे आयोजन करत असताना पूर्ण स्पर्धामध्ये कुठेही कमतरता राहणार नाही.
मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री दोन्ही येतील शहराच्या विकास होईल. मुख्यमंत्री जरी आले तर आपण बघत असतात की छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या नजरेसमोर येतात. कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी काही मागण्या करतात त्याच्यामुळे विकास चांगला होतो.