Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुलडाण्यात पकडले गेले २ बनावट मतदार, बऱ्याच ठिकाणी EVM खराब, कशी आहे मतदानाची स्थिती

बुलढाणा येथील खामगाव नगरपरिषदेसाठी मतदान सुरू होताच, प्रभाग क्रमांक १५ मधील गांधी प्राथमिक शाळेत दोन बनावट मतदार मतदान करताना पकडले गेले. जाणून घ्या सविस्तर बातम्या, ब्रेकिंग न्यूज

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 02, 2025 | 06:57 PM
रोजच्या बातम्या एका क्लिकवर

रोजच्या बातम्या एका क्लिकवर

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा नगर पालिका निवडणूकीसाठी आज 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. अशातच मतदानाला केवळ दीड तास उलटत नाही तर बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी ता. मोताळा येथील एका जणास उमेदवाराने मतदान केल्यानंतर पकडले आहे. त्याच्यासोबत आणखी एक जण आहे. कोथळी, इब्राहिमपूर येथून अन्य काही लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत. दरम्यान घाटा खालून जवळपास दोन गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले गेले आहेत. या गंभीर बाबीची दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी काँग्रेस, पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

The liveblog has ended.
  • 02 Dec 2025 06:56 PM (IST)

    02 Dec 2025 06:56 PM (IST)

    "महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह..."; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश


    मुंबई
    : देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची सुरक्षितता आणि सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. चैत्यभूमी येथे उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • 02 Dec 2025 06:43 PM (IST)

    02 Dec 2025 06:43 PM (IST)

    चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘Thamma’आता OTTवर, जाणून घ्या केव्हा आणि कुठे पाहू शकता हा चित्रपट!

    दिवाळीत चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या ‘थामा’ हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांनी चांगलाच पसंत पडला. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर येण्यास सज्ज झाला आहे. तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होईल ते जाणून घेऊया. मोठ्या पडद्यावर या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जर तुम्ही तो चित्रपटगृहात पाहायला चुकवला असेल, तर आता तुम्ही तो ओटीटीवर पाहू शकता. निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर केली आहे. आता तुम्ही तो घरी सहजपणे पाहू शकता.

  • 02 Dec 2025 06:33 PM (IST)

    02 Dec 2025 06:33 PM (IST)

    Dhananjay Munde Murder: आमदार धनंजय मुंडेंची होणार होती हत्या? आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

    Dhananjay Munde Murder : बीड : मागील अनेक दिवसांपासून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे चर्चेमध्ये आले आहेत. बीडमधून त्यांच्याविरोधात आवाज उठवण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देखील सोडावे लागले. यानंतर आमदार असलेल्या धनंजय मुंडे यांनी अनेक महिन्यांनंतर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्याचबरोबर मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता आमदार धनंजय मुंडेंच्या हत्येचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आहे.

  • 02 Dec 2025 06:22 PM (IST)

    02 Dec 2025 06:22 PM (IST)

    Dattaguru : गुरुचरित्र पारायणाचा मानवी आयुष्यावर काय परिणाम होतो? काय सांगतं अध्यात्म आणि विज्ञान ?

    दत्तसंप्रदाय असो की नवनाथ संप्रदाय या दोन्हीमध्ये साम्य हेच की गुरुला आदाराचं स्थान दिलं जातं. गुरु म्हणजे परमेश्वराचा अंश ही या संप्रदायाची शिकवण आहे. याच गुरुच्या प्रेरणेतून लिहिला गेलेला ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र. दत्तनवरात्र काळात गुरुचरित्राचे पारायण भाविक मोठ्या श्रद्धेने करतात. गुरुचरित्र हे श्रीगुरुदेव दत्तांच्या जीवनचरित्रावर आधारित पवित्र ग्रंथ आहे. खरंतर पारायणाची प्रथा एका रात्रीत किंवा एका क्षणी सुरु नाही झाली तर भक्तीपरंपरा, गुरु-शिष्य परंपरा आणि दत्तसंप्रदायातील शिष्यांमुळे पारायणाची हळूहळू विकसित झाली. असं असलं तरी ज्ञानदेव, महानुभाव पंथ, नाथपंथ आणि श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामींच्या काळापासून “गुरुचरित्र ऐकणं, वाचणं, त्याचं स्मरण करणं” ही एक साधना मानली जाऊ लागली आणि हळूहळू पुढील शिष्यांच्या पिढ्यांमध्ये गुरुचरित्राचं पारायण करण्याची प्रथा रुजत गेली.

  • 02 Dec 2025 06:12 PM (IST)

    02 Dec 2025 06:12 PM (IST)

    …अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू; ‘आप’च्या उमेदवाराला भर रस्त्यावर धमकी

    पुणे : फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आम आदमी पार्टीचे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे (वय ४२) यांना अज्ञात व्यक्तीने कार अडवून जीव घेण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘निवडणुकीतून माघार घ्या, नाहीतर तुमचा संतोष देशमुख करू’ अशा शब्दांत दिलेल्या धमकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

  • 02 Dec 2025 05:30 PM (IST)

    02 Dec 2025 05:30 PM (IST)

    NiviCap: आता ऑस्ट्रेलिया-भारत आर्थिक अंतर होणार कमी!

    ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेण्याची भारतीय विद्यार्थ्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र शिक्षणासाठी लागणारे कर्ज, कागदपत्रांची प्रक्रिया आणि आर्थिक नियमांच्या गुंतागुंतीमुळे अनेक कुटुंबे अजूनही चिंतेत असतात. या समस्येचा कायमचा तोडगा म्हणून आता NiviCap या डिजिटल प्लॅटफॉर्मने पुढाकार घेतला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पूर्णपणे ऑनलाइन, वेगवान आणि पारदर्शक पद्धतीने शिक्षणकर्ज उपलब्ध होणार आहे. ट्युशन फी, राहणीमान, व्हिसा, विमा आणि प्रवास खर्चांसाठी विद्यार्थ्यांना तब्बल ₹45 लाखांपर्यंत डिजिटल कर्ज मिळू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, व्याजदर विद्यार्थ्याच्या क्रेडिट प्रोफाइलनुसार स्पर्धात्मक ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे जास्त आर्थिक ताण न येता परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार करणे शक्य होते.

    वाचा सविस्तर 

  • 02 Dec 2025 05:10 PM (IST)

    02 Dec 2025 05:10 PM (IST)

    Ind Vs Sa : ‘एकदा स्थिरावल्यावर त्याला रोखणे…’

    Marco Janssen praises Virat Kohli : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने १७ धावांनी जिंकला आहे. तर दूसरा सामना ३ डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. दरम्यान, त्याच्या खेळीचे कौतुक दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को जान्सनकडून करण्यात आले आही.विराट कोहलीसारख्या जागतिक दर्जाच्या फलंदाजाला एकदा स्थिरावल्यानंतर धावा करण्यापासून रोखणे जवळजवळ अशक्य आहे आणि भारतीय स्टार खेळाडूची सुविधा देणाऱ्याची भूमिका बजावण्याची क्षमता त्याला गोलंदाजी करण्यासाठी सर्वात कठीण प्रतिस्पध्यापैकी एक बनवते हे दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को जान्सनने मान्य केले.

    वाचा सविस्तर

  • 02 Dec 2025 05:00 PM (IST)

    02 Dec 2025 05:00 PM (IST)

    गाडीचा स्पीड अन् मृत्यू…, प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघात

    Surat Road Accident News Marathi: सुरतमध्ये सोशल मीडियान आणखी एका तरुणाचा जीव घेतला. १८ वर्षीय बाईक ब्लॉगर प्रिन्स पटेलला हायस्पीड रीलचे शूट करत असताना त्याला जीव गमवावा लागला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, बाईक इतकी वेगवान होती की त्याचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर पडला, तेव्हाच त्याचे केटीएम डिव्हायडरला धडकले. हेल्मेट न घातल्यामुळे अपघात इतका गंभीर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला आणि शरीराचे दोन तुकडे झाले.

    वाचा सविस्तर 

  • 02 Dec 2025 04:50 PM (IST)

    02 Dec 2025 04:50 PM (IST)

    अखेर येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज!

    राज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने मालिकेमध्ये येसूबाईंची भूमिका साकारली होती. आता तिला खऱ्या आयुष्यात देखील तिचा शंभूराज मिळाला आहे. अभिनेत्रीने आता स्वतःच्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुश करून टाकले आहे, अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते तिच्या लग्नाचे फोटो पाहून तिचे अभिनंदन करत आहेत.

    वाचा सविस्तर 

  • 02 Dec 2025 04:40 PM (IST)

    02 Dec 2025 04:40 PM (IST)

    Pakistan Protest : पाकिस्तानमध्ये राजकीय वातावरण तापले

    Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या मोठा राजकीय गोंधळ सुरु आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत अदियाला तुरुंगाबाहेर मोठा मोर्चा काढला आहे. लोकशाही सरकार असताना सरकारने लष्कराच्या हातात सत्ता दिली असून पीटीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला आहे. शिवाय नुकतेच माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बाबत निधनाच्या, प्रकृती खराब झाल्याच्या अफवा उडत आहेत.

    वाचा सविस्तर 

  • 02 Dec 2025 04:30 PM (IST)

    02 Dec 2025 04:30 PM (IST)

    Syed Mushtaq Ali Trophy : दुखापतीनंतर हार्दिक पांड्याची डरकाळी!

    Hardik Pandya’s explosive batting after injury : क्रिकेटपासून जवळजवळ दोन महिने दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आता पुन्हा मैदानात परतला आहे. हार्दिक पंड्या मैदानात परतला आणि त्याने टी-२० फॉरमॅटमधील तो सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून का ओळखले जाते, ही पुन्हा एकदा आपल्या खेळीने सिद्ध केले आहे. पंजाबविरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सामन्यात, हार्दिक पंड्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे बडोद्याने एक संस्मरणीय विजय आपल्या नावावर केला आहे.  चौथ्या क्रमांकावर खेळताना, त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि संघाला कठीण लक्ष्य गाठून देण्यात मोठे योगदान दिले आहे.

    वाचा सविस्तर 

  • 02 Dec 2025 04:20 PM (IST)

    02 Dec 2025 04:20 PM (IST)

    December Born People: अत्यंत भाग्यवान डिसेंबरमध्ये जन्माला आलेली मुलं

    २०२५ चा शेवटचा महिना सुरू झाला आहे. आज आम्ही तुम्हाला डिसेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांची वैशिष्ट्ये सांगणार आहोत. डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक धनु किंवा मकर राशीचे असतात आणि ते मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. २२ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान जन्मलेले लोक धनु राशीचे असतात. डिसेंबरमध्ये जन्मलेले धनु राशीचे लोक आशावादी, स्वतंत्र आणि धाडसी मानले जातात. दरम्यान, २२ डिसेंबर ते १९ जानेवारी दरम्यान जन्मलेले मकर राशीचे लोक अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत. ते त्यांच्या व्यावहारिकता, जबाबदारी आणि दृढनिश्चयासाठी ओळखले जातात. ते जीवनाच्या सर्व क्षेत्रात यशासाठी सतत प्रयत्नशील असतात. डिसेंबरमध्ये जन्मलेल्यांचा स्वभाव कसा असतो ते जाणून घेऊया.

    वाचा सविस्तर 

  • 02 Dec 2025 04:20 PM (IST)

    02 Dec 2025 04:20 PM (IST)

    HR88B8888: बोली तर लावली पण खिसा झाला खाली!

    HR88B8888 तुम्हाला हा नंबर माहित असेलच. गेल्या काही दिवसांपासून, तो सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेल्सवर खूप लोकप्रिय आहे. त्याने इतके लक्ष वेधले आहे की बहुतेक लोकांना कदाचित त्याची आधीच जाणीव झाली असेल. त्याची लोकप्रियता त्याच्या किमतीवरून येते. काही दिवसांपूर्वी एका ऑनलाइन लिलावात हा हरियाणाचा नंबर ₹१.१७ कोटींना विकला गेला होता, जो देशातील सर्वात महागडा नंबर बनला होता. 

    वाचा सविस्तर 

  • 02 Dec 2025 04:11 PM (IST)

    02 Dec 2025 04:11 PM (IST)

    Bank of Maharashtra: सरकारचा मोठा निर्णय!

    Bank of Maharashtra: महाराष्ट्र सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रमधील आपला ६% हिस्सा OFS द्वारे विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही विक्री ५४ रु. प्रति शेअर या दराने २५% किमान सार्वजनिक शेअरहोल्डिंग निकष पूर्ण करण्यासाठी केली जात असल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी या विक्रीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. सरकारी मालकीच्या बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मधील सरकारचा विक्रीचा प्रस्ताव (OFS) बिगर-किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उघडण्यात आला आहे.

    वाचा सविस्तर 

  • 02 Dec 2025 03:50 PM (IST)

    02 Dec 2025 03:50 PM (IST)

    चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला

    रेल्वे स्टेशनवर चॉकलेटचं आमिष दाखवून तीन मुलांच्या अपहररेल्वे स्टेशनवर चॉकलेटचं आमिष दाखवून तीन मुलांच्या अपहरणाचा डाव प्रवाश्यांना उधळल्याचा प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय सुरजकुमार गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मध्ये रेल्वे वरील विठ्ठलवाडी स्टेशनवर 29 नोव्हेंबर रोजी घडली.णाचा डाव प्रवाश्यांना उधळल्याचा प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय सुरजकुमार गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मध्ये रेल्वे वरील विठ्ठलवाडी स्टेशनवर 29 नोव्हेंबर रोजी घडली.

  • 02 Dec 2025 03:45 PM (IST)

    02 Dec 2025 03:45 PM (IST)

    पुण्यात थंडीचा कडाका कायम राहणार; तापमानाचा पारा घसरला, वातावरणात…

     गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये थंडीने जोरदार ‘कमबॅक’ केला आहे. शहरातील किमान तापमानाचा पारा घसरल्याने सलग दुसऱ्या दिवशी 10 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवला गेला आहे. तर पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

  • 02 Dec 2025 03:40 PM (IST)

    02 Dec 2025 03:40 PM (IST)

    काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कांदिवली पूर्व जागेवर भाजपचा कब्जा, BMC निवडणुकीत काय होणार परिणाम? जाणून घ्या समीकरण?

    आगामी महापालिका निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून सार्वत्रिक निवडणुकीकरीता 20 हजार कंट्रोल युनिट आणि 25 हजार बॅलेट युनिट महानगरपालिकेला नुकतीच प्राप्त झाली. दरम्यान मुंबई उपनगरातील कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघात आठ विभाग आहेत. या विभागांमध्ये जोरदार लढत होण्याची अपेक्षा आहे. २३, २४, २७, २८, २९, ३६, ४४ आणि ४५ हे विभाग या भागात आहेत. यापैकी सात विभागांवर पूर्वी भाजपचे वर्चस्व होते. तर एक काँग्रेसकडे आहे. २०१७ मध्ये भाजपला शिवसेनेविरुद्ध (अविभाजित) कठीण लढाईचा सामना करावा लागला. आता, शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. मागील बीएमसी निवडणुकांवरून, कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघात भाजप-शिंदे सेनेचा मजबूत आधार आहे.

  • 02 Dec 2025 03:35 PM (IST)

    02 Dec 2025 03:35 PM (IST)

    शुभमंगल सावधान! लोणावळ्यात थाटामाटात पार पडला पूजा–सोहमचा ड्रीम वेडिंग सोहळा

    आदेश बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. पूजा आणि सोहमच्या लग्नासाठी लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. यांच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांच्या लग्नासाठी सर्वत्र फुलांची सजावट, पूजा सोहमच्या ग्रॅंड एन्ट्रीसाठी खास स्टेज सजवण्यात आला होता. अखेर त्यांच्या लग्नाचा लग्नाचा पहिला फोटो सर्वांसमोर आलेला आहे.

  • 02 Dec 2025 03:30 PM (IST)

    02 Dec 2025 03:30 PM (IST)

    वैभव सूर्यवंशीचा Syed Mushtaq Ali Trophy मध्ये धूमधडाका! शतक झळकावून केला ‘हा’ पराक्रम

    वैभव सूर्यवंशी आपल्या कामगिरीच्या जोरावर चांगलाच चर्चेत येत असतो. अशातच त्याने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांना भुरळ घातली आहे.दरम्यान बीसीसीआयने आयोजित केलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इतिहास रचला आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील पहिले शतक ठोकून मोठी कामगिरी केली आहे. महाराष्ट्राविरुद्ध, वैभवने ५८ चेंडूत शतक पूर्ण केले आहे. त्याने षटकार ठोकून आपले शतक पूर्ण केले आहे.

  • 02 Dec 2025 03:25 PM (IST)

    02 Dec 2025 03:25 PM (IST)

    एमपीएससी परीक्षा अन् मतमोजणी एकाच दिवशी; लाखो परीक्षार्थी संभ्रमात

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट ‘ब’ (अराजपत्रित) परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी नियोजित केली आहे. मात्र याच दिवशी राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी होणार असल्याची घोषणा झाल्याने, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

  • 02 Dec 2025 03:15 PM (IST)

    02 Dec 2025 03:15 PM (IST)

    ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे Mobile Apps असायलाच हवेत!

    दैनंदिन जीवनात ज्येष्ठ नागरिकांना मदत करु शकणारे ॲप्स आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले हे ॲप्स सर्व गरजा पूर्ण करतात जसे की खरेदी, प्रवास, शिक्षण, आरोग्य, फिटनेस आणि सुरक्षितता. अद्वितीय वैशिष्ट्यांसह, हे स्मार्टफोन ज्येष्ठ नागरिक ॲप्स विविध कामांमध्ये नक्कीच मदत करतील. अशा सर्वोत्तम ॲप्सबद्दल आज आपण जाणून घेऊया.

  • 02 Dec 2025 03:10 PM (IST)

    02 Dec 2025 03:10 PM (IST)

    ऐश्वर्या रायपेक्षाही युनिक आहे सामंथा रूथ प्रभूची लग्नाची अंगठी; किंमत जाणून व्हाल चकित

    अभिनेत्री सामंथा आणि चित्रपट निर्माते राज यांचे काल लग्न झाले. कोइम्बतूरमधील एका मंदिरात या जोडप्याने लग्न केले आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सुंदर फोटोंपैकी सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे सामंथाची मोठी आणि अनोखी लग्नाची अंगठी. तिच्या बोल्ड आणि आकर्षक निवडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या सामंथाने यावेळी पारंपारिक लग्नाच्या बँड किंवा क्लासिक सॉलिटेअरऐवजी एक अनोखी, लक्षवेधी डिझाइन निवडली. अभिनेत्रीच्या अंगठीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 02 Dec 2025 03:05 PM (IST)

    02 Dec 2025 03:05 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील महत्वाचा फलंदाज गाब्बा कसोटीतून बाहेर! वाचा सविस्तर

    इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली होती. आता दुसरा सामना लवकरच खेळवला जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना हा 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे, त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला. इंग्लंडविरुद्ध २०२५-२६ च्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे, जो गुरुवार (४ डिसेंबर) पासून ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू होत आहे.

  • 02 Dec 2025 02:50 PM (IST)

    02 Dec 2025 02:50 PM (IST)

    पाकिस्तानने गाठला निर्लज्जपणाचा कळस; मदत म्हणून श्रीलंकेला पाठवले शिळे अन् खराब अन्न

    सध्या श्रीलंकेत (Sri Lanka) दित्वाह चक्रीवादळामुळे (Cyclone) प्रचंड विनाश झाला आहे. परिस्थिती बिकट असून आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रीलंकेने मदतीची हाक मारली आहे. भारताने श्रीलंकेला २१ टन मदत साहित्य पाठवले आहे. तसेत NDRF आणि बचाव पथकही पाठवले आहे. याच वेळी पाकिस्तानने देखील श्रीलंकेला मदत पाठवली आहे. मात्र मदतीच्या नावाखाली पाकिस्तानने गैरजबाबदारपण केला आहे.

  • 02 Dec 2025 02:45 PM (IST)

    02 Dec 2025 02:45 PM (IST)

    मेसेजिंग अ‍ॅप घेऊन येतंय नवीन Reaction Sticker फीचर

    Meta च्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp साठी पुन्हा एकदा एक नवीन फीचर आणलं आहे. हे फीचर iOS यूजर्ससाठी सुरु करण्यात आलं आहे. या फीचरमुळे यूजर्सचा स्टेटसचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. या फीचरअंतर्गत यूजर्स त्यांच्या स्टेटसवरील फोटो आणि व्हिडीओवर ईमोजी रिअ‍ॅक्शन स्टिकर जोडू शकणार आहेत. या नवीन फीचरमुळे यूजर्स स्टेट्सवर केवळ एका टॅपमध्ये इंस्टाग्राम स्टोरीजप्रमाणे रिअ‍ॅक्ट करू शकणार आहेत.

  • 02 Dec 2025 02:40 PM (IST)

    02 Dec 2025 02:40 PM (IST)

    ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, संघातील महत्वाचा फलंदाज गाब्बा कसोटीतून बाहेर

    इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेमध्ये पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली होती. आता दुसरा सामना लवकरच खेळवला जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना हा 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे, त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला. इंग्लंडविरुद्ध २०२५-२६ च्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे, जो गुरुवार (४ डिसेंबर) पासून ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू होत आहे.

  • 02 Dec 2025 02:35 PM (IST)

    02 Dec 2025 02:35 PM (IST)

    विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात

    झारखंड: navarashtra.com/topic/jharkhand येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी अपहरण केलं, नंतर जंगलात नेले आणि तिथे निर्दयीपणे हत्या करण्यात आली. मृतकाचे नाव संजू भारती (35) असे आहे. ही घटना झारखंडच्या चितरा गावात २२ नोव्हेंबर रोजी घडली.

  • 02 Dec 2025 02:28 PM (IST)

    02 Dec 2025 02:28 PM (IST)

    All New Kia Seltos चा बोल्ड लुक आणि ढाँसू फिचर्स, 10 डिसेंबरला येणार ग्राहकांसमोर

    किआ इंडियाने त्यांच्या नवीन सेल्टोसची पहिली झलक दाखवली आहे आणि ती खूपच आकर्षक दिसते. १० डिसेंबर रोजी अनावरण झाल्यावर पूर्णपणे नवीन सेल्टोस मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये खळबळ उडवून देईल हे स्पष्ट आहे. कंपनीने नवीन सेल्टोस फेसलिफ्टचा टीझर रिलीज केला आहे आणि विविध फोटो आणि व्हिडिओंवरून असे दिसून येते की नवीन सेल्टोस पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि प्रीमियम दिसेल. नवीन सेल्टोसचा वर्ल्ड प्रीमियर १० डिसेंबर २०२५ रोजी होईल, म्हणून त्यापूर्वी कंपनीने काय उघड केले आहे ते जवळून पाहूया.

  • 02 Dec 2025 02:19 PM (IST)

    02 Dec 2025 02:19 PM (IST)

    ऐश्वर्या रायपेक्षाही युनिक आहे सामंथा रूथ प्रभूची लग्नाची आंगठी; किंमत जाणून व्हाल चकित

    अभिनेत्री सामंथा आणि चित्रपट निर्माते राज यांचे काल लग्न झाले. कोइम्बतूरमधील एका मंदिरात या जोडप्याने लग्न केले आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सुंदर फोटोंपैकी सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे सामंथाची मोठी आणि अनोखी लग्नाची अंगठी. तिच्या बोल्ड आणि आकर्षक निवडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या सामंथाने यावेळी पारंपारिक लग्नाच्या बँड किंवा क्लासिक सॉलिटेअरऐवजी एक अनोखी, लक्षवेधी डिझाइन निवडली. अभिनेत्रीच्या अंगठीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 02 Dec 2025 02:10 PM (IST)

    02 Dec 2025 02:10 PM (IST)

    ग्लेन मॅक्सवेल IPL 2026 मध्ये दिसणार नाही, केला अलविदा! चाहत्यांचे मानले आभार

    आयपीएल 2026 साठी सर्वच उत्सुक आहेत, अनेक फ्रॅन्चायझींनी त्याची रिटेन लिस्ट जाहीर केली होती. 16 डिसेंबर रोजी आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव आयोजित केला जाणार आहे त्यासाठी क्रिकेट चाहते फारच उत्सुक आहेत. संघामध्ये अनेक नवे खेळाडू या नव्या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे. कोलकता नाईट राइडर्सचा स्टार खेळाडू आंद्रे रसेल याला संघाने सोडल्यानंतर सर्वानाच धक्का बसला होता त्यानंतर त्याने निवृतीची घोषणा देखील केली आहे. आता तो केकेआरचा कोच म्हणून संघाची जबाबदारी सांभाळणार आहे.

  • 02 Dec 2025 01:58 PM (IST)

    02 Dec 2025 01:58 PM (IST)

    तेजस्विनीची लगीनघाई! हातावर रंगली समाधान सरवणकरांच्या नावाची मेहंदी

    गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र लग्नसराईला सुरूवात झाली आहे. सध्या मनोरंजनसृष्टीकत देखील लगीनघाई पाहायला मिळत आहे. एक पाठोपाठ एक कलाकार लग्नबंधणात अडकताना दिसत आहेत. अशात आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या घरीही लगीनघाई पाहायला मिळत आहे. तेजस्विनीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे. नुकताच तिचा मेहंदीचा सोहळा पार पडला आहे.

  • 02 Dec 2025 01:50 PM (IST)

    02 Dec 2025 01:50 PM (IST)

    काँग्रेस, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार; पुण्यातील अनेक माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर

    आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने आपला पक्ष बळकट करण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात जोडून घेण्याची मोहीम सुरू केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना आगामी दिवसांत भाजप मोठा राजकीय धक्का देणार असल्याची चर्चा आहे. या पक्षांतील वीसहून अधिक माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यातील निम्म्या नगरसेवकांना वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच हा प्रवेश होणार आहे.

  • 02 Dec 2025 01:45 PM (IST)

    02 Dec 2025 01:45 PM (IST)

    एसबीआय अहवाल! आयपीओमधील पैसे संपल्यामुळे बँक कर्जाची मागणी वाढणार

    भारतातील बँकिंग क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका नवीन अहवाल सादर केले आहे. एसबीआयने त्या अहवालात असे म्हटले आहे की, काही काळापासून मंदावलेले बँक कर्ज वाटप आता पुन्हा वाढणार आहे. कंपन्यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजासाठी निधीची आवश्यकता असल्याने कर्जाची मागणी देखील वाढण्याची शक्यता असल्याचे, त्यांनी अहवालात म्हटले आहे.

  • 02 Dec 2025 01:35 PM (IST)

    02 Dec 2025 01:35 PM (IST)

    बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर

    नवी दिल्ली : बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान खालिदा झिया (Khaleda Zia) यांच्या प्रकृती सध्या चिंताजनक आहे. खालिदा झिया यांच्या बांग्लादेश नॅशनला पार्टीने BNP ने दिलेल्या माहितीनुसार, खालिदा झिया यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून किडनी, डायबेटिज, संधिताव, आणि डोळ्यांच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. आलमगीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

  • 02 Dec 2025 01:20 PM (IST)

    02 Dec 2025 01:20 PM (IST)

    तिरूपती बालाजी मंदिराचे 5 मोठे रहस्य, देवाला का नेसवतात साडी-धोतर?

    देशभरातील मंदिरांमध्ये अनेक रहस्ये आहेत, परंतु तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिर अद्वितीय आहे. हे मंदिर केवळ भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र नाही तर त्यात अनेक रहस्ये देखील आहेत. आज आम्ही तुम्हाला तिरुपती बालाजी मंदिराच्या अनावृत्त रहस्यांबद्दल सांगणार आहोत.

  • 02 Dec 2025 01:10 PM (IST)

    02 Dec 2025 01:10 PM (IST)

    लिवप्योरने 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज लॉन्च केली

    भारतातील सर्वात विश्वासार्ह व वेलनेस-केंद्रित कंझ्युमर ब्रँड लिवप्योरने प्रत्येक घरात स्वच्छ पाणी पोहोचवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी केली आहे. कंपनीने दोन मोठी उपक्रम राबवले आहेत. पहिला म्हणजे, लिवप्योरने आपली मेंटेनन्स-फ्री वॉटर प्युरिफायर रेंज लॉन्च केली आहे, जी 2.5 वर्षे मोफत सर्व्हिससह कोणत्याही अडचणीशिवाय कार्य करते. दुसरा म्हणजे, लिवप्योरने नवी 2X पॉवर फिल्टर प्युरिफायर रेंज सादर केली आहे. हे नवे इनोव्हेशन फिल्टरचे आयुष्य दुप्पट करते, मालकी खर्च कमी करते आणि भारतीय घरांमध्ये सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि त्रास-मुक्त पाणी सुनिश्चित करते.

  • 02 Dec 2025 01:00 PM (IST)

    02 Dec 2025 01:00 PM (IST)

    नांदेड हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा

    प्रेयसी आंचलच्या वडील व भावांनीच खून केल्याचा आरोप. आंचलने खुलासा केला की वाढदिवसानंतर ते पळून जाऊन लग्न करणार होते आणि सक्षम तिच्यासाठी धर्मही स्वीकारणार होता.

  • 02 Dec 2025 12:50 PM (IST)

    02 Dec 2025 12:50 PM (IST)

    पतीने ‘तिहेरी तलाक’चा मजकूर कुरिअरने पाठवला

    नाशिकमध्ये तरुणीने पती ट्रिपल तलाक’ पाठवल्याची तक्रार दाखल केली. साडेतीन वर्षे पैशांसाठी छळ, मारहाण व सोन्याचे दागिने बळजबरीने घेतल्याचा आरोप. पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • 02 Dec 2025 12:40 PM (IST)

    02 Dec 2025 12:40 PM (IST)

    अनैतिक संबंधाच्या संशयातून चुलत भावाची सुपारी देऊन हत्या

    पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून चुलत भावाचा निर्घृण खून. आरोपी अशोक पंडितने तीन साथीदारांना चार लाखांची सुपारी दिली. पोलिसांनी चार जणांना झारखंडला पळण्यापूर्वीच अटक केली.

  • 02 Dec 2025 12:38 PM (IST)

    02 Dec 2025 12:38 PM (IST)

    अकोल्यात प्रेम प्रकरणातून तरूणाची हत्या

    अकोल्यातल्या शेगावमध्ये प्रेम प्रकरणातून भयंकर हत्याकांड घडले. एका तरुणाची भररस्त्यात चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. गौरव बायस्कार असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. चार जणांनी रस्त्यात गौरवला गाठून जागीच संपवले. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली आहे.

  • 02 Dec 2025 12:33 PM (IST)

    02 Dec 2025 12:33 PM (IST)

    व्यापाऱ्याला 2.8 कोटींचा गंडा

    झवेरी बाजारातील एका भामट्याने मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून एका सराफा व्यापाऱ्याची २.८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  • 02 Dec 2025 12:25 PM (IST)

    02 Dec 2025 12:25 PM (IST)

    विभक्त पत्नीची हत्या करून पतीने मृतदेहासोबत सेल्फी काढला

    तामिळनाडूमध्ये विभक्त पत्नीची विळ्याने हत्या करून पतीने मृतदेहासोबत सेल्फी काढून व्हॉट्सऍप स्टेटसवर टाकला. ‘विश्वासघात’ असा दावा करत केलेल्या या कृत्यामुळे संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • 02 Dec 2025 12:20 PM (IST)

    02 Dec 2025 12:20 PM (IST)

    बांगरांची इतकी हिंमत की ते मतदान कक्षातूनच नारे देतात? दमानिया

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैसे आणल्याचा गंभीर आरोप केला. अंजली दमानिया यांनी लिहिले आहे की, ही निवडणूक आहे की पैशाची खैरात? अफाट पैसा वाटला जातोय. आज जे चालू आहे त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का? सगळे कायदे धाब्यावर. शिंदे गटाच्या बांगरांची इतकी हिंमत की ते मतदान कक्षातूनच नारे देतात ? शिंदेंनीं मालवण ला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते ? भाजप तर असंख्य ठिकाणी पैसे वाटत आहेत असे रिपोर्ट येत आहेत, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

    ही निवडणूक आहे की पैशाची खैरात? अफाट पैसा वाटला जातोय.

    आज जे चालू आहे त्याला लोकशाहीतील निवडणूक म्हणता येईल का?

    सगळे कायदे धाब्यावर. शिंदे गटाच्या बांगरांची इतकी हिंमत की ते मतदान कक्षातूनच नारे देतात ?

    शिंदेंनीं मालवण ला दोन बॅग मधून काय आणले? पैसे होते ? भाजप तर असंख्य…

    — Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2025

  • 02 Dec 2025 12:15 PM (IST)

    02 Dec 2025 12:15 PM (IST)

    कुवेत-हैदराबाद इंडिगो विमानात मानवी बॉम्बची धमकी

    कुवेतहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला विमानात “मानवी बॉम्ब” असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानाची मुंबई विमानतळावर आत्पकालीन लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने धोका लक्षात घेता  पाललटने मुंबई विमानतळावर विमानाचे आत्पातकालीन लॅंडिग केले.

  • 02 Dec 2025 12:10 PM (IST)

    02 Dec 2025 12:10 PM (IST)

    माझीही इच्छा होती फॉर्म भरायची - उदयनराजे भोसले

    मतमोजणीबाबत निवडणूक आयोगच निर्णय घेणार, मी नाराज नाही. नाराज असून कसं चालणार? एकाच बाबतीत नाराजी होती, माझीही इच्छा होती फॉर्म भरायची. पण राहून गेलं अशी मिश्किल टीका भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

  • 02 Dec 2025 12:07 PM (IST)

    02 Dec 2025 12:07 PM (IST)

    रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाचे 30 ठिकाणी छापे

    मुंबईतील रामी हॉटेल ग्रुपवर आयकर विभागाची मोठी कारवाई; दादरसह 30+ ठिकाणी छापेमारी. करचोरीच्या संशयावरून तपास सुरू. संस्थापक राज शेट्टींच्या ठिकाणीही सर्च. पूर्वीही हॉटेलवर अनेकवेळा छापे पडले आहेत.

  • 02 Dec 2025 12:00 PM (IST)

    02 Dec 2025 12:00 PM (IST)

    ट्रम्पची इस्रायलला चेतावणी ; सीरियावर हल्ल्यापासून दूर राहण्याचा इशारा

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. सीरिया आणि इस्रायलमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी इस्रायलला इशारा दिला आहे. गेल्या काही काळात इस्रायल सतत सीरियावर हल्ले करत असून ट्रम्प यांनी इस्रायलला सीरियावरील हल्ले थांबवण्याचा आणि दूर राहण्याचा इशारा दिला आहे.

  • 02 Dec 2025 11:55 AM (IST)

    02 Dec 2025 11:55 AM (IST)

    ‘इंद्रायणी’ मालिकेत नवा ट्विस्ट

    कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेतील ७ डिसेंबरचा भाग प्रेक्षकांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे. कथानकात पहिल्यांदाच घडणाऱ्या एका अनपेक्षित अध्यात्मिक वळणामुळे संपूर्ण मालिकेमधील घटना बदलणार आहेत. इंद्रायणी आणि श्रीकला यांच्या संघर्षाला या प्रसंगामुळे नवी धार मिळणार असून घराघरात उत्सुकता निर्माण करणारा नाट्यमय क्षण उलगडणार आहे. श्रीकलेचा नवा डाव दिग्रसकरांच्या विरोधात जाणार की इंद्रायणीचा मार्ग अधिक सोपा करणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आजचा भाग पाहावा लागणार आहे.

  • 02 Dec 2025 11:50 AM (IST)

    02 Dec 2025 11:50 AM (IST)

    सॅमसंगने या देशात सादर केला पहिला ट्राय-फोल्ड फोन

    बऱ्याच काळापासून प्रतिक्षेत असलेला सॅमसंगचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन अखेर आता अधिकृतपणे सादर करण्यात आला आहे. कंपनीने Samsung First TriFold Phone दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका ईव्हेंटमध्ये सादर केला आहे. हा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन 12 डिसेंबर रोजी अधिकृतपणे सर्वात आधी दक्षिण कोरियामध्ये लाँच केला जाणार आहे. यानंतर हा स्मार्टफोन अमेरिका, चीन, तैवान, सिंगापुर आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) मध्ये लाँच केला जाईल. या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. वाचा सविस्तर

  • 02 Dec 2025 11:45 AM (IST)

    02 Dec 2025 11:45 AM (IST)

    कुवेत-हैदराबाद इंडिगो विमानात मानवी बॉम्बची धमकी

    कुवेतहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात “मानवी बॉम्ब” असल्याची धमकी मिळाली आहे. यामुळे फ्लाइटते मुंबई विमानतळावर आत्पकालीन लॅंडिंग करण्यात आले आहे.  दिल्ली विमानतळावर ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने धोका लक्षात घेता  पाललटने मुंबई विमानतळावर विमानाचे आत्पातकालीन लॅंडिग केले. वाचा सविस्तर

Web Title: Breaking live update news 2nd december crime political entertainment world news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Breaking News
  • maharashtra news
  • Marathi Batmya

संबंधित बातम्या

Kolhapur News : शाहूवाडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; गव्यांनी रोखला शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता
1

Kolhapur News : शाहूवाडीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; गव्यांनी रोखला शालेय विद्यार्थ्यांचा रस्ता

Ahilyanagar News: पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही! जलसंपदा विभागातील आढावा बैठकीत आमदार खताळांचा विश्वास
2

Ahilyanagar News: पाण्यापासून कोणी वंचित राहणार नाही! जलसंपदा विभागातील आढावा बैठकीत आमदार खताळांचा विश्वास

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती
3

PCMC Election : पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर गोंधळ, आरओच्या गाडीसमोर बसले उमेदवारांचे पती

NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह
4

NAGPUR : निवडणुकातील पारदर्शकतेवर नाना पटोलेंचे प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.