
Maharashtra breaking News Marathi
13 Jan 2026 11:25 AM (IST)
29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सर्वच दिग्गज नेते मैदानामध्ये उतरले आहेत. आपापले बालेकिल्ला राखण्यासाठी राजकीय नेत्यांनी शक्ती पणाला लावली आहे. त्यामुळे आज दिवसभरात प्रचाराचा धुराळा उडणार आहे.
13 Jan 2026 11:15 AM (IST)
अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक राकेश शर्मा यांचा आज जन्मदिन. त्यांनी १९८४ मध्ये सोव्हिएत संघाच्या मोहिमेद्वारे अंतराळ प्रवास केला आणि अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक ठरले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राकेश शर्मा यांचा अंतराळातून केलेला संवाद हा अत्यंत लोकप्रिय आहे.
13 Jan 2026 11:05 AM (IST)
यंदाच्या वर्षी थंडीचा जोरदार धडाका जाणवत आहे. प्रत्येक राज्याचा पारा हा एक अंकी झाला आहे. राजधानी दिल्ली (तर अक्षरशः गारठली आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात तीव्र थंडी आहे. IMDने १३ जानेवारी रोजी पंजाब, जम्मू आणि उत्तर हरियाणा, वायव्य उत्तर प्रदेश आणि दक्षिण उत्तराखंडमध्ये दाट ते खूप दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे.
13 Jan 2026 10:59 AM (IST)
सध्या इराणमध्ये (Iran) हिंसक आंदोलनामुळे प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे. इराणची जनता खामेनेई सरकारविरोधात आणि राजेशाहीच्या समर्थनार्थ रस्त्यांवर उतरली आहे. देशातील आर्थिक संकट, वाढती महागाई विरोधात हे आंदोलन सुरु झाले होते. पण यावर तोडगा काढण्याऐवजी खामेनेई सरकारने सुरक्षा दलांना आंदोलकांवर कडक कारवाईचे आदेश दिले. ज्यामुळे सुरक्षा दलांनी आंदोलकांना चिरडण्यासाठी बळाचा वापर केला आणि आंदोलन तीव्र भडकले.
13 Jan 2026 10:53 AM (IST)
गेल्या दोन दशकांत भारतीय बँकिंग क्षेत्रात कर्ज वितरण पद्धतींमध्ये मोठा संरचनात्मक बदल झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) च्या ताज्या अहवालानुसार, देशातील असुरक्षित कर्जे ४६.९ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्च्चांकावर पोहोचली आहेत. तारण किंवा तारण न देता दिलेल्या या कर्जामध्ये झालेल्या या घाऊक वाढीमुळे बँकिंग व्यवस्थेतील जोखमीबद्दल एक नवीन वाद निर्माण झाला आहे. एसबीआय रिसर्चच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २००५ मध्ये असुरक्षित कर्जाचा एकूण आकार फक्त २ लाख कोटी होता, जो आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत वाढून ४६.९ लाख कोटी होईल असा अंदाज आहे. एकूण बँक कर्जात असुरक्षित कर्जाचा वाटाही लक्षणीयरीत्या वाढला आहे.
13 Jan 2026 10:46 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून एलन मस्कचा एआय प्लॅटफॉर्म ग्रोक बराच चर्चेत आहे. ग्रोक प्लॅटफॉर्मबाबत एक नवीन वाद सुरु झाला आहे. ग्रोक यूजर्सना अश्लील कंटेट तयार करण्यासाठी मदत करतो, असा आरोप करण्यात आला. ग्रोकवर सुरु झालेल्या बिकनी ट्रेंडनंतर बराच वाद निर्माण झाला होता. यानंतर एलन मस्कला नोटीस पाठवण्यात आली व ग्रोकवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता.
13 Jan 2026 10:39 AM (IST)
२०२६ च्या टी२० विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेमध्ये खेळवले जााणार आहेत. 2024 मध्ये भारताच्या संघाने टी20 विश्वचषकाची ट्राॅफी नावावर केली होती. त्यामुळे भारताचा संघ त्यांचे टायटल डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल. सुर्यकुमार यादव भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे. भारती आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी नेदरलँड्सने संघाची घोषणा केली आहे.
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, नोआ क्रुस, बास डी लीडे, आर्यन दत्त, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, मायकेल लेविट, जॅक लिऑन-कॅशेट, मॅक्स ओ’डॉड, लोगन व्हॅन बीक, टिम वॅन डर गुगटेन, रोएलॉफ व्हॅन डर मेरवे, साउकेर, जॅक मेरवे, जॅक.
13 Jan 2026 10:31 AM (IST)
देशाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. देशात अनेक वर्षांपासून एक फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर केला जात आहे. मात्र, यावेळी 1 फेब्रुवारीला रविवार असल्याने अर्थसंकल्पाच्या तारखेबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आता हा संभ्रम दूर केला आहे.
13 Jan 2026 10:23 AM (IST)
सध्या जागतिक राजकाराणात मोठी खळबळ उडाली आहे. कारण दक्षिण अमेरिकेतली देश व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्या संघर्ष शिगेला पोहोचला आहे.अमेरिकेने Operation Midnight Hammer अंतर्गत व्हेनेझुएलावर हल्ला केला आणि या देशाच्या राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना कैद केले.यामुळे दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या लॅटिन अमेरिका आणि त्याचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. दक्षिण अमेरिकेतील आणि मध्य अमेरिकेतील काही देशांना लॅटिन का म्हणतात, याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. तर यामागचे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. याचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.
13 Jan 2026 10:16 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये प्लेअर्सना कोणतेही इन-गेम आयटम्स खरेदी करायचे असोत किंवा एखाद्या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन स्पिन करायचे असो या सर्वांसाठी इन-गेम करंसी डायमंडची गरज असते. डायमंड्सच्या मदतीने प्लेअर्स इन-गेम आयटम्स खरेदी करू शकतात. याव्यतिरिक्त, मोफत इव्हेंट रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी तुम्हाला डायमंड्स खर्च करावे लागतील. गेममध्ये गरजेचे असलेले डायमंड्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही गेममध्ये सुरु असलेल्या खास टॉप-अप इवेंटमध्ये सहभागी होऊ शकता. या ईव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेअर्सना डायमंड्सच्या खरेदीसोबतच फ्री रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत.
13 Jan 2026 10:09 AM (IST)
जागतिक पातळीवरील मिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज अस्थिर राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या देशांवर नवीन कर लागू करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आज व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी सावध राहावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
13 Jan 2026 09:55 AM (IST)
Vijay Hazare Trophy 2025-26 : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या बाद फेरीच्या सामन्यांना कालपासून सुरुवात झाली. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबई आणि कर्नाटक यांच्यात सामना झाला. व्हीजेडी पद्धतीने बलाढ्य वाटणाऱ्या मुंबई संघाने ५५ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात सामना झाला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात सौराष्ट्राने १७ धावांनी विजय मिळवला. यासह, सौराष्ट्र आणि कर्नाटकने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
13 Jan 2026 09:50 AM (IST)
राणी मुखर्जीच्या सुपरहिट फ्रँचायझी “मर्दानी ३” चा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि त्याने आधीच इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. राणी मुखर्जी निर्भय पोलिस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतली आहे, जी पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक मोहिमेवर पाहायला मिळणार आहे. शिवाय, यावेळी, पुरुष खलनायकाऐवजी, चित्रपटात एक महिला खलनायिका दाखवण्यात आली आहे.
13 Jan 2026 09:45 AM (IST)
माजी महापौर आणि उद्धवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांनी एफआयआरची माहिती लपवून नामनिर्देशन अर्ज सादर केल्याचा आरोप करत शिंदेसेनेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार देत निवडणुकीनंतरच सुनावणी होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
13 Jan 2026 09:40 AM (IST)
कल्याण-डोंबिवलीतील शैलेश आणि मनीषा धात्रक यांना १५ कोटी, ठाण्यातील राजेश्री नाईक यांना पाच कोटी, तर सुशील आवटे यांना एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी रोखठोक टीका केली. मात्र संबंधित उमेदवारांनी या ऑफर्स नाकारून स्वाभिमानाने निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काही मतदार पाच-पाच हजार रुपयांना मत विकत असल्याचा आरोप करत, असे मत विकणारे आई-वडील आपल्या मुलांना काय उत्तर देतील, असा भावनिक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ठाणे हे मराठी अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा इतिहास असलेले शहर असून, ठाण्यासह आजूबाजूच्या शहरांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचे कारस्थान सुरू असताना नागरिकांनी स्वस्थ बसू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
13 Jan 2026 09:30 AM (IST)
अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका जाहीर केली आहे. इराणसोबत व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा देत अशा देशांवर २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, इराणशी व्यापार करणाऱ्या देशांना अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारांवर २५ टक्के कर भरावा लागेल. हा नियम तात्काळ लागू होईल आणि त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
13 Jan 2026 09:25 AM (IST)
धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे सुव्यवस्था व पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी धुळे दौऱ्यावर असतानाच जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली. सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिरपूर शहरात थाळनेर पोलीस ठाण्यातील एका हवालदारासह तीन पोलीस कॉन्स्टेबलना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
13 Jan 2026 09:20 AM (IST)
अहिल्यानगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार व जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने अचानक छापा टाकल्याने खळबळ उडाली. या कारवाईमुळे अनिल शिंदे यांना धक्का बसून त्यांची प्रकृती बिघडल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील आनंद ऋषीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
13 Jan 2026 09:15 AM (IST)
देशात २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर फक्त अदानी समूहालाच प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला सोमवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. मी अदानींचा वकील नाही, मात्र २०१४ नंतर केवळ गौतम अदानीच नव्हे तर अनेक उद्योगसमूहांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून त्यांच्या उत्पन्नात कैकपटीने वाढ झाल्याचा प्रतिवाद फडणवीस यांनी केला.
13 Jan 2026 09:10 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 13 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,216 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,031 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,662 रुपये आहे. भारतात 13 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,160 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,06,620 रुपये आहे. भारतात 13 जानेवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 270.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,70,100 रुपये आहे.
13 Jan 2026 09:05 AM (IST)
India Share Market Update: जागतिक पातळीवरील मिश्र संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज अस्थिर राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यवसाय करणाऱ्या देशांवर नवीन कर लागू करण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेचा परिणाम आता भारतीय शेअर बाजारावर होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आज व्यवहार करताना गुंतवणूकदारांनी सावध राहावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Vijay Hazare Trophy 2025-26 : विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या बाद फेरीच्या सामन्यांना कालपासून सुरुवात झाली. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबई आणि कर्नाटक यांच्यात सामना झाला. व्हीजेडी पद्धतीने बलाढ्य वाटणाऱ्या मुंबई संघाने ५५ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात सामना झाला. पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात सौराष्ट्राने १७ धावांनी विजय मिळवला. यासह, सौराष्ट्र आणि कर्नाटकने उपांत्य फेरीत प्रवेश केला.