पुणे : कँन्टोमेंट बोर्डाच्या निवडणुकीचा (Cantonment Board Election) बिगूल वाजले असताना आता याच निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील 57 बोर्डांच्या निवडणुका संरक्षण मंत्रालयाने आज रद्द केल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या (Defecne Ministry) राजपत्रानुसार, आजपासून 17 मार्चपासून निवडणूकविषयीचे सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यात पुणे, खडकी आणि देहूरोड या तीन ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे. संरक्षण मंत्रालयाकडून नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवडून आलेले सदस्य काम करत असतात. देशभरातील सर्व कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, आता या निवडणुका रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयात विशेष राजपत्रविषयीची सूचना लावण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा 2006 च्या अधिनियम 41 च्या आधारे ही 30 एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. त्याबाबत 18 फेब्रुवारीला राजपत्राद्वारे सूचना देण्यात आली होती. पण आता या निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील आदेश येईपर्यंत निवडणुका स्थगित
देशात एकूण 62 कॅन्टोन्मेंट आहेत. त्यातील 57 कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आदेश जरी करून पुढील आदेश येईपर्यंत या निवडणुका स्थगिती दिली आहे.