दिवाळीसाठी मध्य रेल्वेची विषेश रेल्वे व्यवस्था (फोटो- istockphoto)
दिवाळीसाठी मध्य रेल्वेची विशेष व्यवस्था
१६०० पेक्षा जास्त विषेश गाड्या चालवल्या जाणार
22 तारखेपासून झाली गाड्यांची सुरूवात
Central Railway: सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजरपेठा सजल्या आहेत. नवीन कपडे, आकाशकंदील घेण्यासाठी, पणत्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठ फुलली आहे. नागरिकांची गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे. दरम्यान बाहेरगावी राहणारे सुट्टी घेऊन घरी जाण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने खास व्यवस्था देखील केली आहे.
दिवाळीत आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या माध्यमातून सुखरूप आणि आरामदायी प्रवास करता यावा म्हणउण काही विशेष व्यवस्था उपलब्ध करून दिल्या आहेत. लांब जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने 1600 पेक्षा जास्त रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. याची सुरूवात 22 तारखेपासून झाली आहे.
Diwali 2025: लक्ष्मीपूजन कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नाशिक, नागपूर आणि पुणे अशा स्वरूपाची जी मोठी रेल्वे स्थानके आहेत, तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून होल्डिंग एरिया तयार करण्यात येणार आहे. आपल्या हवी जाण्यासाठी येणाऱ्या रेल्वेची वाट पाहण्यासाठी ही सोय करण्यात येणार आहे.
होल्डिंग एरियामध्ये मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी जनता आहार देखील उपलब्ध करून दिला आहे. याशिवाय राज्यातल्या राज्यात देखील वेगवेगळ्या स्थानकांमध्ये गाड्या चालवल्या जात आहेत. अधिक गरज भासल्यास प्रवाशांसाठी अतिरिक्त अधिक गाड्या चालवण्याची तयारी देखील मध्य रेल्वेने केली आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये असा आमचा प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.
पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी
रेल्वे ३६८ रिक्त सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती करत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या, १४ ऑक्टोबर २०२५ आहे. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणारे पदवीधर आरआरबी पोर्टल, rrbapply.gov.in ला भेट देऊन विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. फॉर्म भरणारे उमेदवार १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज शुल्क भरू शकतील.
Railway Vacancy 2025: पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी, आरआरबी सेक्शन कंट्रोलर भरतीसाठी करा अर्ज
उमेदवारांनी अर्ज फॉर्म भरण्यासोबतच श्रेणीनुसार विहित शुल्क भरणे आवश्यक आहे. तुमचा फॉर्म शुल्काशिवाय स्वीकारला जाणार नाही. अनारक्षित, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ₹५०० शुल्क भरावे लागेल, तर एससी, एसटी, पीएच आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना ₹२५० शुल्क भरावे लागेल. पहिल्या टप्प्यातील परीक्षेनंतर, अनारक्षित, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना ४०० रुपये परत केले जातील आणि एससी, एसटी, पीएच आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना ४०० रुपये परत केले जातील.