पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंबेगाव तालुक्यात चांडोली, पिंपळगाव येथे ज्या ठिकाणी ऊसतोड चालू आहे. त्या ठिकाणी जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद केली, अशी माहिती संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवार दि. १७ आणि शुक्रवार (दि. १८) नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन ठिकठिकाणी जाऊन ऊसतोड बंद करण्याचे काम करत आहेत. उसाची वाहतूक बंद पाडण्याचे काम देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करत आहेत. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर, वनाजी बांगर, प्रकाश कोळेकर, संतोष पवार, वैभव तोत्रे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.