Chandrapur News: गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन
Ratnagiri : मिटेनी कंपनीचा वाद मिटता मिटेना; राज्य प्रदूषण नियंत्रण पथक रत्नागिरीत दाखल
यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, आजच्या काळात शेतीसमोरील आव्हाने वाढत असून शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे, वाढती उत्पादन खर्चाची समस्या, महागलेली खते-बियाणे व रासायनिक औषधे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. (फोटो सौजन्य – Pinterest)
कार्यक्रमात लवकरच सावली परिसरात दुग्ध व्यवसाय सुरू करून सुमारे ५ हजार शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. तसेच सावली तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गोसेखुर्द धरणाचे पाणी पोहोचवून सिंचनक्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास नागपूर विभाग शिक्षक आ. सुधाकर अडबाले अध्यक्षस्थानी होते. तसेच सुशीला गड्डमवार, विनायक बांगडे, सुभाष गौर, संदीप गड्डमवार, साधना वाढई, नंदा अल्लुरवार, उषा भोयर, अनिल स्वामी, राजाबाळ सांगिडवार, रमा गड्डमवार, डॉ. सुरेश महाकुलकर, नंदू नागरकर, प्राचार्य डॉ. चंद्रमौली यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. हा सोहळा शेतकरी केंद्रित विकासाचा संदेश देणारा ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.
गड्डमवार यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रास्ताविकात वामनराव गड्डमवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, त्यांनी जिल्ह्याला दिलेली विकासाची नवी दिशा, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व शेतकरी हितासाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील विकास व कृषी क्रांतीवर आधारित माहितीपट उपस्थित शेतकरी बांधवांसमोर प्रदर्शित करण्यात आला.
नवी मुंबई विमानतळाचे ‘नामकरण’ की ‘नामांतर’? अधिकृत नाव जाहीर, पण प्रकल्पग्रस्तांचा लढा अजूनही सुरूच!
कृषी प्रदर्शनात विविध नामांकित कंपन्यांनी बियाणे, खते, फळभाजी उत्पादन व कृषी आधारित उत्पादने यांचे माहितीपूर्ण स्टॉल लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेती व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.






