फडणवीसांचा वैष्णवीच्या कुटुंबाशी संवाद (फोटो - सोशल मिडिया)
पिंपरी: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण सध्या चर्चेत असलेले पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील भुकूम येथे हगवणे यांचा सासरमध्ये राहत्या घरी मृतदेह आढळला होता. 16 मे रोजी वैष्णवी हगवणे यांनी घरात गळफास घेतात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र त्यानंतर सासरच्यांवर मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी केला. या घटनेनंतर महाराष्ट्रात संतपाची लाट उसळली असून प्रत्येकाने वैष्णवीला न्याय देण्याची मागणी केलीय. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉल करत कस्पटे कुटुंबियांशी संवाद साधला.
वैष्णवीच्या १० महिन्यांच्या मुलाला तिच्या माहेरच्या कुटुंबीयांकडे सोपवले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात हुंडाबळी, घरगुती हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे आणि योग्य कारवाईसाठी पाठपुरावा करत आहे. पुणे बार असोसिएशनला वैष्णवीच्या वडिलांनी आरोपींचे वकीलपत्र न घेण्याबाबत पत्र दिले आहे.
Vaishnavi Hagavane Case: वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचीही हेळसांड…; निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणामध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे यांना अटक केली होती. मात्र फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांनी नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर वैष्णवीला न्याय मिळावा आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
करुणा मुंडेंची चाकणकरांवर सडकून टीका
वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोग आणि अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत आहे. महिला आयोगाचा अध्यक्ष बदलावा अशी मागणी केली जात आहे. आता यावर करुणा मुंडे यांनी देखील भाष्य केले आहे.
महिला आयोगाकडे शेकडो तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारीमधील किती महिलांना आतापर्यंत न्याय देण्यात आला? असा प्रश्न करुणा मुंडे शर्मा यांनी उपस्थित केला. रुपाली चाकणकर यांचे काम पक्षासाठी फिरणे नसून, महिला आयोगाकडे ज्या तक्रारी येतेय त्याचे निवारण करणे हे आहे, असा सणसणीत टोला करुणा मुंडे शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांना लगावला आहे.
महाराष्ट्रात पूजा चव्हाण, वैष्णवी प्रत्येक घरी आहेत. महिला आयोगाकडे तक्रारी करून देखील न्याय मिळालेल्या दोन महिला करुणा मुंडे यांच्यासोबत उपस्थित असल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांनी महिलांना न्याय दिला नाही तर ३५ हजार महिलांसोबत महिला आयोगाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिला आहे.