नागपूर : मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जोरदार स्वागत करण्यात आले. (Devendra Fadnvis in Nagpur) व मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार कसे अस्तित्वात आले याची माहिती सांगितली.
[read_also content=”देवेंद्र फडणवीसांच्या पोस्टरवरुन अमित शहा, तर एकनाथ शिंदेंच्या पोस्टरवरुन उद्धव ठाकरे गायब, चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/maharashtra/amit-shah-disappears-from-devendra-fadnavis-poster-uddhav-thackeray-disappears-from-eknath-shinde-poster-300923.html”]
दरम्यान, मविआचे अडीच वर्ष सरकार हे राज्यात अस्तित्वातच नव्हते, अडीच वर्षात घोटाळा, भ्रष्टाचार, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबध असणारे नेते, मंत्री या सरकारमध्ये होते. मला दु:ख मी मुख्यमंत्री नव्हतो म्हणून नव्हते तर, लोकांनी युती सरकारला निवडून दिले होते, मोदीच्या काळात देश भरारी घेत असताना राज्य मागे जात आहे, याचे दु:ख मला होत होते. शिवसेनेचे आमदार नाराज होते, जेव्हा आमच्याशी चर्चा करत होते, तेव्हा ते नाराजी बोलून दाखवत होते. या आमदारांची खदखद नेहमी ऐकत होतो. नाराज आमदारांना आम्ही मदत केली. हिंदुत्वासाठी आम्ही सरकार स्थापन केले, याला भाजपाने पाठिंबा दिले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा व जे पी नड्डा यांचे आभार मानतो, लोकांना वाटत होते की, आम्ही सत्तेसाठी हे केले पण नाही. राज्याला पुढे नेण्यासाठी, हिंदुत्वासाठी, एका विचारांसाठी आम्ही सरकार स्थापन केले, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
आमचे सरकार पूर्ण अडीच वर्ष चालणार आहे, आम्ही शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणार, शिवेसनेत अस्वस्थता पसरली होती. युतीच्या सरकारला बहुमत मिळालं होतं, पण सरकार वेगळं आलं होतं. मी वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन केलं आहे. पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचं पालन मी केलं आहे. दरम्यान, आता विदर्भातील सिंचनासाठी आम्ही २५ हजार कोटी रुपये केंद्रातून आणले होते. तो विकास थांबला होता. वैधानिक विकास मंडळ, शेतकरी, कष्टकरी, मजूर आदी प्रश्न आहेत ते आम्ही सोडवणार. तसेच विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्टाचे प्रश्न सुद्धा सोडवणार व न्याय देणार असं फडणवीस म्हणाले. हे सरकार विकासांची कामं करणार, आगामी काळात तुम्हाला विकास दिसेल. उपमुख्यमंत्री पद स्विकारण्यात मला कोणताही कमीपणा नाही असं सुद्धा फडणवीस म्हणाले.