मुंबई : गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय नाट्यात रोज काहीन ना काही ट्विस्ट येत आहे. शिंदे गट आणि शिवसेना गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. अशातच आता पुन्हा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी नवं ट्विट केलं आहे. ‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर…’ असं त्यांनी म्हणटलं आहे.
[read_also content=”राष्ट्रपती निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा आज अर्ज दाखल करणार, राहुल गांधी, शरद पवारांसह ममता बॅनर्जी उपस्थित राहण्याची शक्यता https://www.navarashtra.com/india/yashwant-sinha-to-file-nomination-for-president-today-mamata-banerjee-likely-to-be-present-along-with-rahul-gandhi-sharad-pawar-297459.html”]
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वादाने आता वेगळ वळण घेतलं आहे. शिंदे गट आणि शिवसेना गट एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही आहे. काल संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना डिवलचं होत तर आता एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना टॅग करत एक ट्विट केलं आहे.
“हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…” असं प्रत्युत्तर शिंदे यांनी राऊतांना दिले आहे.
[read_also content=”फडणवीसाच्या सागर बंगल्यावर नेत्यांची खलबतं https://www.navarashtra.com/maharashtra/leader-at-sagar-bungalow-fadnavis-297455.html”]