उपमुख्यमंत्री शिंदे यांनी २३ जिल्ह्यात ५३ प्रचार सभा आणि रोड शो
नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पालघर जिल्ह्यातून केली. पालघरमधील डहाणू, पालघर आणि वाडा या ठिकाणी शिवसेना स्वबळावर लढत आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचार सभा घेतल्या आणि शिवसेनेच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन मतदारांना केले. पालघर पाठोपाठ सोलापूर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, बुलढाणा, जळगाव, सातारा, गोंदिया, भंडारा, सांगली, लातूर, ठाणे, रायगड, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही निवडणूक प्रचारात सहभागी होत प्रचाराची धुरा सांभाळली. खासदार डॉ. शिंदे ८ जिल्ह्यात २२ जाहीर सभा आणि रोड शो करुन मतदारांशी संवाद साधला.
शिवसेनेच्या प्रचार सभांना राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहेत. या सभांमध्ये लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय आणि उल्लेखनीय आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना सुरु करण्यात आली होती. याच लाडक्या बहिणींचा आशिर्वाद महायुतीला मिळाला आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळाले होता. आताही उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या सभांना महिलांचा प्रतिसाद प्रचंड आहे. यामुळे या निवडणुकीतही शिवसेनेकडून नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त महिलांना संधी दिली आहे.
राज्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा प्रचाराचा झंझावात सुरु असताना दुसरीकडे विरोधक मात्र प्रचारातून गायब होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रचारापुढे उबाठा, काँग्रेस निष्प्रभ ठरले. विरोधक दादर वांद्रेमधून बाहेर पडले नाहीत. निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले.






