बार्शी : बार्शी शहर व परिसरात गणेशोत्सवा बरोबरच शनिवारी गौरीच्या स्वागतासाठी घरोघरी महिला वर्गाची मोठी लगबग सुरू होती. शनिवारी सायंकाळनंतर मोठ्या उत्साहात घराघरांमध्ये गौरींचे स्वागत करण्यात आले. यंदा बार्शीत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह चाकरमान्यांमध्येही गौरी गणपती उत्सवासाठी आनंदाचे वातावरण आहे. बार्शी शहरात ६९ तालुक्यात तर तालुक्यात ९२ सार्वजनिक गणेश मंडळांची प्रतिष्ठापना केली.
बार्शी शहर पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेश चतुर्थी पासूनच शहरात शोभेच्या वस्तू, मिठाई, आणि फळे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत होती. आज शनिवारी घरोघरी गणरायाच्या बहिणीचे अर्थात गौरीचे आगमन होणार असल्याने महिला तसेच लहान मुली सणाची तयारी करत असताना दिसत होत्या. शोभेच्या वस्तूंसह विद्युत रोषणाईसाठी ठिकठिकाणी आबाल वृद्धांमध्ये उत्साह दिसून येत होता.
[read_also content=”शिवसेना ठाकरे कुटुंबाशिवाय असूच शकत नाही; शहर प्रमुख संजय माेरे यांचे मत https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sena-cannot-exist-without-the-thackeray-family-opinion-of-city-chief-sanjay-mere-nrdm-322184.html”]