Photo Credit- Team Navrashtra गौतम अदानींनीं सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांची भेट
मुंबई: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तरएकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालेले असले तरी अद्याप मंत्रिंमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे महायुतीच्या गोटात मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर आहे.
उद्योपती गौतम अदानी यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराम गौतम अदानी देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. अदानी आणि फडणवीस यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीत गौतम अदानी यांनी राज्यातील उद्योग, विकासकामे, मेट्रो आणि इतर काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केल्याची महिती आहे.
Sharad Pawar News: शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; दिल्लीच्या निवासस्थानी बैठकीत खलबतं
विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गौतम अदानी यांनी पहिल्यांदाच फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे त्यांच्या नेमकी काय चर्चा झाली, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यानस गौतम अदानी यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. अदानी यांच्यावर एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर हे कंत्राट मिळवूनदेण्यासाठी 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप आहे. एका वृत्त वाहिनीनी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. पण अदानी यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Jagdeep Dhankhar: राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस,
सोलार एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी अदानींनी दोन हजार दोनशे कोटींची लाच भारतीय अधिकाऱ्यांना दिल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तसेच, परदेशी गुंतवणुकीसाठी खोटं बोलून दिशाभूल केल्याचीह त्यांच्यावर ठपका आहे. याप्रकरणी अमेरिकेच्या न्यायालयात 24 ऑक्टोबर 2024 रोजी खटला दाखल कऱण्यात आला. अमेरिकेतील गुंतवणुकदारांच्या पैशांची गुंतवणूर असल्याने त्यांच्यावर अमेरिकेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.