मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याबरोबरीने स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनाही भारतरत्न (Bharat Ratna) द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) केली आहे. यावेळी, त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्र सोडत अनेक आक्षेप घेतले.
संजय राऊत म्हणाले की, सध्या महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) बाळासाहेबांचे ढोंगी वारसदार आहेत. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुळात बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्हीच आहोत आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासासोबत त्यांच्या विचारांसोबत राहू, असेही राऊत म्हणाले.
वीर सावरकर यांना भारतरत्न का दिला जात नाही? तुमचे एवढेच प्रेम आहे तर सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेबांनाही भारतरत्न द्या, असे आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केले. शिंदे गटाला उद्देशून बोलतांना राऊत म्हणाले की, बाळासाहेबांच्या नावाने तोतये निर्माण झालेले आहेत. मात्र ते टिकणार नाहीत. या महाराष्ट्रात ढोंग चालणार नाही, त्याला लाथ मारली पाहिजे. बाळासाहेबांनाही अशी ढोंगं आवडत नव्हती, असा टोला राऊतांनी लगावला.