माजलगाव : घर बांधण्यासाठी तुझ्या बापाकडून दोन लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. शहरातील इदगाह मोहल्ला भागातील मुलीचे लग्न बीड येथील इम्रान इब्राहीम खान (रा. इस्लामपुरा, बीड) याच्यासोबत २० ऑक्टोबर २०१९ रोजी मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे संसारोपयोगी सर्व वस्तू देऊन झाले होते.
लग्नानंतर एक मुलगी झाली. लग्नानंतर सासरच्या लोकांनी तीन वर्षे चांगले नांदवले. त्यानंतर पती इम्रान इब्राहिम खान (पती), इब्राहिम नवाज खान (सासरा), अमेर इब्राहीम खान (दीर), अफ्रोज इब्राहिम खान (दीर) (सर्व रा. इस्लामपुरा बीड), निलोफर इसाख शेख (ननंद) (रा. चौसाळा ता. जि. बीड) यांनी विवाहितेस तुझ्या आई-वडिलांकडून आपल्याला घर विकत घेण्यासाठी एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणू लागले.
त्यावर विवाहितेने माझे आई-वडील मजुरी काम करुन पोट भरतात. त्यांना चार मुलींचे लग्न करायचे आहे, त्यांच्याकडे कोठून पैसे येणार? असे सांगितले.
मानसिक, शारीरिक छळ
मानसिक आणि शारीरिक छळ करून लाथाबुक्याने मारहाण करत घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर विवाहितेचे आई-वडील तीस बीड येथे सासरी घेऊन गेले व सासरचे लोकांना बैठक बोलावून एक लाख रुपये दिले. त्यानंतर चार ते पाच महिने माझे सासरच्या लोकांनी तिला चांगले नांदवले. परत पती व वरील इतर सासरचे लोक घराचे पैसे देण्यासाठी पैसे कमी पडत आहेत, असे म्हणून तुझ्या आई-वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये नाहीतर तू इथे राहू नकोस, असे म्हणून मानसिक व शारीरीक छळ करून सतत उपाशीपोटी ठेऊन शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली.