पुण्यात पावसाचा जोर वाढला (फोटो- ai gemini)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, वातावरणाच्या मधल्या थरातील द्रोणिका पश्चिम बंगाल-मध्य बंगालच्या उपसागरावरील चक्रीय स्थितीपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत सक्रिय आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
पुणे शहरात पुढील तीन दिवस आकाश अंशतः ते सामान्यतः ढगाळ राहील. दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच २३ जुलै रोजी घाट विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारी शहराचे कमाल तापमान २८.९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. बुधवारी किमान तापमानात किंचित घट होईल, तर कमाल तापमानात विशेष बदल होणार नसल्याचा अंदाज आहे.
Pune Rain Alert: ओढ ही पावसाची! महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण; पुण्यात काही दिवस…
(२१ जुलै, सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०)
ठिकाण – पाऊस (मिमी मध्ये)
कुर्वंडे – ३२.० मिमी
चिंचवड – १६.० मिमी
पाषाण – १४.८ मिमी
एनडीए – १४.५ मिमी
दापोडी – १४.० मिमी
शिवाजीनगर – १२.९ मिमी
भोर – १२.५ मिमी
तळेगाव – ९.५ मिमी
माळीण – ८.५ मिमी
कोरेगाव पार्क – ८.० मिमी
हडपसर – ७.७ मिमी
दौंड – ६.० मिमी
निमगिरी – ५.० मिमी
गिरीवन – ४.० मिमी
दुदुळगाव – ३.० मिमी
राजगुरूनगर – २.० मिमी
शिरूर – १.० मिमी
बल्लाळवाडी – १.० मिमी
महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील आणि लगतच्या उत्तर किनारी आंध्र प्रदेशावरील चक्रीय स्थितीपासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत सरासरी समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर द्रोणी (ट्रफ) विस्तारलेली आहे. ही द्रोणी महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण गुजरात मार्गे जात असल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चोवीस तासांत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यातील घाट भागात पावसाचा जोर अधिक राहिला. घाट विभागात मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.






