महागाईचा फटका! टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ, किलोला मोजावे लागतायेत इतके रुपये
दिंडोरी तालुक्यात परतीच्या अवकाळी व बेमोसमी पावसामुळे विविध पिकांची वाताहात झाली आहे. भरपाईच्या मागणीबाबत सर्वच स्तरावरुन पाठपुरावा सुरु आहे. तालुक्यातील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे, भात, नागली, वरई ही पिकेही धोक्यात आली आहेत. टोमॅटो पिकाचेही नुकसान झालेच आहे, मात्र तुलनात्मक कमी असले तरी सध्या टोमॅटोला असलेले दर हे बऱ्यापैकी असल्याने टोमॅटो उत्पादकांना तेवढाच आधार आता उरला आहे. प्रतवारी व दर्जानुसार उत्पादकांना टोमॅटो मिळतो आहे.
दरम्यान, वणी-सापुतारा रस्त्यावरील बाजार समितीच्या उपबाजारात व खोरीफाटा भागात टोमॅटो खरेदी विक्री केंद्र सुरु झाले आहे. सध्यस्थितीत येथे सुमारे ५० हजार क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील व्यापारी टोमॅटो खरेदीचे व्यवहार करत आहेत. प्रतवारी, पॅकींग करून ट्रकमध्ये टोमॅटो टाकण्याचे काम परप्रांतीय कामगार करतात. व्यापाऱ्यांनी हे कामगार सोबतच आणले आहेत. तसेच स्थानिक व्यापारीही टोमॅटो खरेदी करुन परराज्यात पाठवित आहेत. प्रतिदीवशी सुमारे २५ टूक टमाटा परराज्यात विक्रीसाठी जात आहे, अशी माहिती टोमॅटो व्यापाऱ्यांनी दिली. मोठी आर्थिक उलाढाल यानिमित्ताने होते
आहे. टमाटा खरेदी विक्री व्यवहार प्रणालीमुळे वणी-सापुतारा रस्त्याला यात्रेचे स्वरुप आले आहे. ट्रॅक्टर, पिकअप, जीप, छोटा हत्ती अशा विविध वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, सध्यस्थितीत टोमॅटोला मिळणाऱ्या दरामुळे उत्पादकांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.
दिंडोरी तालुक्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानतर दुबार लागवड करण्यात आली होती. पावसाच्या तडाख्यात काही उत्पादकांचे नुकसान झाले. मात्र, तरीही अशा प्रसंगाला सामोरे जाऊन बहुतांशी उत्पादकांनी हे पीक जगविण्यासाठी आर्थिक अतिरिक्त भार सोसला आहे.
Ans: बहुतेक कापणी डिसेंबर ते मार्च महिन्यांत होते आणि त्यामुळे टोमॅटोचे भाव कमी असतात तर जुलै-नोव्हेंबर महिन्यांत सामान्य उत्पादन वर्षात ते वाढते.
Ans: टोमॅटोच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे, अतिवृष्टीमुळे पुरवठा कमी झाल्यामुळे गेल्या महिन्यात किरकोळ किमती २५% ते १००% वाढल्या आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीसारख्या प्रमुख पुरवठा क्षेत्रांमध्ये घाऊक किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Ans: टोमॅटो खरेदी करण्याचा सर्वोत्तम काळ जुलै ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत असतो. पिकलेल्या, गोड आणि चविष्ट टोमॅटोसाठी ऑगस्ट हा उत्तम काळ असल्याचे शेफ बर्गामिनी यांनी सुचवले आहे.






