अजित पवारांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला; अनेक पोलिस, अधिकारी जखमी
रत्नागिरीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला असून अनेक पोलिस आणि अधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे. संगमेश्वर दौऱ्यावर सरदेसाई यांच्या वाड्याची पाहणी करताना ही घटना घडली. अजित पवार मात्र या हल्ल्यातून बचावले आहेत.
या महिन्यात होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सरकारमधील बड्या नेत्याने दिले संकेत
अजित पवार सरदेसाई वाड्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक मधमाशांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यामुळे एकच धांदल उडाली, पळापळ सुरू झाली. कोणी कारमध्ये बसण्यासाठी पळत होतं. तर कोणी तोंड लपवण्याचा प्रयत्न करत होतं. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत विधान केलंय. ‘ राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात १५ वर्ष काँग्रेससोबत असताना लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रित लढवत होतो. पण बाकीच्या निवडणुका जिल्ह्याचे नेते ठरवत असतं. तशा पद्धतीने आपण पण मुभा देणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मॅटर आहे, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना समाजाचील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रचा विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक पक्ष विनाकारण चर्चा करत असतात, की यांची गरज आता संपली आहे. गरज सरो वैद्य मरो, त्यामुळे या योजनेचे पैसे आता सरकार थांबवणार, अशा चर्चा करत आहेत. मात्र मी असं करणार नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची आणि संपूर्ण महायुतीची तशी भूमिका नाही.
मुख्यमंत्र्यांनी घेतली गणबोटे अन् जगदाळे कुटुंबियांची भेट; शोक व्यक्त करत केले सांत्वन
‘लाडक्या बहिणींना आम्ही भाऊबीज आणि रक्षाबंधनाची भेट दिली आहे. त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपर्यंत आहे, त्यांना याचा लाभ मिळेल. आणि एका योजनेचा लाभ मिळत असेल, तर या योजनेचा लाभ मिळणार नाही’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.