पुणे – नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत काॅंग्रेसशी चर्चा झाली नाही. आमच्याशी चर्चा करायला हवी होती. काॅंग्रेसमध्ये बसुनच हे हाताळायला हवे होते. बाळासाहेब थोरात टोकाची भुमिका घेत नाही. चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता. अजूनही वाद मिटवता येऊ शकतो. कुणाला पाठिंबा द्यायचा हा काॅंग्रेसचा अधिकार आहे अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. महाराष्ट्र केसरी स्पर्धा काल संपन्न झाली. त्यानंतर आज पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेता शिवराज राक्षे याचा सत्कार केला.
खेळाडूंना आर्थिक हातभाराची गरज
कबड्डी, खो – खो द्वारे मी सहकार्य केले. दोन्ही संघटनाचा मी अध्यक्षही राहीलो आहे. महाराष्ट्र कुस्ती परिषदेची जबाबदारी मी घेतली होती व संकटातही मी जबाबदारीने भुमिका घेतली होती. खेळाडू धनाढ्य कुटुंबातील नसतात. त्यांना आर्थिक हातभाराची गरज असते. त्यांचा खेळासाठी अफाट खर्च करावा लागतो. त्यांना पाठिंब्याची गरज असते. उत्तम प्रकारचे प्रशिक्षण खेळाडूंना देणे गरजेचे असते. काका पवार यांनी ही मोलाची भुमिका पार पाडली.
मी कुस्ती पाहीली
शरद पवार म्हणाले, आज राक्षेंनी कर्तृत्व दाखवले. शेवटची कुस्ती मी बघत होतो. तेव्हा मी अस्वस्थ होतो. दोन्ही एकाच तालमीतील पैलवान होते. महाराष्ट्र केसरी महत्वाचा आहे पण त्यापेक्षा एशीयन, आलम्पिकचा टप्पा गाठायचा आहे. खाशाबा जाधवनंतर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर काही करु शकलो नाही. ती अस्वस्थता आहे ती अस्वस्थता दुर करावी त्यामागे आपण पाठिशी उभे आहोत. सर्वांनी खेळाडूंच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.