मुंबई : नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या (Lalbaug Raja) चरणी भाविकांनी भरभरून दान केले आहे. यावर्षी लालबगाच्या चरणी भाविकांनी ३.५ किलो सोने आणि ६४ किलो चांदी अर्पण केली. तर दहा दिवसांच्या दानपेटीतून ५ कोटी १६ लाख ८५ हजार रुपये दिले आहेत. सोन्या चांदीच्या लिलावातून मंडळाकडे ८० लाख ७३ हजार ३३३ रुपयांची रक्कम जमा झाली आहे.
गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या व चांदीच्या वस्तूंचा लिलाव रविवारपासून सुरू झाला. या लिलावास भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तूंचा जाहीर लिलाव लालबागच्या राजाच्या व्यासपीठावर झाला. यामध्ये अनेक सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तुंचा लिलाव करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा या लिलावात गणेशभक्तांनी सहभाग घेतला. यावर्षी लालबगाच्या चरणी अर्पण केलेल्या ३.५ किलो सोने आणि ६४ किलो चांदीचा लिलाव करण्यात येत आहे.