कल्याण : डोंबिवलीमध्ये झालेल्या सत्काराबाबत बोलताना मंगेश साबळे म्हणाले की, सत्कार मानसन्मान हे आरक्षणासाठी सुरू असलेला आंदोलनाला इव्हेंट करता कामा नये, मराठ्यांना माजूरे, माजलेले म्हणणं, त्यांना मी आरक्षण मिळवून देणार नाही असं म्हणणं, मराठ्यांच्या सभांना जत्रा म्हणून हे मराठा समाजाच्या अस्मितेला खिजवतायत. मराठा समाज अपमान सहन करणार नाही, शांततेने लढा, समाजासाठी झटत रहा, तसं जमत नसेल तर जे आम्ही करतोय ते करा मात्र आत्महत्या करू नका असा आव्हान मंगेश साबळे यांनी केलं. स्वातंत्र्य फक्त उपोषण करून मिळालेलं नाही स्वातंत्र्य भगतसिंग, राजगुरू यांच्यामुळे सुद्धा मिळालय. आम्ही शांततेत आंदोलन करतोय सरकारने तात्काळ आरक्षण द्यावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला.
समाजाच्या विरोधात सदवर्तेना कोणताही इशारा नाही मात्र समाजाचे माते फडकवण्याची जो काम करेल. त्याच्यामुळे जर समाजाच्या नुकसान होत असेल आरक्षणाचा लढा मोडीत निघत असेल. तर त्याची किंमत त्याला चुकवावी लागणार मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा आणि आमही त्यांचे स्वागत करतो मात्र मुख्यमंत्र्यांनी ४० दिवसांपूर्वी शब्द दिला होता ते दिवसात जीआर काढतो तीस दिवसात आरक्षण देतो. मात्र तसं कुठेही झालेलं नाही म्हणून या राजकीय भाषणांवर राजकीय घोषणांवर आम्हाला विश्वास राहिलेला नाही आता आम्हाला ठोस उत्तर या ठिकाणी हवय आधी मराठा समाजाच्या मराठा समाजात टिकणारं आरक्षण हवं आहे.