यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शेतकरी नेते राज्य संघटक घनश्याम चौधरी यांनी शिवसेनेला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. या कार्यक्रमास मराठवाडा प्रमुख किशोर ढगे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमर कदम, कोषाध्यक्ष बापू कारंडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथू पाटील, पवन पटेल यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यामध्ये दररोज 8 पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधानभवनात प्रवेश करण्याआधी विधानभवानाच्या पायऱ्यावर माथा टेकून अंर्तमुख होवून राज्यातील आत्महत्या करणारा शेतकरी डोळ्यांसमोर आणावा म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचे वास्तव लक्षात येईल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी म्हणाले, अदानीच्या हितासाठी जर राज्यामध्ये १ लाख कोटींचा शक्तीपीठ महामार्ग केला जात असेल, तर दररोज 8 शेतकरी व वर्षाला जवळपास 3हजार आत्महत्या थांबवण्यासाठी राज्याच्या तिजोरीत ३५ हजार कोटी नाहीत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील कापूस, ज्वारी, मका, तूर, बाजरी, गहू, हरभरा, ऊस, सोयाधीन, मिरची उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे, अशी खंतही राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.
Ans: राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याची टीका केली. त्यांच्या मते सरकार उद्योगपतींच्या हितासाठी काम करत असून चुकीच्या कृषी धोरणांचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसतो.
Ans: कोरडवाहू शेतीतील अडचणी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, शेतकऱ्यांचे कर्ज, पिकांच्या दरातील घसरण आणि सरकारकडून अपेक्षित मदत यासंबंधी सविस्तर चर्चा झाली.
Ans: राज्यात वारंवार अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ, गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्ती होत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून उत्पादन खर्च भरून निघत नाही.






