वाई तालुक्यात बिबट्याची दहशत (फोटो- सोशल मीडिया)
राज्यभरातील अनेक भागात बिबट्यांचा वावर वाढला
वाई तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वन विभागावर वाढतोय सर्वसामन्यांचा रोष
वाई: वाईच्या पश्चिम भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा (Leopard) वाढता वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत असताना वाई वन विभाग (Forest Department) मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. जोर, जांभळी, वेलंग, मांढरेवाडी, अभेपुरी, धोम न्हाळेवाडी, बोरीव या गावांच्या शिवारात दररोज बिबट्याचे दर्शन होत असून आता तर हा बिबट्या थेट वाई शहरालगतच्या नावेचीवाडीपर्यंत पोहोचल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या घरात, शिवारात घुसून कुत्रे, शेळ्या, मेंढ्या आणि वासरांचे फडशे पाडत आहे. तरीही या गंभीर परिस्थितीकडे वाई वन विभागाने आजवर ठोस उपाययोजना केलेली नाही. परिणामी, “पश्चिम भागात एखादी जीवघेणी दुर्घटना घडल्यावरच वन विभाग जागा होणार का?” असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे.
Leopard News: किंचित दिलासा! पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई; पहाटेच्या वेळेस 3 बिबट्यांना…
शिरूर–जुन्नर–आंबेगाव पट्ट्याप्रमाणेच आता वाईच्या पश्चिम भागातही बिबट्याचा सततचा वावर जाणवत असून, मोकाट कुत्र्यांची संख्या घटल्याने पुढील काळात मानवांवर हल्ल्याची शक्यता वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वन विभागाने केवळ दाखवायची कार्यवाही न करता प्रत्यक्षात कोणतेही वैज्ञानिक निरीक्षण, सापळे, कॅमेरे किंवा मानवी वस्तीत घुसखोरी रोखण्याच्या उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत.
Leopard News: आईपासून विमुक्त झाला अन् फसला; Forest Department कडून बछड्याचे रेस्क्यू
दरम्यान, मांढरदेव पठार परिसरात आधीच रानडुक्कर, मोर आणि इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांची कमर मोडलेली असताना आता बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांचे जीवन अक्षरशः असुरक्षित झाले आहे. रात्री-अपरात्री शेताला पाणी देणेही शेतकऱ्यांना धोक्याचे झाले असून डोंगरालगतची शेती अनेकांनी सोडून दिल्याची स्थिती आहे. पश्चिम भागातील भीतीयुक्त वातावरण लक्षात घेता वाई वन विभागाने वेळीच जागे होऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पुणे जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई
शिरूर तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी ऊस तोड सुरू असून बिबट्यांचे शेतकऱ्यांसह नागरिकांना सातत्याने दर्शन होत आहे. पिंपरखेड,जांबुत परिसरात बिबट्या च्या हल्ल्यात मागील महिन्यात ३ बळी गेल्यानंतर वन विभाग अलर्ट मोडवर असून बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ज्या काही महत्वाच्या उपाय योजना करता येतील त्या प्राधान्याने बिबट प्रवण क्षेत्रात राबविताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर काल दि. ३ रोजी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयात ७ नवीन पिंजरे दाखल झाले असल्याची माहिती शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली






