
#LiveBlogMarathi #BreakingNews #आजच्या_बातम्या
24 Dec 2025 03:50 PM (IST)
IndiGo Airline Crisis: भारतीय हवाई क्षेत्रात एअरलाइन्सच्या दुहेरी धोरणाचा परिणाम अलिकडेच दिसून आला जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोचे उड्डाण पूर्णपणे विस्कळीत झाले. उड्डाण विलंब आणि रद्द झाल्याने हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध झाले, जेव्हा बाजारात विमान कंपन्यांचे पर्याय मर्यादित असतात तेव्हा प्रवाशांना त्याचा फटका सहन करावा लागतो. अनेक संधी देखील गमवाव्या लागतात. या घडामोडीनंतर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने भारतीय प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी अल हिंद एअर आणि फ्लायएक्सप्रेस या दोन प्रस्तावित विमान कंपन्यांना एनओसी जारी केले. शंख एअरला यापूर्वी एनओसी देण्यात आले होते.
24 Dec 2025 03:40 PM (IST)
सावली: शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवणारे आणि आयुष्यभर शेती व शेतकऱ्यांशी निष्ठेने जोडलेले लोकनेते वामनराव गड्डमवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात घडवून आणलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी आहे, असे कौतुक कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सावली येथे केले. लोकनेते वामनराव गड्डमवार यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त सावली येथील विश्वशांती विद्यालय येथे सोमवारी (दि. २२) आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शन व शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार बोलत होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, राजकीय नेते, पदाधिकारी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
24 Dec 2025 03:25 PM (IST)
पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे महाविकास आघाडीला पुण्यात बळ मिळणार आहे. आता आघाडीचे जागा वाटपाचे गणित कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या मुद्दयावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याची चर्चाही शहरात रंगली होती.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण थंडीच्या दिवसात तापले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित यावेत अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र त्यास विराेध केला हाेता. तर एकत्र येण्याची भुमिका मांडत ज्येष्ठ नगरसेवक विशाल तांबे यांनी राजकीय सन्यासच घेण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. एकीकडे पक्षातंर्गत वाद सुरु असतानाच वरीष्ठ नेत्यांनी एकत्र येण्याची संमती दाखविली. तसेच अजित पवार यांच्याकडूनही काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठविला गेला हाेता. त्यामुळे पुण्यात आघाडी कसे डाव खेळणार याकडे लक्ष लागले आहे.
24 Dec 2025 03:14 PM (IST)
सध्याच्या फॅशन युगात अनेक नवनवीन डिझाईनचे दागिने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सर्वच महिलांना दागिने परिधान करायला खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने घातल्यानंतर लुक अतिशय स्टायलिश आणि मॉर्डन दिसतो. सध्या सगळीकडे व्हिक्टोरिया मंगळसूत्रची मोठी क्रेझ आहे. डायमंडच्या दागिन्यांना मॉर्डन टच देऊन बनवलेले सुंदर दागिने कोणत्याही लुकवर शोभून दिसतात. लग्न झालेली प्रत्येक स्त्री गळ्यात मंगळसूत्र घालते. त्यामुळे डिझाइनर किंवा हेवी लुकवरील साडीवर व्हिक्टोरिया मंगळसूत्र घालू शकता.
24 Dec 2025 03:14 PM (IST)
नाताळ सण सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतासह जगभरात ख्रिसमसची चमक आताच दिसू लागली आहे. ख्रिसमसच्या या खास प्रसंगी लोक एकमेकांना भेटवस्तू देतात, पाठ्यों करतात आणि यासोबतच लोक आपली घरेही खूप सजवतात. ख्रिसमस ट्री, लाइटिंग, लहान दिवे, गिफ्ट यांचा वापर करण्यात येतो. मात्र, यंदा तुम्हाला काही हटके आणि आकर्षक पद्धतीने घरं सजवायचे असेल काही टिप्स आज आपण जाणून घेऊया.
24 Dec 2025 02:55 PM (IST)
तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे विस्तीर्ण कार्यक्षेत्र असून येथे मोठी व दाट जंगलेआहेत. ही जंगले वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास मानली जातात. मात्र गेल्या काही वर्षांत वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड, ओसाड होत चाललेले डोंगर, बेकायदा उत्खनन, वाढती शिकार, जंगलातील पाणीस्रोतांचा हास आणि मानवी वावरात झालेली वाढ यामुळे (Leopard)वन्यप्राणी थेट मानवी वस्तीत येण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणात मोठी धरणे,जलाशय व अनेक नद्यांच्या काठावर दाट जंगलांचा पट्टा आहे. याच परिसरातलाहान-मोठी गावेच वाड्यावस्त्या वसलेल्या असून येथील नागरिकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून शेळीपालन, आहे.
24 Dec 2025 02:50 PM (IST)
तुम्ही देखील नवीन प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? पण बजेट थोडं कमी आहे. चिंता करू नका. ख्रिसमसपूर्वी स्मार्टफोन्सवर अनेक ऑफर्स सुरु झाल्या आहेत. विशेषत: प्रिमियम स्मार्टफोन्सच्या खरेदीवर ग्राहकांना हजारो रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जर तुम्ही प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हीच खरेदीची योग्य संधी आहे. आता आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या एका स्मार्टफोन ऑफरबद्दल सांगणार आहोत.
24 Dec 2025 02:40 PM (IST)
शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभ वेळेत, पारदर्शक पद्धतीने आणि कोणताही अडथळा न आणता पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे ठाम प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना तसेच प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय अपिलीय समिती व प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रलंबित व अपील स्वरूपातील प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
24 Dec 2025 02:30 PM (IST)
तिवसा : खरिपाचे पीक अतिवृष्टीने वाहून गेले. अद्याप नुकसान भरपाई, रब्बीच्या पेरणीसाठी अनुदान सुद्धा सरकारकडून मिळाले नाही. अशा परिस्थितीत हिरवेगार बोंड असलेले कपाशीचे पीक काढून दहेगाव धरणाच्या पाण्यावर गव्हाचे पीक घेण्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे. प्रचलित परंपरेप्रमाणे ८ ते १५ डिसेंबरच्या दरम्यान धरणाच्या पाण्याचा पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या गव्हाची लागवड होते. मात्र, यावेळी २३ डिसेंबर येऊनही कालव्याचा बांधच दुरुस्त झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या – पेरणी लांबली आहे.
24 Dec 2025 02:25 PM (IST)
नुकत्याच झालेल्या चिपळूणनगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत मागील निवडणुकीपेक्षा दोन जागा वाढवत चिपळूण शहरात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे भाजपचे नगरसेवक शशिकांत मोदी, सौ. रसिका देवळेकर वगळता नवीन 5 चेहरे नगर परिषदेवर निवडून गेले आहेत. यामध्ये भाजप युवा मोर्चा चिपळूण शहराध्यक्ष शुभम पिसे यांनी तब्बल तिघा दिग्गज उमेदवारांचा पराभव करत चिपळूण नगर परिषदेवर दणक्यात एन्ट्री केली आहे. एकंदरीत भाजपकडून ते ‘जायंट किलर’ ठरले असल्याचे बोलले जात आहे.
24 Dec 2025 02:20 PM (IST)
कोकणातील स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलत असून महिलांचा राजकारणातील प्रभाव वाढताना दिसत आहे. रविवारी नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले. कोकणात या निकालांनी वेगळे चित्र समोर आणले असून नगर परिषदांमध्ये महिलाराज (Elections) आले आहे. आरक्षणामुळे रत्नागिरी आणि रायगडात प्रत्येकी ६, तर सिंधुदुर्गात २ महिलांना नगराध्यक्षपदी संधी मिळाली. रत्नागिरी, खेड, राजापूर, अलिबाग, रोहा, पेण, कर्जत, मुरुड, उरण, सावंतवाडी, मालवण या ११ नगर परिषदा आणि गुहागर, देवरुख, लांजा या तीन नगर पंचायतीवर नगराध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या आहेत. एकूणच या निकालांमधून स्थानिक राजकारणातील बदलते समीकरण, पक्षांची ताकद आणि मतदारांचा मूड स्पष्ट होत आहे.
24 Dec 2025 02:15 PM (IST)
सध्या बॉलिवूडमध्ये धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर देखील धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंच आहे पण या चित्रपटातील FA9LA हे गाण सर्वांना वेड लावत आहे. या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेली डान्स स्टेप चांगलीच व्हायरल झाली.‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेली ‘रहमान डकैत’ ही भूमिका आणि गाण्यातील त्याची दमदार एन्ट्री सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Fa9la हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून अनेक युजर्ससह कलाकार मंडळीही या गाण्यावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. या ट्रेंडला चाहत्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठीपासून हिंदीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनाही ही डान्स स्टेप करण्याचा मोह आवरला नाही.
24 Dec 2025 02:09 PM (IST)
जेव्हा बॉलीवूड, क्रिकेट आणि संगीतातील दिग्गज एकाच फ्रेममध्ये दिसतात तेव्हा चाहते नक्कीच उत्साहित होतात. अलिकडेच सोशल मीडियावर सलमान खान, महेंद्रसिंग धोनी आणि प्रसिद्ध गायक एपी ढिल्लन यांचा एकत्र फोटो समोर आला तेव्हा असेच एक दृश्य पाहायला मिळाले. हा फोटो सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसचा आहे आणि तो त्याचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीने शेअर केला आहे.
24 Dec 2025 02:02 PM (IST)
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ख्रिसमस आठवडा नेहमीच महत्त्वाचा मानला जातो. या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे भवितव्य काही दिवसांतच ठरते. २०२५ च्या ख्रिसमससाठीही अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे, कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा रोमँटिक कॉमेडी "तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी" बॉक्स ऑफिसवर ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत कठीण आव्हानाला तोंड देताना दिसत आहे.
24 Dec 2025 01:55 PM (IST)
सध्या बॉलिवूडमध्ये धुरंधर चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर देखील धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंच आहे पण या चित्रपटातील FA9LA हे गाण सर्वांना वेड लावत आहे. या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेली डान्स स्टेप चांगलीच व्हायरल झाली.‘धुरंधर’ चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेली ‘रहमान डकैत’ ही भूमिका आणि गाण्यातील त्याची दमदार एन्ट्री सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Fa9la हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असून अनेक युजर्ससह कलाकार मंडळीही या गाण्यावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत.
24 Dec 2025 01:55 PM (IST)
छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात जमिनीच्या वादातून माजी सरपंचांची निर्घृण हत्या झाली. ग्रामसभेतील ठरावानंतर आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त करण्यात आले. प्रकरणात ४ आरोपी अटकेत असून तणाव कायम आहे.
24 Dec 2025 01:45 PM (IST)
पाकिस्तानला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सावरायला पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय विमान कंपनीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच पाकिस्तानच्या राष्ट्रीय विमान कंपनी (पीआयए) ला नवा मालक सापडला आहे. आरिफ हबीब कन्सोर्टियमने तब्बल १३५ अब्ज पाकिस्तानी रुपयांची म्हणजेच सुमारे ४,३१७ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. या कंपनीने पीआयएचे ७५ टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. लकी सिमेंट आणि एअरब्लू सारख्या कंपन्यांनीही या लिलावात भाग घेतला होता, परंतु त्यांच्या बोली आरिफ हबीब ग्रुपपेक्षा कमी होत्या.
24 Dec 2025 01:45 PM (IST)
अहमदपूर तालुक्यात शिरूर ताजबंद येथे पत्नीनेच पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. डोके भिंतीवर आपटून व गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी काही तासांत गुन्हा उघड केला.
24 Dec 2025 01:35 PM (IST)
शेजारील देश बांगलादेशातील (Bangladesh) परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे. मोहम्मद युनूस (Mohammed Yunus) यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार सत्तेत आल्यापासून देशात कट्टरपंथी गटांची गुंडगिरी शिगेला पोहोचली आहे. आता हे कट्टरपंथी केवळ रस्त्यावर हिंसाचार करत नसून, सत्य मांडणाऱ्या माध्यमांचा आवाजही दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगलादेशातील लोकप्रिय न्यूज अँकर आणि पत्रकार नाजनीन मुन्नी यांना कट्टरपंथीयांनी लक्ष्य केले असून, त्यांच्या मीडिया हाऊसला थेट जाळून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे.
24 Dec 2025 01:30 PM (IST)
सांगलीत 37 जणांची बँक खाती भाड्याने घेऊन सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सायबर पोलिसांनी जैब जावेद शेख या 22 वर्षीय आरोपीला अटक करून 11.05 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
24 Dec 2025 01:25 PM (IST)
रश्मिका मंदानाने तिच्या निरागस हास्याने आणि खट्याळ व्यक्तिरेखांनी आणि रोमँटिक भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, परंतु तिच्या आगामी “मैसा” चित्रपटाच्या टीझरवरून हे स्पष्ट होते की ती आता तिच्या कारकिर्दीत पूर्णपणे नवीन आणि धाडसी टप्प्यात प्रवेश केला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये रश्मिका मंदानाचा एक लूक दिसून आला आहे ज्याने चाहते आणि इंडस्ट्री दोघांनाही थक्क केले आहे. रश्मिका कधीही न पाहिलेल्या रूपात दिसत आहे.
24 Dec 2025 01:20 PM (IST)
मुंबईत सीबीआयने मोठी कारवाई करत GST ऑडिट-1 मधील अधीक्षकाला 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली. करदायित्व कमी करण्यासाठी 17 लाखांची मागणी केल्याचा आरोप असून घरातून 18.30 लाखांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.
24 Dec 2025 01:15 PM (IST)
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तोतया पोलिसांनी 85 वर्षीय निवृत्त शिक्षकाला मनी लाँडरिंगची भीती दाखवून 9 कोटींची फसवणूक केली. मुंबई सायबर पोलिसांनी साताऱ्यातील आरोपीला अटक करत टोळीचा पर्दाफाश केला.
24 Dec 2025 01:15 PM (IST)
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत आहेत. शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी नवीन राजकीय समीकरणांसाठी शिवतीर्थावर भेट दिली आहे. शिवतीर्थावर भेट देत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत आशिर्वाद घेतले आहेत. मात्र त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शिवतीर्थावर दाखल झाले आहे.
24 Dec 2025 01:09 PM (IST)
युट्यूब एक असं व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडीओ पाहू शकता. एवढंच नाही तर युट्यूबवर तुम्ही तुमच्या पसंतीनुसार व्हिडीओ पाहू शकता. जसे अभ्यासाचे व्हिडीओ, रेसिपी, चित्रपट, स्टँडअप कॉमेडी, ब्लॉग्स, इत्यादी. वयोमानानुसार प्रत्येकाची व्हिडीओची पसंती बदलत असते. जसे लहान मुलं कार्टून बघतात तर स्त्रिया रेसिपी बघतात. आता असा एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामुळे GEN-Z यूजर्स युट्यूबवर कोणते व्हिडीओ बघतात याचा खुलासा झाला आहे.
24 Dec 2025 01:00 PM (IST)
एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मौलवीनेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. शिकवणीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी मौलवीला अटक करण्यात आली आहे.
24 Dec 2025 12:40 PM (IST)
18 वर्षानंतर ठाकरे बंधु एकत्र, शिवसेना-मनसेची युती झाली आहे हे जाहीर करतोय, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा जाहीर केली.
24 Dec 2025 12:24 PM (IST)
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी आपल्या परिवारासह बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. यावेळी सोनचाफ्याची फुले बाळासाहेंबांच्या स्मृतीस्थळावर वाहण्यात आले.
24 Dec 2025 12:23 PM (IST)
शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित स्मृतीस्थळावर दाखल झाले आहे.
24 Dec 2025 11:55 AM (IST)
देशभरात हवामान बदलत आहे. दाट धुके आणि तीव्र थंडी उत्तर भारताला वेढत आहे, तर अनेक राज्यांमध्ये हंगामी गतिविधी नोंदवल्या जात आहेत. पर्वतांमध्ये पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू आहे. या परिणामामुळे, थंडीची लाट जाणवत आहे. बुधवार आणि गुरुवारी, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशमध्ये तीव्र धुके आणि थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
24 Dec 2025 11:45 AM (IST)
एक मौलानाने विधान केलं होती की त्याला 19 मुलं आहेत, त्याचाच दाखल देत नवनीत राणांनी देशातील हिंदूना 1 मुलावर संतुष्ट न राहता, तीन ते चार मुलं जन्माला घाला असा सल्ला नुकताच दिला होता. 4 मुलं जन्माला घाला असं सांगणाऱ्या नवनीत राणां यांना सुषमा अंधारे यांनी शुभस्य शिघ्रम असं म्हणत नवनीत राणा यांनी स्वतःपासून याची सुरुवात करायला हवी असाही सल्ला दिला.
24 Dec 2025 11:35 AM (IST)
राष्ट्रपती ट्रम्प यांच्या आदेशानुसार, भारतातील अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावास तीन दिवसांसाठी बंद राहणार आहेत. दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने २४ ते २६ डिसेंबर दरम्यान सर्व नियमित सेवा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. या काळात दूतावासाचे कामकाज पूर्णपणे बंद राहील.
24 Dec 2025 11:25 AM (IST)
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी सकाळी ८:५४ वाजता अमेरिकन कंपनी एएसटी स्पेसमोबाइलचा पुढील पिढीचा संप्रेषण उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक-२ हे त्यांच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3-M6) वापरून प्रक्षेपित केले. या मोहिमेअंतर्गत, इस्रो त्यांच्या हेवी-लिफ्ट रॉकेट LVM3 चा वापर करून लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये उपग्रह ठेवेल. तांत्रिक आणि व्यावसायिक दोन्ही दृष्टिकोनातून हे प्रक्षेपण इस्रोसाठी एक मोठी संधी मानली जात आहे.
24 Dec 2025 11:15 AM (IST)
राज्यामध्ये महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यासाठी कालपासून (दि.23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड हा महत्त्वाच्या महापालिकांसाठी हजारो उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे.
24 Dec 2025 11:05 AM (IST)
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आणि ट्रॅक आणि फील्डमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय ठरले. हरियाणातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नीरजने ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळख मिळवली असून, त्यांना अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि पद्मश्री यांसारख्या अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. आजही तो सर्वांचा आदर्श असून नीरजचा मोठा चाहता वर्ग आहे.
24 Dec 2025 10:40 AM (IST)
इजिप्तमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ मार्सा मटरूह येथे ही घटना घडून आली. हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. हे ठिकाण त्याच्या अद्वितीय कड्यांसाठी आणि तीव्र समुद्राच्या लाटांसाठी ओळखले जाते. दूरवरून पाहिले तर हे ठिकाण आश्चर्यकारक दिसते, परंतु जवळून पाहिले तर हे सौंदर्य कधीकधी प्राणघातक ठरू शकते. घटनेच्या वेळी, एक चिनी महिला पर्यटक समुद्रकिनारी असलेल्या कड्यांकडे फोटो काढत होती. तिने नारिंगी रंगाचा ड्रेस परिधान केला होता आणि खडकावर बसून ती फोटो काढण्यासाठी पोज देत होती. पण पुढे जे घडलं त्याचा तरुणीने स्वप्नातही विचार केला नसावा. फोटो काढण्याआधीच समुद्राची लाट वेगाने महिलेच्या दिशेने धावते आणि तिला घेऊनच ती पाण्यात परतते.
24 Dec 2025 10:33 AM (IST)
Thackeray Brother Alliance Announcement: गेल्या काही काळापासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मनसे-ठाकरे सेनेच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. उद्या (२३ डिसेंबर) मनसे-ठाकरे सेना युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या युतीची अधिकृत घोषणा करतील. याशिवाय जागावाटपाबाबत असलेला गोंधळही दूर करण्यात आला असून उमेदवारांची नावेही ठरवली जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून उद्याच उमेदवारांची नावे जाहीर होऊ शकतात. वाचा सविस्तर-
24 Dec 2025 10:30 AM (IST)
बांगलादेश (Bangaldesh) आणि भारतामध्ये सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे हा तणावा वाढला असून याच पार्श्वभूमीवर मोहम्मद युनूस (Muhmmad Yunus) सरकारने आपलेले सूरच बदलेल आहे. एकीकडे भारतासोत व्हिसा सेवा स्थगित केली आहे, तर दुसरीकडे भारताशी संबंध सुधारण्याचे दावे करत आहेत. दोन्ही देशांतील राजकीय तणाव देखील अजून कमी झालेला नाही. यामुळे युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरिम सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
24 Dec 2025 10:25 AM (IST)
भारतात 24 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,893 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,735 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,420 रुपये आहे. भारतात 24 डिसेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,27,350 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,38,930 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,04,200 रुपये आहे. भारतात 24 डिसेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 233 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,33,000 रुपये आहे.
24 Dec 2025 10:18 AM (IST)
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ३६ वर्षीय तरुणाचा त्याच्याच पत्नीने डोके भिंतीवर आपटून आणि गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी हा अपघात नसून हत्या असल्याचा उघड केला. मृतकाचे नाव प्रशांत असे आहे तर आरोपी पत्नीचा नाव अर्चना असे आहे.
24 Dec 2025 10:06 AM (IST)
New Zealand Visa: न्यूझीलंडने त्यांच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत प्रवासाच्या तरतुदी शिथिल केल्या आहेत. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासानंतर दीर्घकालीन वर्क व्हिसा मिळू शकेल आणि योग प्रशिक्षक आणि हटिल शेफसह ५,००० भारतीय व्यावसायिकांना तेथे काम करता येईल. दोन्ही देशांनी सोमवारी मुक्त व्यापार करार (एफटीए) वाटाघाटी संपल्याची घोषणा केली. त्यावर स्वाक्षरी होण्याची आणि सुमारे सात ते आठ महिन्यांत अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात या कराराला मान्यता दिली. हा करार न्यूझीलंडच्या संसदेकडून मंजुरी मिळण्याचीही वाट पाहत आहे. वाचा सविस्तर
24 Dec 2025 09:55 AM (IST)
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने बुधवारी सकाळी ८:५४ वाजता अमेरिकन कंपनी एएसटी स्पेसमोबाइल (AST SpaceMobile)च्या पुढील पिढीतील कम्युनिकेशन उपग्रह ‘ब्लूबर्ड ब्लॉक-2’चे यशस्वी प्रक्षेपण केले. हे प्रक्षेपण इस्रोच्या सर्वात शक्तिशाली लाँच व्हेईकल मार्क-३ (LVM3-M6) रॉकेटच्या माध्यमातून करण्यात आले.
24 Dec 2025 09:50 AM (IST)
‘पार्टी विथ डिफरन्स’ असा लौकिक मिरवणाऱ्या भाजपने गेल्या काही वर्षांत निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अनेक वादग्रस्त नेते आणि व्यक्तींना पक्षात प्रवेश दिल्याचे चित्र दिसून येत आहे. या यादीत आता आणखी एका व्यक्तीची भर पडली असून, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदे (Mayur Shinde) यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
24 Dec 2025 09:44 AM (IST)
न्यूझीलंड क्रिकेट संघाने पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. संघ निवडताना अनुभवी व्हाइट-बॉल खेळाडू डेव्हन कॉनवे, मिचेल सॅन्टनर आणि मायकेल ब्रेसवेल यांच्यासह तरुण खेळाडूंनाही संधी देत समतोल राखण्यात आला आहे.
24 Dec 2025 09:40 AM (IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. युतीच्या घोषणेसोबतच दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात सविस्तर चर्चा झाली असून, जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी ठोस असा जागावाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
24 Dec 2025 09:32 AM (IST)
Turkey Plane Crash News in Marathi : अंकारा : एक मोठे वृत्त समोर आले आहे. तुर्कीची (Turkey) राजधानी अंकारा येथे भीषण विमान अपघात (Plane Crash) घडला आहे. या अपघातात लीबियाचे आर्मी चीफ जनरल मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे लीबियाला मोठा झटका लागला आहे. या अपघातात आणखी ३ क्रू मेंबर्स आणि ४ लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
Maharashtra- National And International Breaking news :
India Share Market Update: जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक ट्रेंडमुळे बुधवारी, २४ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, हिरव्या रंगात उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उन्हाळ्यात आर्थिक वाढीच्या मजबूत अहवालानंतर वॉल स्ट्रीटवर विक्रमी उच्चांकी वाढ झाली, त्यामुळे आशियाई शेअर बाजार सोमवारी तेजीत राहिले. तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था ४.३% वार्षिक दराने वाढली. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,२३४ च्या जवळ व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा ३१ अंकांनी किंवा ०.१२% ने वाढला.